अकोला : गिरजापूर येथील शेतकरी विनोद बाबाराव इंगळे (३५) यांनी विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी घडली. त्यांच्याकडे दीड एकर शेती होती. त्यांच्यावर बँक तसेच सावकारी कर्ज होते. पोलिसांनी याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. तर पातूर तालुक्यातील एका शेतकरी पुत्राने बुधवारी गळफास घेऊन आत्महत्या केली. गोपाल अंधारे (४२) असे त्याचे नाव आहे. तो सेवा सहकारी सोसायटीचे अध्यक्ष दत्तात्रय अंधारे यांचा मुलगा होता. माकडांना हाकलण्यासाठी जातो, असे सांगून शेताकडे गेलेल्या गोपालने आंब्याच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली.
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}