शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
4
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
5
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
6
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
7
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
8
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
9
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
10
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
11
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
12
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
13
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
14
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
15
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
16
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
17
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
18
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
19
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
20
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
Daily Top 2Weekly Top 5

विजय चौगुले अडचणीत

By admin | Updated: December 19, 2014 04:37 IST

शिवसेना नवी मुंबई जिल्हाप्रमुख विजय चौगुले यांच्यावर युवतीवर बलात्कार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.

नवी मुंबई : शिवसेना नवी मुंबई जिल्हाप्रमुख विजय चौगुले यांच्यावर युवतीवर बलात्कार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. कोणत्याही क्षणी त्यांना अटक होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. पीडित महिलेवर पाळत ठेवल्याप्रकरणी तानाजी सुर्वेवरही गुन्हा दाखल केला असून त्याला अटक करण्यात आली आहे. पीडित महिलेने विजय चौगुले यांच्याविरोधात नवी मुंबई गुन्हे शाखेकडे तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा करून बुधवारी रात्री सीबीडी पोलीस स्टेशनमध्ये बलात्कार केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चौगुले यांनी मागील काही वर्षांपासून धमकावून लोणावळा, सातारा व इतर ठिकाणी नेऊन अतिप्रसंग केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. माझ्यावर लक्ष ठेवण्याची जबाबदारी तानाजी सुर्वे याच्यावर सोपविण्यात आल्याचाही तक्रारीत उल्लेख केला आहे. पोलिसांनी या प्रकरणी सुर्वे याला तत्काळ अटक केली आहे. त्याला न्यायालयात हजर करण्यात आले असून त्याला न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. चौगुलेविरोधात गुन्हा दाखल केल्यानंतर सीबीडी पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक मीरा बनसोडे यांनी स्वत: चौगुले यांच्या निवासस्थानी जाऊन झडती घेतली. परंतु चौगुले सापडले नाहीत. रात्री उशिरापर्यंत त्यांना अटक करण्यात आली नव्हती. परंतु कोणत्याही क्षणी त्यांना अटक होऊ शकते, असे बोलले जात आहे. याविषयी बनसोडे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, महिलेच्या तक्रारीवरून बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे. महिलेवर लक्ष ठेवणाऱ्यास अटक केली असून पुढील तपास सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)