शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

तुळजाभवानी मंदिरात आठ तोतया पुजार्‍यांना अटक

By admin | Updated: May 11, 2014 01:33 IST

महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी मातेच्या मंदिरात एखादा तोतया पुजारी तुम्हालाही गंडवू शकतो. त्यामुळे पूजा करण्यापूर्वी यापुढे त्या पुजार्‍याचे ओळखपत्र आठवणीने पाहा.

तुळजापूर(जि.उस्मानाबाद) : महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी मातेच्या मंदिरात एखादा तोतया पुजारी तुम्हालाही गंडवू शकतो. त्यामुळे पूजा करण्यापूर्वी यापुढे त्या पुजार्‍याचे ओळखपत्र आठवणीने पाहा. अशा आठ तोतया पुजार्‍यांना मंदिरात शनिवारी अटक केल्याने खळबळ उडाली आहे. लग्नसराई व शाळांना उन्हाळी सुट्या सुरू असल्याने तुळजाभवानी मंदिरात भाविकांची मोठी गर्दी होत आहे. याचाच फायदा घेऊन हे तोतया पुजारी भाविकांची दिशाभूल करून पूजा करीत असतात. तशी माहिती तहसिलदार सुजीत नरहरे यांना मिळाली होती. यावरून शनिवारी दुपारी अडीच ते चार वाजेच्या दरम्यान पुजार्‍यांवर पाळत ठेवली गेली. या काळात त्यांना आठ तोतया पुजारी आढळून आले. ओळखपत्राची मागणी केली असता ते देऊ शकले नाहीत. शिवाय विचारलेल्या प्रश्नांची उत्तरेही ते व्यवस्थित देवू शकले नाहीत. त्यामुळे नरहरे यांनी गणेश आदिनाथ रोकडे, सोमनाथ प्रल्हाद शिंदे, औदुंबर महादेव धनके, धनंजय सोमनाथ घोगरे, दिगंबर केरबा पैकीकर, अमोल महादेव ननवरे, राहुल रमेश मुखेडकर, लक्ष्मीकांत प्रभाकर चाटुफळे यांना पकडून मंदिर चौकी पोलिसांच्या ताब्यात दिले. गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे.ओळखपत्राशिवाय पूजा नाहीतोतयेगिरीच्या घटना वाढल्याने साधारण पाच वर्षांपूर्वी मंदिरात ओळपत्राची सक्ती करण्यात आली. पुजारी वेशात व ओळखपत्र जवळ बाळगूनच पुजार्‍यांनी भाविकांच्या पूजा कराव्यात, अशा सूचना मंदिर संस्थानच्या वतीने सर्व पुजार्‍यांना देण्यात आल्या. मंदिर संस्थानतर्फेच हे ओळखपत्र दिले जातात. ओळखपत्र कोणाला?एखाद्या बाहेरच्या पुजार्‍याला देवीच्या मंदिरात पूजा करण्याची इच्छा झालीच तत ते शक्य होणार नाही. १९२० साली संस्थानने तयार केलेल्या वंशावळीत तुमचा जन्म झालेला असेल तरच तुम्ही येथे पुजारी होऊ शकता. हे वंशज आणि त्यांची अनुक्रमणिकाच संस्थानकडे आहे. त्यानुसार या ओळपत्रांचे वाटप होते. या ओळपत्रावर फोटोशिवाय तुमचा अनुक्रमांक देखील असतो.