तुकोबाराय यवत मुक्कामी

By Admin | Updated: July 3, 2016 01:52 IST2016-07-03T01:52:26+5:302016-07-03T01:52:26+5:30

श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे दौंड तालुक्यात भावपूर्ण वातावरणात स्वागत करण्यात आले. लोणी काळभोर येथील मुक्काम उरकून पालखी सोहळा दुपारच्या न्याहारीसाठी

Tukobaray Yavat Pakkami | तुकोबाराय यवत मुक्कामी

तुकोबाराय यवत मुक्कामी

यवत : श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे दौंड तालुक्यात भावपूर्ण वातावरणात स्वागत करण्यात आले. लोणी काळभोर येथील मुक्काम उरकून पालखी सोहळा दुपारच्या न्याहारीसाठी उरुळी कांचन येथे थांबला होता.
दुपारी चारच्या सुमारास पालखीचे दौंड तालुक्यात बोरिभडक (चंदनवाडी) येथे भव्य स्वागत करण्यात आले. दौंड तालुक्यात पालखी सोहळ्याने प्रवेश करताना संततधार पाऊस सुरु होता. त्यामुळे वारकरी वर्गाला आल्हाददायक गारवा अनुभवयास मिळत होता. वाटेत ठिकठिकाणी विविध संस्था,
खाजगी कंपन्या व ग्रामस्थांच्या वतीने विविध खाद्य पदार्थ व चहाचे
मोफत वाटप वारकऱ्यांना केले जात होते. (वार्ताहर)

Web Title: Tukobaray Yavat Pakkami