शहरं
Join us  
Trending Stories
1
"मला पक्षात पद..."; उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होण्याच्या चर्चांवर आदित्य ठाकरेंची सूचक पोस्ट
2
Latest Marathi News LIVE Updates: अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
3
होर्मुझ तणावात पुतिन यांचा मास्टरस्ट्रोक! इराणी युद्धावर चीनमध्ये बनणार 'गेमप्लॅन'; अमेरिकेला शह?
4
युक्रेनच्या रोबो आर्मीने केली कमाल, रशियन सैनिकांना सरेंडर करण्यास भाग पाडून पोस्टवर केला कब्जा
5
अक्षय्य तृतीयेपूर्वी २९३८ रुपयांनी महागलं सोनं, चांदीच्या दरातही १३ हजारांपेक्षा अधिक तेजी; पाहा नवे दर
6
'आप'ने राघव चड्ढांवर केली आणखी एक कारवाई; पंजाब सरकारने Z+' सुरक्षा काढून घेतली
7
“आयुष्यभराची इच्छा पूर्ण झाली”; कर्नाटकातील १४ काँग्रेस आमदार अयोध्येत, घेतले रामदर्शन
8
“उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांसोबत केले, तेच आदित्य करताहेत”; शिंदेंच्या नेत्यांनी इतिहास काढला
9
शांतीदूत बनायला गेला अन् स्वत:च तोंडावर पडला; अमेरिकेने पाकिस्ताची दोन जहाजे होर्मुझमधून हाकलली!
10
​परतवाडा अश्लील व्हिडिओ कांड : तपासासाठी ४७ जणांची एसआयटी मैदानात; आरोपींची संख्या वाढणार 
11
LPG Gas Cylinder Booking Rules : गॅस सिलिंडर बुकिंगशी संबंधित २ नवीन अपडेट्स, एलपीजी पुरवठ्याबाबत सरकारने काय सांगितले? जाणून घ्या
12
₹६०८ कोटींची ऑर्डर मिळताच सुस्साट पळाला 'हा' शेअर; जोरदार तेजी, तुमच्याकडे आहे का?
13
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
14
Savita Pradhan : "नवरा छळायचा, बादलीत लघवी करुन अंगावर फेकली", IAS सविता प्रधान सांगतात असह्य छळ
15
'या' दिग्गज टेक कंपनीकडून भारतीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट: ५ लाखांपासून १ कोटीपर्यंत मिळणार बोनस
16
आता प्रवासावेळी टायर फाटलं तरी टेन्शन नाही...! या नव्या SUV ची जोरदार चर्चा; फीचर्सही भन्नाट
17
Home Decoration: मातीची गरज नाही, फक्त हवी काचेची बरणी आणि रोपटं! 'वॉटर गार्डनिंग'ने बदला घराचा लूक
18
छ. संभाजीनगर, वाठार, पेठवडगाव, जयसिंगपूर ४ बस स्थानकांचे उद्घाटन; प्रताप सरनाईकांचा दौरा
19
पाकिस्तान कोणता खेळ खेळतंय? इराण युद्ध काळात तुर्की, सौदी अन् कतारला चाललेत PM शहबाज शरीफ
20
'देखणी नवरी मिळेल' सांगितलं अन् ७ हजार जणांना लुटलं; लोकांना फसवणाऱ्या मॅट्रिमोनियल साईटचा असा झाला गेम!
Daily Top 2Weekly Top 5

नळांना मीटर; अवैध नळांचे काय?

By admin | Updated: January 26, 2017 10:38 IST

अकोला महापालिकेचा ऑडिट रिपोर्ट; ३0 टक्के नळजोडणी अवैध असल्यांची खुद्द आयुक्तांनी दिली माहिती.

अकोला: महापालिकेतील नळांना मीटर लावण्याची मोहीम महापालिका आयुक्त अजय लहाने यांनी सुरू केली. त्याला काही प्रमाणात यशही मिळाले, मात्र काही ठिकाणी नगरसेवक आणि नागरिकांनी थेट विरोध दर्शविल्याने नळांना मीटर लावता आले नाही. अकोला महानगरात होणारा पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी नळांना मीटर लावणे गरजेचे आहे, असा आयुक्तांनी आग्रह धरला . यासाठी काही विशेष पथकांची नेमणूकही करण्यात आली होती. मात्र, ही मोहीम मध्येच थांबली. अकोला महापालिकेतील ३0 टक्के नळजोडणी ही अवैध असल्याची माहिती दस्तुरखुद्द आयुक्तांनी दिली. त्यामुळे नळांना मीटर लावण्याची मोहीम राबविण्यासोबतच अवैध नळजोडणी शोधुन काळत पाणी चोरा विरोधात धडक मोहीम हाती घेण्याची गरज आहे. महानगरातील झोपडपट्टी परिसरात मोठय़ा प्रमाणात अवैध नळजोडणी झालेली आहे. एकीकडे काही अकोलेकर नियमित कराचा भरणा करतात, तर दुसरीकडे फुकटचे पाणी काही अकोलेकर वापरतात. अवैध पाणी वापरणार्‍यांना कोणतेही नियम न लावता, कर भरणार्‍यांवर विविध कर लावण्याची मोहीम महापालिका प्रशासनाच्या वतीने राबविली जात आहे. या मोहिमेविरुद्ध अकोलेकरांमध्ये रोष आहे. त्यामुळे या निवडणुकीच्या निमित्ताने अवैध नळजोडणीचा प्रश्न उपस्थित होणे गरजेचे आहे. मात्र कोणता पक्ष या मुद्याकडे निवडणुकीत लक्ष देतो, याकडे अकोलेकरांचे विशेष लक्ष लागून आहे.