तृप्ती माळवी यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला

By Admin | Updated: February 4, 2015 21:28 IST2015-02-04T19:49:07+5:302015-02-04T21:28:18+5:30

लाच घेताना रंगेहाथ पकडल्या गेलेल्या कोल्हापूरच्या महापौर तृप्ती माळवी यांचा अटकपूर्व जामीन जिल्हासत्र न्यायालयाने फेटाळला आहे.

Trupti Malvi's anticipatory bail rejected | तृप्ती माळवी यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला

तृप्ती माळवी यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला

>ऑनलाइन लोकमत
कोल्हापूर, दि. ४ -  लाच घेताना रंगेहाथ पकडल्या गेलेल्या कोल्हापूरच्या महापौर तृप्ती माळवी यांचा अटकपूर्व जामीन जिल्हासत्र न्यायालयाने फेटाळला आहे. 
एका जागेच्या प्रकरणात तृप्ती माळवी व त्यांचा सहकारी अश्वीन गडकरी लाच घेणार असल्याचे लाचलुचपत प्रतिबंध विभागाला कळाले असता, सापळा रचून त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले होते. गडकरी यास अटक झाल्यावर न्यायालयाने जामीनावर सुटका केली. परंतू, गुन्हा दाखल झाला त्यावेळी रात्र असल्याने कायदेशीर बाबींनुसार तृप्ती यांना अटक करता आली नाही. या घटनेनंतर महापौर तृप्ती माळवी यांचा रक्तदाब वाढल्याने  रुग्णालयात दाखल झाल्या होत्या.  त्यांच्यावतीने त्यांचे वकील प्रशांत देसाई यांनी न्यायालयाकडे अटकपूर्व जामीन सादर केला होता.  पक्षाच्या पदाधिका-यांनी तृप्ती यांची रुग्णालयात भेट घेत महापौर पदाचा राजीनामा घेतला. 
 

Web Title: Trupti Malvi's anticipatory bail rejected