शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Traffic Update: बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
2
कैसे बोगस दाखला बनाया? एमआयएम नगरसेविका सहर शेखकडून शासकीय यंत्रणांची दिशाभूल
3
IPL 2026: आधीच KKRची एक सामना जिंकायची मारामार, त्यात अजिंक्य रहाणेला BCCIचा मोठा दणका
4
नाशिकच्या तरुणींना मलेशियात विकण्याचा कट? आयटी कंपनीतील 'त्या' प्रकरणाला मानवी तस्करीचे भयानक वळण
5
सुपर डुपर हिट... ‘वंदे भारत’ची कमाल कामगिरी, ९ कोटी प्रवाशांचा प्रवास; २७४ जिल्हे, १६४ सेवा!
6
Share Market: शेअर बाजारात तुफान तेजी! सेंसेक्समध्ये १२०० अंकांची उसळी; निफ्टी २४,२०० च्या वर; 'या' शेअर्समध्ये जोरदार रॅली
7
जुलैपासून पुन्हा वाढणार जगाचं टेन्शन! भारतावरही होणार परिणाम, अमेरिकेनं स्पष्ट शब्दांत दिले संकेत
8
२१ तास चर्चा करूनही अमेरिका-इराणमध्ये करार का झाला नाही? व्हान्स यांनी सांगितली Inside Story
9
शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशांवर पीक विमा कंपन्या मालामाल, नऊ वर्षांत कमावले ७३,६३० काेटी
10
विकसित भारतासाठी प्रगती, निसर्ग आणि संस्कृतीचा त्रिवेणी संगम आवश्यक: पंतप्रधान नरेंद्र मोदी
11
भन्साळींच्या 'रोमँटिक' प्रोजेक्टसाठी शाहरुखचा 'ग्रीन सिग्नल'? वयानुसार भूमिका करणार किंग खान
12
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
13
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
14
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
15
दादर-रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा दादरवरून धावणार? व्यवहार्यता अहवालावरच पुढील निर्णय अवलंबून
16
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
17
लोकसभेच्या जागा आता ८५० हाेणार? महिला आरक्षणासाठीही केंद्राचे पाऊल, १३१ व्या घटनादुरुस्तीचा सरकारचा प्रस्ताव
18
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
19
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
20
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासी पाड्यात श्रमदानातून साकारला रस्ता!

By admin | Updated: October 9, 2016 02:09 IST

जळगाव जामोद तालुक्यातील आदिवासी पाड्यात शासनाच्या मदतीविना श्रमदानातून रस्ता साकारण्यात आला आहे.

अनिल गवईखामगाव (जि. बुलडाणा), दि. 0८- जळगाव जामोद तालुक्यातील आदिवासी पाड्यात शासनाच्या मदतीविना श्रमदानातून रस्ता साकारण्यात आला आहे. यामुळे दळण-वळण सुलभ झाले असून रुग्णांना तालुक्याच्या ठिकाणी नेण्याची सोयही झाली आहे.बुलडाणा जिल्ह्यातील संग्रामपूर आणि जळगाव जामोद या आदिवासी लोकवस्तीबहुल भागात अनेक ठिकाणी रस्ते पोहोचलेले नाहीत. त्यामुळे नागरिकांना दैनंदिन गरजा आणि रुग्णांना उपचारासाठी नेताना नातेवाईकांना तारेवरची कसरत करावी लागते. पावसाळ्यात ही परिस्थिती आणखी विदारक होत असल्याने, वडपाणी या गावात जाण्यासाठी श्रमदानातून रस्ता तयार करण्यात आला आहे. बंधारा खोलीकरण करून मुरुम तसेच शेताच्या बांधावरील दगडाचा या रस्त्यासाठी वापर करण्यात आला आहे. रस्त्याच्या निर्मितीसाठी महात्मा गांधी लोकसेवा संघ, तरुणाई फांऊडेशन आणि वडपाणी या आदिवासी गावातील युवकांनी पुढाकार घेतला. तब्बल दीड वर्षाच्या सातत्यपूर्ण अनेक हाताच्या परिश्रमातून रस्त्याची निर्मिती झाली आहे.रस्त्यासाठी दिला शेतीचा हिस्सा!गेल्या साठ दशकांपासून रस्ता नसल्याने नरक यातना काय असतात याचा अनुभव घेतलेल्या आदिवासी बांधवांनी रस्त्यासाठी श्रमदानासोबतच, स्वत:च्या शेतातील हिस्साही दान केला केला आहे. सुमजी सुमरा, तुफानसिंग खरत, ओंकार भगत या शेतकर्‍यांच्या मदतीविना हा रस्ता तयार होणे अशक्य होते. माजी सरपंच ज्ञानसिंग खरत यांच्या पुढाकारातून आदिवासी पाड्यातील शेतकर्‍यांनी रस्त्यासाठी जागा दिली. असा करण्यात आला रस्ता!जलसिंचनासाठी तयार करण्यात आलेल्या बंधारा खोलीकरणातील मुरूम, शेतातील दगड, नदीतील वाळूचा वापर करून रस्ता तयार करण्यात आला. यासाठी अनेक महिलांनी आपल्या मुरूमाळ शेतीतील दगडांची अक्षरक्ष: वेचणी करुन या रस्त्याच्या पुर्णत्वासाठी हातभार लावला.