शहरं
Join us  
Trending Stories
1
बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
2
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
3
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
4
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
5
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
6
लोकसभेच्या जागा आता ८५० हाेणार? महिला आरक्षणासाठीही केंद्राचे पाऊल, १३१ व्या घटनादुरुस्तीचा सरकारचा प्रस्ताव
7
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
8
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
9
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
10
‘तार्किक विसंगती’ हा शब्दप्रयोग फक्त बंगालमध्ये वापरला जातो, ममता बॅनर्जींचा आरोप
11
पश्चिम बंगालमध्ये २९४ मतदारसंघांत २,९२६ जणांचे भवितव्य पणाला, दोन टप्प्यात होणार मतदान
12
होर्मुझमधील युद्ध ठरेल अमेरिकेसाठी ‘वॉटरलू’?
13
कुंकी चौधरीच्या आईची हिमंता सरमांविरुद्ध तक्रार, अपमानजनक टिप्पणी केल्याचा आरोप
14
प्रत्येक कुटुंबाला १० लाखांचा आरोग्य विमा : राहुल गांधी
15
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
16
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
17
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
18
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
19
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
20
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
Daily Top 2Weekly Top 5

दहावीच्या विद्यार्थ्यांची कल चाचणी

By admin | Updated: November 11, 2015 02:27 IST

माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाशी संलग्न असलेल्या राज्यातील सर्व माध्यमिक शाळांमधील इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांची मानसशास्रीय चाचणी

मुंबई : माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाशी संलग्न असलेल्या राज्यातील सर्व माध्यमिक शाळांमधील इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांची मानसशास्रीय चाचणी (कल चाचणी) घेण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने आज घेतला. उच्च शिक्षण अथवा व्यवसायासाठी योग्य क्षेत्राची निवड करण्यास सहाय्य करून वैयक्तिक मार्गदर्शन व समुपदेशन करणे हा या चाचणीचा मुख्य उद्देश असेल. विद्यार्थ्याचा कल कोणत्या प्रकारच्या नोकरी वा व्यवसायाकडे आहे या बाबतचा निष्कर्ष सदर चाचणीद्वारे काढण्यात येईल. त्यामुळे विद्यार्थ्यांनाही शैक्षणिक व व्यावसायिक क्षेत्रांची निवड करण्यास मदत होईल. तज्ज्ञ व्यक्तींच्या सल्ल्याने विद्यार्थ्यांच्या मानसशास्रीय कसोट्या निश्चित करण्यात येतील. ही जबाबदारी व्यवसाय मार्गदर्शन व निवड संस्थेची असेल.ही चाचणी आॅनलाइन २०१५-१६ पासून आॅनलाइन घेण्यात येईल. जिथे आॅनलाइन शक्य नाही तिथे ती आॅफलाइन घेतली जाईल. दहावीनंतर काय असा प्रश्न अनेक विद्यार्थ्यांना पडतो. अनेकदा योग्य मार्गदर्शन न मिळाल्याने स्वत:ला झेपेल वा आवड निर्माण होईल, असा अभ्यासक्रमच आपण निवडला नाही, हे नंतर लक्षात येते पण तोवर वेळ निघून गेलेली असते. या पार्श्वभूमीवर, कलचाचणीच्या उपक्रमातून योग्य वेळी योग्य मार्गदर्शन करिअरसाठी मिळणार आहे. दहावीनंतर काय या बाबत मार्गदर्शन करण्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद; पुणे (विद्या परिषद) येथे हेल्पलाइन सुरू करण्यात येणार आहे. तसेच विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व समुपदेशनाची व्यवस्था संबंधित विभागीय व्यवसाय मार्गदर्शन व निवड संस्था आणि जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेमार्फत केली जाणार आहे. मानसशास्रीय चाचण्यांच्या अंमलबजावणीसाठी राज्य शिक्षण आयुक्त; पुणे यांच्या अध्यक्षतेखाली कार्यबळ गट तयार करण्यात आला आहे. या मानसशास्रीय कलचाचणीतून दिसून आलेल्या विद्यार्थ्यांच्या कलानुसार त्यांना उच्च शिक्षणासाठी किंवा व्यवसायासाठी प्रवेश वा मदत करणे ही शासनाची हमी नसेल, असे शालेय शिक्षण विभागाच्या आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे. या उपक्रमासाठीचा संपूर्ण खर्च राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ; पुणे यांच्यातर्फे करण्यात येणार आहे. हेल्पलाइन उभारणी, समुपदेशकांचे प्रशिक्षण, शिक्षकांचे प्रशिक्षण आदींसाठी आवश्यक निधी सीएसआर फंडातून उभा करण्याची मुभा विद्या परिषद; पुणे या संस्थेला देण्यात आली आहे. (विशेष प्रतिनिधी)