शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
2
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
3
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
4
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
5
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
6
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
7
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
8
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
9
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
10
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
11
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
12
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
13
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
14
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
15
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
16
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
17
सिक्स बॉल चॅलेंज! नेटमध्ये धोनीने मारले गगनचुंबी षटकार, व्हिडीओ व्हायरल
18
अभिनेत्री लग्नानंतर ६ वर्षांनी होणार आई, व्हिडिओ शेअर करत दिली गुडन्यूज; पतीही आहे अभिनेता
19
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
20
राधाकृष्ण विखे पाटलांना दणका; फसवणुकीप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

सावलीसाठी ‘देवा’ जगवतोय स्मशानातील वृक्ष, हातपंपावरून दूरवरून आणताहेत पाणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2022 08:05 IST

गाव परिसरात ‘देवा’ या टोपण नावाने ओळखल्या जाणाऱ्या राजुरा येथील सुदामा नामक ६० वर्षीय गृहस्थ गावच्या स्मशानभूमीसह अन्य ठिकाणच्या वृक्षांना जगविण्यासाठी भरउन्हात डोक्यावर हंडा घेऊन धडपडत आहेत.

यशवंत हिवराळे राजुरा (जि. वाशिम) :

गाव परिसरात ‘देवा’ या टोपण नावाने ओळखल्या जाणाऱ्या राजुरा येथील सुदामा नामक ६० वर्षीय गृहस्थ गावच्या स्मशानभूमीसह अन्य ठिकाणच्या वृक्षांना जगविण्यासाठी भरउन्हात डोक्यावर हंडा घेऊन धडपडत आहेत. सूर्य आग ओकत असतानाही ५०० ते ७०० मीटर अंतरावरील हातपंपाचे पाणी हापसून वृक्षांना पाणी घालण्याचे पूण्यकर्म त्यांच्या हातून घडतेय. 

सुदामा लोडजी पातळे हे मालेगाव तालुक्यातील राजुराचे अल्पभूधारक शेतकरी. बारमाही घरचीच गुरे-ढोरे वळण्याचे काम करतात. सततचा हसतमुख चेहरा, मनमिळाऊ वागणे, बोलणे व कृतिशीलपणामुळे त्यांना तरुणपणीच ‘देवा’ ही उपाधी गावकऱ्यांनी बहाल केली. त्यामुळे आबालवृद्धांमध्ये ते  ‘देवा’ नावानेच ओळखले जातात.

 बाराही महिने ऊन, वारा, पाऊस झेलत रोज सकाळी उठून गुरे सोडणे, दिवसभर उन्हातान्हात गुरांमागे वणवण भटकंती हा ‘देवा’ यांचा ठरलेला नित्यक्रम. तीन वर्षांपासून स्मशानभूमी तसेच गुराढोरांसाठीच्या सार्वजनिक गोठाणाजवळ लावलेल्या वृक्षांना वाचविण्यासाठी सुदामा पातळे हे दूरवरून पाणी आणत आहेत. 

हातपंपावर स्वत: हापसतात पाणी रोज नित्यनेमाने सकाळी गुरे चरायला सोडण्यापूर्वी तर सायंकाळी गुरेढोरे गोठ्यात बांधल्यानंतर ते जिल्हा परिषद शाळेच्या आवारातील सार्वजनिक हातपंपावर जातात. स्वत: पाणी हापसतात. हंडा भरला की डोईवर घेतात. वृक्षांजवळ येत मुळांना पाणी देतात. वृक्ष संगोपनाचे मोठे काम आपण करीत आहोत, हे त्यांच्या गावीही नाही. वृक्ष संगोपनासाठी धडपडणारे हे व्यक्तिमत्व परिसरात एक आदर्श ठरले आहे.

सावली देणाऱ्या वृक्षांची लागवडउन्हाळ्यात जनावरे चारताना त्यांना सावलीचे महत्त्व कळाले. त्यानंतर ‘देवा’ची पाऊले वृक्षरोपणाकडे वळाली. स्मशानभूमी परिसर, गुरांच्या सार्वजनिक गोठाणाजवळ एकही वृक्ष नसल्याने तीन वर्षांपूर्वी तेथे देवाने वड, पिंपळ, निंब, बेल यांसह घनदाट सावली देणाऱ्या विविध प्रजातींच्या वृक्षांची लागवड केली. तेव्हापासून नित्यनेमाने हातपंपावरून पाण्याचा हंडा डोक्यावर घेत ते वृक्षांना पाणी घालत आहेत.