शहरं
Join us  
Trending Stories
1
'दक्षिणेतील लोकं आफ्रिकन दिसतात'; सॅम पित्रोदांच्या विधानावर काँग्रेस म्हणतं, 'त्यांनी दिलेली उपमा...'
2
४ जूनच्या निकालानंतर सगळं स्पष्ट होईल; शरद पवारांच्या विधानावर पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
3
Sachin Pilot : "काँग्रेसला भाजपापेक्षा जास्त जागा मिळतील; जे खूप वर जातात ते एक ना एक दिवस खाली येतात"
4
पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुका जाहीर; ४ जागांसाठी 'या' तारखेला मतदान
5
Ajit Pawar : श्रीनिवास पवारांनी मला साथ देणार असल्याचं सांगितलं होतं, पण....' अजित पवारांचा मोठा गौप्यस्फोट
6
परशुराम जन्मोत्सव: विष्णूंचा सहावा अवतार, शस्त्र-शास्त्रात पारंगत चिरंजीव; वाचा, महात्म्य
7
अरे देवा! ब्युटी पार्लरमध्ये भेटल्या, एकमेकींच्या प्रेमात पडल्या अन् घरातून पळाल्या; कोर्ट म्हणतं...
8
...अन् सुरेश रैनाने सिद्धार्थ जाधवला मारली मिठी, अभिनेता म्हणाला- "तुम्ही माझं कौतुक केलं..."
9
टोल नाकेवाल्यांनी पैसे घेतले, NHAI ला महागात पडले; परदेशी वाहनमालक नडला, 25000 चा दंड
10
Babar Azam म्हणजे बिन कामाचा भाऊ; पाकिस्तानातील अभिनेत्रींनी कर्णधाराची उडवली खिल्ली
11
केरळमध्ये वेस्ट नाईल तापाचा प्रादुर्भाव; 'या' धोकादायक आजाराची लक्षणे काय आहेत? जाणून घ्या...
12
Smriti Irani Tax Saving Funds : स्मृती इराणींनी ज्या टॅक्स सेव्हिंग फंडात गुंतवणूक केली, माहितीये त्यांची कामगिरी कशीये?
13
शाहीद-करीना नाही तर 'या' जोडीला ऑफर झाला होता 'जब वी मेट', इम्तियाज अलीचा खुलासा
14
मनीष सिसोदियांना दिलासा नाहीच! जामीन याचिकेवरील सुनावणी पुढे ढकलली
15
उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला दिलासा! औरंगाबाद आणि उस्मानाबाद जिल्ह्याचं नाव छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिवच
16
अक्षय्य तृतीयेला पंचमहायोग: लक्ष्मीकृपा मिळण्यासाठी ‘हे’ उपाय करा, लाभ मिळवा; शुभच होईल!
17
‘अदानी, अंबानींकडून किती माल उचलला, त्यांना शिव्या देणं अचानक कसं काय बंद केलं?’, मोदींचा काँग्रेसला सवाल  
18
शरद पवारांनी दिलेला 'तो' प्रस्ताव काँग्रेसनं फेटाळला होता; संजय निरुपमांचा दावा
19
...तर नरेंद्र मोदी आणि अमित शहा महाराष्ट्र चालवणार का? संजय राऊतांचा सवाल
20
ना विराट, ना रोहित! पॅट कमिन्सचा आवडता भारतीय खेळाडू कोण? त्याचं धक्कादायक उत्तर

अखेर बाप्पा पावला! ई-पासमध्ये गणपतीसाठी प्रवासाचा पर्याय

By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2020 3:11 AM

चाकरमान्यांना ई-पास लवकरात लवकर उपलब्ध व्हावेत म्हणून मुंबईतील १२ परिमंडळांतील उपायुक्तांना ई-पास मंजुरीचे अधिकार देण्यात आले आहेत.

मुंबई : गणेशोत्सवासाठी महिनाभर आधीपासूनच मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईतील चाकरमान्यांची गावाकडे जाण्याची धडपड सुरू असते. यंदा मात्र बाप्पाचा उत्सव अवघ्या काही दिवसांवर आला असतानाच कोरोनामुळे ई-पासचे विघ्न चाकरमान्यांसमोर उभे ठाकले होते. यावरून राजकीय वातावरणही तापले. अखेर शनिवारपासून ही तांत्रिक अडचण दूर करत ई-पासमध्ये गणपती प्रवासासाठीचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे.चाकरमान्यांना ई-पास लवकरात लवकर उपलब्ध व्हावेत म्हणून मुंबईतील १२ परिमंडळांतील उपायुक्तांना ई-पास मंजुरीचे अधिकार देण्यात आले आहेत. अर्जाची योग्य पडताळणी करा, पण विनाकारण विलंब नको, अशा सूचना सहपोलीस आयुक्त (कायदा व सुव्यवस्था) विनय कुमार चौबे यांनी दिल्या आहेत. तसेच यात पारदर्शकता हवी, असेही नमूद करण्यात आले आहे. दरम्यान, राज्यभरात महाराष्ट्र पोलिसांकड़ून आतापर्यंत अत्यावश्यक सेवेसाठी ७ लाख ११ हजार ४९९ ई-पास देण्यात आले आहेत.पूर्वतयारीसाठी हातात उरले अवघे काही दिवसकोरोनाच्या पार्श्वभूमीवरई पास मंजूर झाल्यानंतरही गावी गेल्यानंतर गणेशोत्सवापूर्वी कुठे १०, तर कुठे ७ दिवस क्वॉरंटाईन राहणे नियामनुसार बंधनकारक आहे.क्वॉरंटाईननंतर बाप्पाच्या तयारीसाठी चाकरमान्यांच्या हातात अवघे काही दिवस शिल्लक राहणार आहेत. तरीही ई-पासमध्ये गणपतीसाठी पर्याय उपलब्ध झाल्याने त्यांच्यामध्ये आनंदाचे वातावरण आहे.

टॅग्स :Ganesh Mahotsavगणेशोत्सव