शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ मे रोजी मतदान, महायुती वरचढ ठरणार
2
Latest Marathi News LIVE Updates: लोकसभेत सीमांकन विधेयकावर चर्चा सुरू, उद्या दुपारी ४ वाजता मतदान
3
परतवाडा व्हिडीओकांड ते बंगालमधील फसवणूक! अयान तनवीर आणि आनंदचे अनेक महिलांशी संबंध; धक्कादायक खुलासा
4
हाफिज सईदच्या खास माणसावर बेछुट गोळीबार; लष्करचा संस्थापक अमीर हमजा मृत्यूच्या दारात
5
“भारताच्या अर्ध्या लोकसंख्येत मुस्लिम महिलांचा समावेश होत नाही का?”; अखिलेश यादवांचा सवाल
6
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा पिण्यापूर्वी की नंतर... कधी पाणी पिणं ठरेल आरोग्यासाठी घातक?
7
जगातील फक्त १६ देशांमध्ये महिला राष्ट्राध्यक्षा; जागतिक राजकारणात किती आहे भागीदारी?
8
PPF मध्ये ₹१२,००० ची बचत तुम्हाला बनवू शकते कोट्यधीश, मिळणार हमखास परतावा; आणखी कोणते आहेत फायदे?
9
चैत्र अमावस्या २०२६: चैत्र अमावास्येला दुपारी १२ नंतर 'या' ७ राशींना सतर्कतेचा इशारा; पण का? वाचा!
10
"मी वैतागलो होतो, म्हणून आईला मारून टाकलं" मुलाचं ऐकून पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली!
11
तुमची एक चूक आणि FASTag होईल ब्लॅकलिस्ट; पटापट करा 'हे' काम; NHAI चे बँकांना महत्त्वाचे निर्देश
12
महागाई ३८ महिन्यांच्या उच्चांकावर! पश्चिम आशियातील युद्धाचा थेट परिणाम भारतीय नागरिकांवर
13
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
14
“भारताशी आमचे संबंध ५ हजार वर्ष जुने, युद्धानंतर आणखी मजबूत होणार”; इराणचे नेते थेट बोलले
15
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
16
Ashok Kharat : 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक
17
"त्यांनी भोंदूबाबाचा सगळा प्रकार संवेदनशीलतेने हाताळला..."; प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं केलं कौतुक
18
Rasikh Salam Dar: वय लपवलं, BCCI कडून २ वर्षांची बंदी; शिक्षकाचा मुलगा RCB साठी कसा बनला ‘कमबॅक किंग’?
19
इराणमध्ये पहिल्यांदाच महिलेला फाशीची शिक्षा; कोण आहे Bita Hemmati? तिच्यावर नेमका आरोप काय?
20
३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई
Daily Top 2Weekly Top 5

मोबाइल स्कॅन होताच मिळणार रेल्वेचे तिकीट

By admin | Updated: January 30, 2015 05:12 IST

तिकिटांच्या रांगेतून सुटका करण्यासाठी रेल्वेने मोबाइल तिकीट सेवा प्रवाशांसाठी आणली. मात्र या सेवेचा लाभ घेताना प्रवाशांना अनेक प्रक्रिया पार

मुंबई : तिकिटांच्या रांगेतून सुटका करण्यासाठी रेल्वेने मोबाइल तिकीट सेवा प्रवाशांसाठी आणली. मात्र या सेवेचा लाभ घेताना प्रवाशांना अनेक प्रक्रिया पार पाडाव्या लागतात. हे पाहता मोबाइल तिकीट सेवेचा दुसरा पर्यायही रेल्वेकडून आणला जाणार आहे. मोबाइल स्कॅन करून रेल्वेचे तिकीट प्रवाशांना उपलब्ध करण्याचा रेल्वेचा प्रयत्न आहे. यासाठी स्थानकांवर एक मोबाइल स्कॅनिंग मशिनही बसविण्यात येईल. ही सेवा मार्चपर्यंत आणण्याचा रेल्वेचा प्रयत्न आहे. डिसेंबर महिन्यात रेल्वेकडून मोबाइल तिकीट सेवा प्रवाशांसाठी सुरू करण्यात आली. यासाठी रेल्वेच्या ‘क्रिस’कडून (सेंटर फॉर रेल्वे इन्फॉर्मेशन सिस्टिम) मोबाइल तिकीट सेवा उपलब्ध करण्यासाठी स्वतंत्र अ‍ॅप तयार करण्यात आले. हे अ‍ॅप अ‍ॅण्ड्रोईड फोनमध्ये गुगल प्ले स्टोअरमधून तर विंडोज फोनवर विंडोज स्टोअरमधून डाऊनलोड करावे लागत आहे. प्रवाशाला सगळी नोंदणी प्रक्रिया पार पाडताना एक कायमस्वरूपी पासवर्डबरोबरच मोबाइल नंबर, नाव आणि शहराचे नाव नोंदवावे लागत आहे. त्यानंतर नोंदणीची सगळी प्रक्रिया यशस्वीरीत्या पार पडल्यानंतर शून्य बॅलन्स आर-वॉलेट खाते युनिक लॉगिन आयडी आणि पासवर्डद्वारे सुरू करावे लागत असून, त्यानंतर प्रवाशाला यूटीएस बुकिंग काउंटर्सवरून १00 ते ५ हजार रुपयांपर्यंतचे आर वॉलेट रिचार्ज करावे लागत आहे. त्यानंतरही तिकीट मिळविण्यासाठी आणखी प्रक्रिया पार पाडावी लागत असल्याने प्रवाशांना मनस्ताप होत आहे. ही सेवा सुरू करण्यापूर्वी स्थानकांवर आलेल्या प्रवाशाला मोबाइल स्कॅन करून रेल्वेचे तिकीट उपलब्ध करण्याचा रेल्वेचा प्रयत्न होता. मात्र काही तांत्रिक कारणांची अडचण आणि ही सेवा काही कंपन्यांद्वारे देताना निविदा प्रक्रियेस लागलेला वेळ पाहता ती मागे पडली. मात्र आता ही सेवा प्रवाशांच्या सेवेत आणण्याचा रेल्वेचा प्रयत्न असल्याचे रेल्वेच्या अधिकाऱ्याकडून सांगण्यात आले. मोबाइलवर तिकिटांची माहिती मिळाल्यानंतर स्थानकात आलेल्या प्रवाशाला एका स्कॅनिंग मशिनवर मोबाइल ठेवून तत्काळ रेल्वेचे तिकीट मिळेल. यासाठी स्थानकांवर मोबाइल स्कॅनिंग मशिन (कियॉस्क) बसविण्यात येईल, असे सांगण्यात आले. (प्रतिनिधी)