शहरं
Join us  
Trending Stories
1
तेल कंपन्यांना 30,000 कोटींचे अनुदान, उज्ज्वला योजनेसाठी...; केंद्र सरकारने घेतले पाच मोठे निर्णय
2
ज्या आदित्य श्रीवास्तवचं नाव घेऊन राहुल गांधींनी ECI ला घेरले; तोच आता समोर आला, सांगितलं 'सत्य'
3
Eknath Shinde : ज्यांनी स्वाभिमान गुंडाळून ठेवला, त्यांचं....; उद्धव ठाकरेंना मागची जागा दिल्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
4
राहुल गांधींच्या आरोपानंतर काँग्रेस आक्रमक; दादरमध्ये रास्ता रोको, भाजपाविरोधात घोषणाबाजी
5
NASA : नासाचा मोठा निर्णय! इंटरनॅशनल स्पेस स्टेशन समुद्रात पाडणार! कारण ऐकून धक्का बसेल
6
IND vs AUS: टीम इंडियाविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर, भारतीय वंशाच्या दोन खेळाडूंना संधी!
7
"तुम्ही माझ्यासाठी श्रीकृष्णासारखे..."; महिलेने साडी फाडून मुख्यमंत्र्यांना बांधली राखी
8
Donald Trump Tariff News : अमेरिकाच टॅरिफबाबत गंडली! ट्रम्प यांची भारताबद्दल कडक भूमिका, पण परराष्ट्र मंत्रालय करतंय कौतुक
9
२ तासांचा हायव्हॉल्टेज ड्रामा, गर्लफ्रेंडच्या मिठीत सापडला नेता; पत्नीला पाहून पती पळाला, पण...
10
आकाश 'वाणी'! वैभव सूर्यवंशीमुळे स्टार विकेट किपर बॅटर संजूवर आलीये संघ सोडण्याची वेळ!
11
भारतीयांसाठी कॅनडा ठरतोय मृत्युचं घर; गेल्या ५ वर्षातील आकडे चिंताजनक!
12
प्राजक्ता माळीने वाढदिवशी घेतलं भीमाशंकरचं दर्शन; म्हणाली, "१२ ज्योतिर्लिंग यात्रा पूर्ण..."
13
चालत्या बसवर झाड कोसळलं, ५ जणांचा मृत्यू; महिला म्हणते, "आयुष्याचा प्रश्न, तुम्ही Video बनवताय"
14
BCCI: बीसीसीआय नव्या प्रशिक्षकाच्या शोधात, अर्जही मागवले! जाणून घ्या पात्रता
15
धनंजय मुंडेंनी मंत्रिपद स्वप्नातही पाहू नये, पुन्हा घेतले तर अजितदादांचा पक्ष संपेल: जरांगे
16
Video: हृदयस्पर्शी! हत्तीच्या पिंजऱ्यात पडला चिमुकला; गजराजाने जे केले त्यानं सर्वांचीच मने जिंकली
17
काय आहे युनिव्हर्सल बँकिंग? ११ वर्षांत पहिल्यांदाच RBI नं कोणत्या बँकेला दिला असा लायसन्स
18
Donald Trump Tariff News : ज्याची भीती होती तेच घडले! वॉलमार्ट अन् अमेझॉनसह अनेक कंपन्यांनी भारतातील ऑर्डर्स रोखून ठेवल्या
19
Raksha Bandhan 2025 Gift Ideas: केवळ चॉकलेट मिठाई नको! रक्षाबंधनाच्या निमित्तानं बहिणीला द्या 'हे' आर्थिक गिफ्ट
20
354 डब्बे, 7 इंजिन अन् 4.5 किमी लांबी; या राज्यात धावली देशातील सर्वात लांब मालगाडी ‘रुद्रास्त्र’

दुचाकीस्वारांकडून वाहतूक नियम धाब्यावर

By admin | Updated: July 10, 2017 02:59 IST

पोलीस आयुक्तालय क्षेत्रामध्ये मोटारसायकलस्वारांकडून वाहतुकीचे सर्व नियम धाब्यावर बसविले जात आहेत.

नामदेव मोरे । लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : पोलीस आयुक्तालय क्षेत्रामध्ये मोटारसायकलस्वारांकडून वाहतुकीचे सर्व नियम धाब्यावर बसविले जात आहेत. हेल्मेटचा वापर केला जात नाही. तरुणाईला स्टंटबाजीचे वेड लागले असून अपघातांमध्ये वाढ होत आहे. मोटारसायकलवर ३ ते ४ प्रवासी बसल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. पनवेलमध्ये चक्क एक मोटारसायकलवरून सात व्यक्ती प्रवास करत असल्याचेही पाहवयास मिळाले असून, नियम धाब्यावर बसविणाऱ्यांविरोधात कडक कारवाई करण्याची मागणी होऊ लागली आहे. नवी मुंबई व पनवेल परिसरामध्ये बेशीस्तपणे मोटारसायकल चालविणाऱ्यांचा प्रश्न गंभीर बनला आहे. आयुक्तालय क्षेत्रामध्ये तब्बल ३ लाख ७४ हजार मोटारसायकल आहेत. २०१६-१७ या वर्षामध्ये नवी मुंबईमध्ये ३२९२७ मोटारसायकलची खरेदी करण्यात आली होती. पनवेलमध्ये ३३१५९ मोटारसायकल खरेदी केल्याची नोंद झाली होती. प्रत्येक वर्षी दोन्ही शहरांमध्ये मिळून ५० ते ६० हजार नवीन मोटारसायकलची खरेदी होऊ लागली आहे. वाढणाऱ्या मोटारसायकलचा वाहतूक व्यवस्थेवरही परिणाम होऊ लागला आहे. पार्किंगची समस्या गंभीर झाली आहे. वाहतूक पोलिसांनी नो पार्किंगसाठी केलेल्या कारवाईमध्ये मोटारसायकलची संख्याच सर्वात जास्त आहे. वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांमध्येही मोटारसायकलस्वारच आघाडीवर आहेत. सर्रासपणे ३ ते ४ जणांना बसवून वाहने चालवितानाचे चित्र पाहवयास मिळत आहे. ‘लोकमत’ने केलेल्या पाहणीमध्ये शनिवारी पनवेल एसटी डेपोसमोर एक मोटारसायकलवर चक्क ७ प्रवासी बसले असल्याचे चित्र पाहवयास मिळाले. मोटारसायकलचालक, दोन महिला व चार मुलांना घेऊन मुख्य रोडवरून मोटारसायकल चालविणाऱ्या या व्यक्तीने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले होते. विशेष म्हणजे, चालकाने हेल्मेटचाही वापर केला नव्हता. दुर्दैवाने या मोटारसायकलचा अपघात झाला असता, तर जीवितहानी होण्याची भीती व्यक्त केली जात होती. अशाप्रकारे नियम धाब्यावर बसविणाऱ्यांवर पोलिसांनीही कारवाई केली नाही. नवी मुंबई परिसरामध्ये ७० टक्के मोटारसायकलस्वार हेल्मेटचा वापर करत नसून, पनवेल परिसरामध्ये हेच प्रमाण ९० टक्के एवढे आहे. नियम तोडणाऱ्यांना पोलिसांची भीती राहिलेली नाही. पोलीस फक्त टार्गेट पूर्ण करण्यासाठी कारवाई करत असल्याचे पाहवयास मिळत आहे. स्टंटबाजी करणाऱ्या मोटारसायकलस्वारांचे प्रमाणही वाढले आहे. पामबिच व महामार्गावर धूम स्टाइल वाहने चालविताना पूर्वी पाहवयास मिळत होते; परंतु आता अंतर्गत व रहदारीच्या रोडवरही अतिवेगाने वाहने चालविली जात आहेत. तुर्भेमध्ये मे महिन्यामध्ये धूम स्टाइल मोटारसायकल चालविणाऱ्याने धडक दिल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे वार्डाध्यक्ष ज्ञानेश्वर वाळुंज यांचा मृत्यू झाला होता. मोटारसायकलस्वारांना कायद्याची भीती राहिलेली नसून पोलिसांनी नियमित व निष्पक्षपणे कारवाई केली तरच शिस्त लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.>पोलीसही तोडतात नियमआयुक्तालय क्षेत्रामध्ये मोटारसायकलस्वार नियम धाब्यावर बसवत असून यामध्ये पोलीसही अपवाद नाहीत. वाहतूक व पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत असलेले पोलीस मोटारसायकल चालविताना हेल्मेटचा वापर करत नाहीत. अनेक वेळा रोडच्या विरूद्ध दिशेन वाहने चालवत असल्याचे पाहवयास मिळत आहे. पोलीसच नियमांचे पालन करत नसतील तर सामान्य नागरिक कसे पालन करणार? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.स्टंटबाजी बेतते जीवावरमोटारसायकलस्वारांमध्ये स्टंटबाजी करण्याचे प्रमाण वाढू लागले आहे. महाविद्यालयीन मुले स्पोर्ट बाइक व गिअर नसलेल्या दुचाकी धूम स्टाइल चालविल्या जात आहेत. पामबिच रोड महामार्गाबरोबर आता अंतर्गत रोडवरही रेसिंग सुरू झाले आहे. २८ मे रोजी तुर्भेमधील राष्ट्रवादी काँगे्रसचे कार्यकर्ते ज्ञानेश्वर वाळुंज यांना धूम स्टाइल मोटारसायकल चालविणाऱ्यांनी धडक दिली. अपघात एवढा गंभीर होता की त्यामध्ये वाळुंज यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला होता.