शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

दौ-यावर दौरे; साध्य काहीच नाही

By admin | Updated: October 27, 2014 02:40 IST

अनेक वर्षे या समस्यांतून प्रवाशांची आणि एसटी महामंडळाची सुटका झालेली नाही. तरीही महामंडळाच्या अधिका-यांकडून परदेशात ‘अभ्यास दौरे’ होत आहेत.

मुंबई : उशिराने धावणाऱ्या गाड्या, नादुरुस्त असलेल्या बसेस, हॉटेलमध्ये असलेल्या खाद्यपदार्थांचा खालावलेला दर्जा आणि टॉयलेटची झालेली दुरवस्था, असेच काहीसे चित्र सध्या एसटी महामंडळाच्या आगार आणि बस स्थानकांत दिसून येते.अनेक वर्षे या समस्यांतून प्रवाशांची आणि एसटी महामंडळाची सुटका झालेली नाही. तरीही महामंडळाच्या अधिका-यांकडून परदेशात ‘अभ्यास दौरे’ होत आहेत. या वर्षभरातही दोन परदेश दौरे आणि देशात कर्नाटक, आंध्र प्रदेशमध्ये दौरे होऊनही प्रवाशांच्या सुविधांत बदल झालेला नाही. त्यातच पुन्हा एकदा एसटीच्या अधिकाऱ्यांचा ब्राझील दौरा होत आहे. केंद्राच्या एसआरटीयूतर्फे (असोसिएशन आॅफ स्टेट रोड ट्रान्सपोर्ट अंडरटेकिंग) भारतातील प्रत्येक राज्यातील एसटी महामंडळासाठी परदेशात अभ्यास दौरा आखला जातो. २0१४मध्ये २८ मार्च ते ७ एप्रिलपर्यंत मॅक्सिको आणि सॅन फ्रॅन्सिस्को येथे अभ्यास दौरा काढला होता. तत्पूर्वी कर्नाटक आणि आंध्र प्रदेशचाही दौरा महामंडळातील अधिकाऱ्यांकडून केला गेला. प्रवासी आणि उत्पन्नवाढीसाठी उपाययोजना, इंधनाची बचत, सेवा आणि प्रवासी कराचा अभ्यास, आगार आणि बसची स्वच्छता, अपघातांना आळा घालण्यासाठी होणाऱ्या उपाययोजना कशा केल्या जाव्यात, यासाठी हे अभ्यास दौरे केले जात असल्याचे एसटी महामंडळ सातत्याने सांगते. गेल्या १० वर्षांपासून परदेश आणि देशभरात दौरे होत असून, प्रवाशांच्या सुविधांत कुठलाच बदल झाला नसल्याचे दिसून आले आहे. आता एसटी महामंडळाचे ५ अधिकारी नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीस ब्राझीलच्या दौऱ्यावर जात असून, यामध्ये वित्तीय सल्लागार आणि मुख्य लेखाधिकारी एकनाथ मोरे, वाहतूक - महाव्यवस्थापक विनोद रत्नपारखी, वरिष्ठ प्रोग्रामर - ईडीपी वीरेंद्र कदम, उपमहाव्यवस्थापक - प्रशिक्षण - (भोसरी) मिशा बंड, मुख्य अभियंता चालक आर. एम. पवनीकर यांचा समावेश आहे. (प्रतिनिधी)