शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
2
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
3
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
4
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
5
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
6
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
7
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
8
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
9
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
10
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
11
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
12
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
13
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
14
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
15
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
16
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
17
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
18
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
19
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
20
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
Daily Top 2Weekly Top 5

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या वाहनांना टोल माफी  : शासन निर्णय जारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2019 19:49 IST

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना आनंदाची बातमी असून, मुंबई - कोल्हापूर मार्गे कोकणात जाणाऱ्या वाहनांना 30 ऑगस्ट ते 12 सप्टेंबर 2019 पर्यंत टोल माफ करण्याचा शासन निर्णय आज जारी करण्यात आला आहे. त्यामुळे कोकणात खासगी वाहनांनी जाणाऱ्या वाहनचालकांनी पोलीस ठाण्यातून टोल पास घ्यावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

ठळक मुद्देगणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या वाहनांना टोल माफी  : शासन निर्णय जारी पोलीस ठाण्यातून टोल पास घेण्याचे वाहनचालकांना आवाहन

कोल्हापूर  : गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना आनंदाची बातमी असून, मुंबई - कोल्हापूर मार्गे कोकणात जाणाऱ्या वाहनांना 30 ऑगस्ट ते 12 सप्टेंबर 2019 पर्यंत टोल माफ करण्याचा शासन निर्णय आज जारी करण्यात आला आहे. त्यामुळे कोकणात खासगी वाहनांनी जाणाऱ्या वाहनचालकांनी पोलीस ठाण्यातून टोल पास घ्यावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

कोकणात जाणाऱ्या रस्त्यांच्या स्थिती संदर्भात नुकतीच बैठक मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या मंत्रालयातील दालनात झाली होती. या बैठकीत गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांचा प्रवास आणखी सुखकर व्हावा, यासाठी मुंबई - कोल्हापूर मार्गे कोकणात जाणाऱ्या वाहनांना 30 ऑगस्ट ते 12 सप्टेंबर 2019 पर्यंत टोल माफ करण्याचा निर्णय त्यावेळी घेण्यात आला होता. त्यासंबंधीचा शासन निर्णय आज सार्वजनिक बांधकाम विभागाने जारी केला आहे.गणेशोत्सवासाठी मुंबई-पुणे-कागल मार्गे कोकणात जाणाऱ्या भाविकांना एक स्टिकर पास देण्यात येणार आहेत. हा पास 12 सप्टेंबर रोजी परतीच्या प्रवासात ग्राह्य धरण्यात येणार आहे. तसेच, मुंबई-पुणे प्रवासात व पुणे- कोल्हापूर कागल मार्गे कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी मुंबई (वाशी), पुणे-मुंबई एक्सप्रेस वे, किणी तावडे येथील पथकर नाक्यांवर महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसना पथकरातून सूट देण्यात येणार आहे. याबाबतच्या सुचना सदर शासन निर्णयानुसार संबंधित विभागांना देण्यात आल्या आहेत.

टॅग्स :tollplazaटोलनाकाkolhapurकोल्हापूर