शहरं
Join us  
Trending Stories
1
Heatwave: देशात उष्णतेचा कहर, 'या' ६ राज्यात आग ओकतोय सूर्य, पुढील तीन दिवस घ्यावी लागेल काळजी!
2
Top Marathi News Live: इराणने अमेरिकेला पाठवला नवा प्रस्ताव, पाकिस्तान मध्यस्थ
3
इराणचा ट्रम्प यांना थेट इशारा! पाकिस्तानमार्फत पाठवला 'रेड लाईन'चा संदेश; काय आहे प्लॅन?
4
तुमच्या मुलीच्या खात्यात येतील ६९,२७,५७८ रुपये, तुम्हाला या योजनेत किती करावी लागेल गुंतवणूक, पैसेही राहतील सुरक्षित
5
IPL 2026 Points Table : प्लेऑप्सच्या शर्यतीत कोण टिकणार? KKR नं MI ला टाकलं मागे; LSG तळाला!
6
अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य कशी करावी?; महत्त्वपूर्ण बैठकीत आज होणार मंथन
7
‘मिसिंग लिंक’ मार्गावर कार, बसलाच एंट्री, टोलवाढ नाही; मुंबई-पुणे अंतर ६ किमीने कमी
8
२० लाखांचे पॅकेज असूनही 'एक रुपया'ही टॅक्स भरावा लागणार नाही; हे नक्की करा
9
आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२६, वडील व वडीलधार्‍यांकडून लाभ होईल, समाजात मान-प्रतिष्ठा वाढेल
10
एमआयडीसी मुख्यालय निविदेला पाचवी मुदतवाढ; ‘रतन टाटा उद्योग भवन’ प्रकल्पाला मिळणार वेग
11
कुजबुज! सत्ता नसूनही ठाकरेंची तारेवरची कसरत; गायकवाडांवरही होऊ शकते पुस्तक
12
मराठी अभिनेता झाला जुळ्या मुलांचा बाबा! लग्नाच्या ८ वर्षांनी पाळणा हलला, नावंही ठेवली खूपच खास
13
मेट्रो ६ मार्गासाठी पश्चिम रेल्वेवर ४२ मीटर स्टील स्पॅनची उभारणी; काय आहेत वैशिष्ट्ये?
14
‘रेलवन’वर बुकिंग फसले अन् वॉलेटमध्येच रक्कम अडकली; प्रवासी नाराज, पैसे परत देण्याची मागणी
15
२२ वर्षीय मुलीची क्रूर हत्या, अवघ्या ५ दिवसांत गुन्ह्याचा छडा; आरोपीला ठाण्यातून केली अटक
16
मुंबईकरांनो, तुम्ही रामभरोसे बाहेरचे पदार्थ खाताय..! महाराष्ट्रात एफडीए इन्स्पेक्टरची वानवा
17
आजारपण अन् आयुष्यभराची कमाई साफ; कुटुंब अडकते वर्षानुवर्षे कर्जाच्या खाईत, मध्यमवर्ग संकटात
18
‘त्यांना’ मराठीची परीक्षा देऊन पदवी घ्यायची नाही; परिवहन मंत्र्यांनी मांडली स्पष्ट भूमिका
19
तुम्ही रिक्षा-टॅक्सीवाल्यांची उपजीविका नष्ट करताय; मराठी सक्तीला शशांक राव यांचा आक्षेप
20
हम ‘आप’ के हैं कौन? सत्तेसाठी पक्ष फोडणे ही प्रवृत्ती लोकशाहीच्या आत्म्याला नख लावणारी
Daily Top 2Weekly Top 5

टोल, कर रद्द करा

By admin | Updated: November 21, 2014 02:34 IST

सटीला आर्थिक संकटात सापडण्यास अनेक कारणे असून यात टोल आणि प्रवासी करामुळे मोठा फटका बसत आहे. त्यामुळे टोल आणि

मुंबई : एसटीला आर्थिक संकटात सापडण्यास अनेक कारणे असून यात टोल आणि प्रवासी करामुळे मोठा फटका बसत आहे. त्यामुळे टोल आणि प्रवासी कर रद्द करावा, अशी मागणी अनेक वेळा एसटी महामंडळाकडून शासनाकडे करण्यात आली आहे. आता एसटी महामंडळाने हीच मागणी नव्या सरकारकडे लावून धरली असून तसे एक मागणीपत्रही पाठविले आहे. २00८-0९ साली एसटी महामंडळाकडून तब्बल ६0 कोटी ९७ लाख रुपये टोल टॅक्सचे भरण्यात आले होते. तर २00९-१0 साली हाच आकडा ६८ कोटी ६३ लाख रुपये एवढा होता. २0१३-२0१४ साली तर हाच आकडा जवळपास १२0 कोटी रुपये एवढा झाला आहे. टोल टॅक्सचा भार वाढतच जात असल्यामुळे महामंडळावर मोठा आर्थिक बोजा पडत आहे. त्याचबरोबर प्रवासी सेवेवर १७.५ टक्के तर शहरी भागातील प्रवासी सेवेवर ३.५ टक्के प्रवासी कर आकारला जातो. या कराचाही फटका एसटीला बसतो. त्यामुळे हे दोन्ही कर रद्द करण्यात यावे, अशी मागणी एसटी महामंडळाकडून राज्य सरकारकडे करण्यात येत होती. मात्र त्यावर निर्णय होत नव्हता. महत्त्वाची बाब म्हणजे शासनाच्या विविध विभागांना देण्यात येणाऱ्या सवलतींमुळेही महामंडळावर शेकडो कोटींचा बोजा पडत आहे. त्यामुळे या सवलतींवरही विचार केला जावा, अशी मागणीही होत होती. अखेर नवीन सरकार स्थापन होताच एसटी महामंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे टोल, प्रवासी कर रद्द करण्याबरोबरच सवलतींचाही विचार करावा, अशी लेखी मागणी केल्याचे एसटी महामंडळाचे अध्यक्ष जीवनराव गोरे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)