शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
2
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
3
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
4
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
5
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
6
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
7
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
8
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
9
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
10
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
11
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
12
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
13
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
14
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
15
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
16
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
17
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
18
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
19
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
20
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
Daily Top 2Weekly Top 5

राहूल गांधींच्या ‘त्या’ वक्तव्याचा आज निर्णय

By admin | Updated: March 10, 2015 04:21 IST

महात्मा गांधी यांची हत्या आरएसएसने केली, या वक्तव्याप्रकरणी भिवंडी येथे दाखल असलेला गुन्हा रद्द करण्यासाठी काँग्रेस उपाध्यक्ष राहूल

मुंबई : महात्मा गांधी यांची हत्या आरएसएसने केली, या वक्तव्याप्रकरणी भिवंडी येथे दाखल असलेला गुन्हा रद्द करण्यासाठी काँग्रेस उपाध्यक्ष राहूल गांधी यांनी केलेल्या याचिकेवर उच्च न्यायालय उद्या मंगळवारी निकाल देणार आहे़ गेल्यावर्षी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान खासदार राहूल यांनी हे वक्तव्य केले़ याप्रकरणी संघाने भिवंडी येथे याचा गुन्हा दाखल केला़ हा गुन्हा रद्द करण्यासाठी राहूल यांनी न्यायालयात याचिका केली आहे़या याचिकेवर न्या़ एम़ एल़ ताहिलयानी यांच्यासमोर सुनावणी झाली़ महात्मा गांधी यांची हत्या संघाने केली की नाही यावर भिन्न मत प्रवाह आहे़ यावर पुस्तकेही लिहिली गेली आहेत़ आणि प्रचार करताना जनतेसमोर पक्षाची भूमिका स्पष्ट करणे हे माझे काम आहे़ त्यामुळे ही तक्रार हेतूपूरस्सर करण्यात आली असल्याने ती रद्द करावी, अशी मागणी राहूल यांच्यावतीने करण्यात आली़मात्र महात्मा गांधी यांची हत्या संघानेच केली असल्याचा दावा राहूल यांनी भाषणात केला होता़ संघाने देशभरात याच्या तक्रारी केल्या नाहीत़ तसेच सुनावणी न्यायालयापुढे राहूल यांनी आपली बाजू मांडावी़ असा युक्तिवाद संघाच्यावतीने करण्यात आला़उभय पक्षांचा युक्तिवाद पूर्ण झाल्यावर निकाल राखून ठेवला़