शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
CSK फ्रँचायझीकडून MI विरुद्ध केला होता मोठा पराक्रम! तोच Donovan Ferreira झाला RR चा 'बाहुबली'
4
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
5
विदर्भकराचा इम्पॅक्ट! PBKS ला शह देण्यासाठी RR नं खेळलेली 'ती' चाल ठरली मॅचचा टर्निंग पॉइंट
6
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
7
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
8
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
9
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
10
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
11
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
12
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
13
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
14
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
15
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
16
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
17
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
18
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
19
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
20
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
Daily Top 2Weekly Top 5

काळ तर मोठा कठीण येणार...

By admin | Updated: June 3, 2015 03:56 IST

तापमान वाढीमुळे उडालेला महागाईचा भडका पावसात थंडावेल ही आशाही आता खोटी ठरण्याची चिन्हे आहेत. ढगात नव्हे, तर शेतकऱ्यांच्या डोळ्यांत पाणी आणणाऱ्या

मुंबई : तापमान वाढीमुळे उडालेला महागाईचा भडका पावसात थंडावेल ही आशाही आता खोटी ठरण्याची चिन्हे आहेत. ढगात नव्हे, तर शेतकऱ्यांच्या डोळ्यांत पाणी आणणाऱ्या या बातमीवर वेधशाळेच्या सुधारित अंदाजासोबत आर्थिक जगतानेही शिक्कामोर्तब केल्याने ‘काळ तर मोठा कठीण’ येण्याचे संकेत मिळत आहेत. उष्णतेमुळे बाजारात फळभाज्यांची आवक कमी झाल्यामुळे सर्वच फळ, भाज्या आणि डाळींच्या किमती भडकल्या आहेत. त्यातच हवामानशास्त्र विभागाने आज सुधारित अंदाज जाहीर केला. त्यानुसार यंदा जून ते सप्टेंबर या चार महिन्यांत देशात सरासरीच्या केवळ ८८ टक्केच पाऊस पडणार आहे. उत्तर पश्चिम भागात म्हणजेच, राजस्थान, गुजरात, हरियाणा, पंजाब आणि आजूबाजूंच्या राज्यांना यंदा तीव्र दुष्काळाचा सामना करावा लागणार आहे. तेथे पावसाचे प्रमाण सरासरीच्या ८५ टक्के राहील. ईशान्य भारत आणि मध्य भारतात ९० टक्के आणि दक्षिण भारतात ९२ टक्के पाऊस पडणार असल्याचे सांगण्यात आले आहे. याचा थेट परिणाम अन्नधान्याच्या उत्पादनांपासून पिण्याच्या पाण्यापर्यंत सर्वच घटकांवर होणार आहे. याची परिणती अखेर महागाई भडकण्याच्या रूपानेच दिसेल, असे रिझर्व्ह बँकेनेही म्हटले आहे. कमी पावसाच्या अंदाजामुळे अर्थकारणावरील संभाव्य परिणामाचा थेट फटका शेअर बाजाराच्या आजच्या कामगिरीलाही बसला आणि सेन्सेक्समध्ये तब्बल ६६० अंशांची घसरण होत बाजार २७,१८८ अंशांवर विसावला.स्कायमेट या खासगी संस्थेने एप्रिल महिन्यात वर्तविलेल्या अंदाजानुसार, देशात यंदा तब्बल १०२ टक्के पाऊस पडणार आहे. गुजरात, राजस्थान व जम्मू-काश्मीर या राज्यांमध्ये पावसाचे प्रमाण कमी असेल.