शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
2
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
3
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
4
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
5
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
6
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
7
Latest Marathi News LIVE Updates: राज्यातील सर्व बस स्थानकांवरील शौचालय सुविधा १ जूनपासून मोफत; प्रताप सरनाईक यांची घोषणा
8
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
9
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
10
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
11
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
12
Mango Wash Tips: आंबा धुण्याची 'ही' आहे योग्य पद्धत; रसायने आणि उष्णतेचा धोका होईल दूर!
13
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
14
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला तुळशीचे 'नवे' रोप लावल्याने इच्छापूर्ती होते? काय आहे कारण? वाचा!
15
पाकिस्तानला मालामाल करणार 'काळा खजिना'; सर्वात मोठ्या विहिरीत आढळला प्रचंड तेलसाठा, किती फायदा?
16
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
17
Sonali Jadhav : 'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
18
T20 वर्ल्ड कपच्या कोणत्या सामन्यात झाली मॅच फिक्सिंग? कसा घडला सगळा प्रकार? वाचा सविस्तर
19
Simple Ultra: एकदा चार्ज केल्यानंतर ४०० किलोमीटर धावणार! इलेक्ट्रीक स्कूटर सिंपल अल्ट्रा भारतात लॉन्च
20
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

तिकीट काऊंटर खाक

By admin | Updated: June 1, 2014 01:05 IST

नागपूर रेल्वेस्थानकावरील पश्‍चिम गेटसमोरील तिकीट काऊंटरला आज सकाळी १0.४५ च्या सुमारास आग लागल्याने प्रचंड खळबळ उडाली होती. आगीत कुठलीही जीवित हानी झाली नसली तरी, कार्यालयीन उपयोगाचे

रेल्वेस्थानकातील घटना : क ॉम्प्युटर, प्रिंटरसह एसी जळाले, प्रवाशांची पळापळ नागपूर : नागपूर रेल्वेस्थानकावरील पश्‍चिम गेटसमोरील तिकीट काऊंटरला आज सकाळी  १0.४५ च्या सुमारास आग लागल्याने प्रचंड खळबळ उडाली होती. आगीत कुठलीही जीवित हानी  झाली नसली तरी, कार्यालयीन उपयोगाचे साहित्य खाक झाले आहे. नेमकी आग कशाने लागली  याचे कारण कळले नसले तरी, आगीच्या चौकशीसाठी पाच सदस्यीय समितीची स्थापना करण्यात  आली आहे. रेल्वेस्थानकाच्या पश्‍चिम द्वारावर आठ खिडक्यांचे तिकीट काऊंटर आहे.  यातील पाच  काऊंटरवर तिकीट विक्री होते. सध्या सिझन असल्याने काऊंटरवर प्रवाशांची चांगलीच गर्दी  असते. आज सकाळीसुद्धा काऊंटरवर प्रवाशांची रांग लागली होती. १0.४५ च्या सुमारास सर्व्हर  असलेल्या ८ क्रमांकाच्या खिडकीत अचानक धूर निघायला सुरुवात झाली. तिकीट काऊंटरवरील  एका कर्मचार्‍याच्या हे लक्षात आल्याने, त्याने सर्वांंंना अलर्ट केले. दरम्यान रांगेत लागलेल्या  प्रवाशांची पळापळ सुरू झाली. रेल्वे पोलिसांनी प्रवाशांना काऊंटर परिसरातून बाहेर काढले.  सर्वप्रथम तिकीट काऊंटरवर गोळा झालेली कॅश घेऊन कर्मचारी बाहेर पडले. सर्व कर्मचारी बाहेर  आल्यानंतर काऊंटरवर असलेल्या आग प्रतिबंधक उपकरणाद्वारे कर्मचार्‍यांनी आग विझविण्याचा  प्रयत्न केला. या दरम्यान अग्निशमन विभागालाही सूचना देण्यात आली. अवघ्या दहा मिनिटात  अग्निशमनाचे तीन बंब रेल्वेस्थानकावर येऊन धडकले. १५ ते २0 मिनिटात त्यांनी आगीवर  नियंत्रण मिळविले. मात्र यात कार्यालयीन साहित्य खाक झाले होते. आगीमुळे पश्‍चिम गेटकडील  वीज पुरवठा खंडीत करण्यात आला होता. त्यामुळे रिझर्व्हेशनचे काम दीड तास खोळंबले होते.  प्रवाशांना तिकीट उपलब्ध करून देण्यासाठी दोन अतिरिक्त काऊंटर वाढविले, तसेच बीपीटीचे  सुद्धा दोन काऊंटर सुरू करण्यात आले. (प्रतिनिधी)