शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

आश्रमशाळांची फळखरेदी ई-निविदेऐवजी समितीमार्फत

By admin | Updated: October 27, 2014 02:46 IST

आदिवासी विकास विभागाच्या अखत्यारीतील शासकीय आश्रमशाळा वसतिगृहातील विद्यार्थ्यांना पुरविण्यात येणा-या फळांच्या खरेदीसाठी असलेल्या नियमात आदिवासी विभागाने बदल केले आहेत.

मुंबई : आदिवासी विकास विभागाच्या अखत्यारीतील शासकीय आश्रमशाळा वसतिगृहातील विद्यार्थ्यांना पुरविण्यात येणा-या फळांच्या खरेदीसाठी असलेल्या नियमात आदिवासी विभागाने बदल केले आहेत. यानुसार ई-निविदा मागवून फळांची होणारी खरेदी बंद होणार असून, यापुढे फळांची खरेदी समितीमार्फत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे फळखरेदीतील पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होण्याची शक्यता आहे.प्रशासकीय कारभारात पारदर्शकता आणण्यासाठी राज्य शासनाने साहित्य खरेदी आणि कंत्राटे ई-निविदांमार्फत करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र या नियमांना बगल देत आदिवासी विकास विभागाने वसतिगृहातील विद्यार्थ्यांना दूध, अंडी, केळी, नाचणी आणि फळांचा पुरवठा करण्यासाठी यापूर्वी असलेली ई-निविदा पद्धत रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.याबाबतचा अध्यादेश शासनाने नुकताच जारी केला आहे. त्यामुळे यापुढे फळ खरेदी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प यांच्या अध्यक्षतेखालील समिती क्रमांक ४मार्फत करण्यात येणार आहे.या समितीचे अध्यक्ष एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी यांची नेमणूक करण्यात आली आहे. तसेच साहाय्यक प्रकल्प अधिकारी, आश्रमशाळेचे वरिष्ठ मुख्याध्यापक, वरिष्ठ गृहपाल यांची सदस्यपदी तर विकास प्रकल्पाचे लेखाधिकारी यांची सदस्य सचिवपदी निमणूक झाली आहे.ऋतुमानानुसार पुरविण्यात येणारी फळे ही आदिवासी महिला बचत गट, आदिवासी पुरुष बचत गट, आदिवासी महिला सहकारी संस्था, आदिवासी पुरुष सहकारी संस्था, आदिवासी महिला भागीदारी संस्था, आदिवासी महिला पुरवठादार कंपनी, आदिवासी पुरुष व सर्वसाधारण पुरवठादार कंपनी, आदिवासी महिला यांच्याकडून प्राथम्यक्रमाने खरेदी करण्यात येणार आहेत.ज्या भागात दूध व नाचणी उपलब्ध नसेल तेथे सफरचंद किंवा इतर फळे विद्यार्थ्यांना देण्यात येतील. आठवड्यातून चार प्रकारची फळे विद्यार्थ्यांना देण्यात येणार असून, फळांच्या गुणवत्तेवर नियंत्रण ठेवण्यासाठी आश्रमशाळेतील ५ विद्यार्थ्यांची समिती गठीत करण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)