शहरं
Join us  
Trending Stories
1
"मला पक्षात पद..."; उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होण्याच्या चर्चांवर आदित्य ठाकरेंची सूचक पोस्ट
2
अमेरिकन नौदलाला इराणचा खुलं आव्हान! डोळ्यांदेखत टँकरने ओलांडली 'होर्मुझ'; ट्रम्प यांचे सैन्य पाहतच राहिले
3
याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले
4
५९१ कोटींचा तोटा; ३१ पैकी ८ विभाग नफ्यात, STचा तोटा कमी करण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश
5
कधी राहुल गांधी, कधी खर्गे, आता सिद्धरामय्या! काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांच्या कानात काय बोलले मोदी? 'तो' फोटो देशभर व्हायरल!
6
हायप्रेशर स्टील ट्यूब फुटली अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं; ७०० डिग्री वाफेने वेढलं अन् १७ जणांचा कोळसा झाला
7
पाकिस्ताननं पाठवले १३००० सैनिक; आता सौदीने दिले ३ अब्ज डॉलर, एका सैनिकाची किंमत किती?
8
Latest Marathi News LIVE Updates: अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
9
IPL 2026: MS Dhoni च्या चाहत्यांची धाकधूक वाढली... १६ एप्रिलला 'थाला' मोठा निर्णय घेणार!
10
"उबाठा गट ताब्यात घेण्याचे संजय राऊतांचे प्रयत्न, आदित्य ठाकरेंशी 'सामना"; भाजपा नेत्याचा दावा
11
होर्मुझ तणावात पुतिन यांचा मास्टरस्ट्रोक! इराणी युद्धावर चीनमध्ये बनणार 'गेमप्लॅन'; अमेरिकेला शह?
12
२०२६चा पहिला गुरुपुष्यामृत योग कधी? ‘इतके’ तास आहे शुभ मुहूर्त; पाहा, महत्त्व अन् मान्यता
13
खळबळजनक! ओडिशातील सरकारी शाळेत अन्नातून विषबाधा; १०० विद्यार्थी आजारी, एकाचा मृत्यू
14
कानपूर किडनी रॅकेटचा असा झाला पर्दाफाश, गर्लफ्रेंडची एक चूक नडली अन् पकडला गेला गुन्हेगार!
15
Video - इन्स्टा रीलमुळे वाचला जीव; बोट दुर्घटनेवेळी मृत्यूशी झुंज, महिलेने सांगितला थरारक प्रसंग
16
Travel: ओमानमध्ये भारताचे १० हजार रूपये घेऊन जाताय; इतक्या पैशात काय काय खरेदी करू शकाल?
17
युक्रेनच्या रोबो आर्मीने केली कमाल, रशियन सैनिकांना सरेंडर करण्यास भाग पाडून पोस्टवर केला कब्जा
18
अक्षय्य तृतीयेपूर्वी २९३८ रुपयांनी महागलं सोनं, चांदीच्या दरातही १३ हजारांपेक्षा अधिक तेजी; पाहा नवे दर
19
'आप'ने राघव चड्ढांवर केली आणखी एक कारवाई; पंजाब सरकारने Z+' सुरक्षा काढून घेतली
20
“आयुष्यभराची इच्छा पूर्ण झाली”; कर्नाटकातील १४ काँग्रेस आमदार अयोध्येत, घेतले रामदर्शन
Daily Top 2Weekly Top 5

तीन हजारांत भारतात ‘एन्ट्री’

By admin | Updated: October 24, 2015 03:19 IST

बांगलादेशी नागरिकांना अवघ्या तीन हजार रुपयांत सीमेवरून भारतात ‘एन्ट्री’ दिली जात असल्याची कबुली दोन बांगलादेशी संशयित आरोपींनी पुसद पोलिसांपुढे दिली आहे.

- प्रकाश लामणे,  पुसद (यवतमाळ)बांगलादेशी नागरिकांना अवघ्या तीन हजार रुपयांत सीमेवरून भारतात ‘एन्ट्री’ दिली जात असल्याची कबुली दोन बांगलादेशी संशयित आरोपींनी पुसद पोलिसांपुढे दिली आहे. बनावट कागदपत्रांच्या तपासणीसाठी पुसद ग्रामीण पोलिसांनी मंगळवारी मुंबईच्या कारागृहातून मोहम्मद आझीम गाझी माजेद गाझी (२७) व हबीब ऊर्फ हबील रूबल शेख (२५) या संशयित आरोपींना ताब्यात घेतले. पुसदच्या न्यायालयाने त्यांना २५ आॅक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यांनी पोलिसांना सांगितले की, बांगलादेशच्या नडाईल जिल्ह्यातील रघुनाथपूर तालुक्याच्या कालिया येथील ते रहिवासी आहेत. त्यांनी तेथील ‘नुस्लम’ नामक एजंटाला प्रत्येकी तीन हजार रुपये दिले. त्याच्या माध्यमातून भारतीय सीमेपर्यंत व तेथून हावडा एक्स्प्रेसने मुंबईपर्यंत पोहोचविण्याची व्यवस्था केली गेली.दीड वर्षांपूर्वी हबीबचे वडील रूबल शेख (५०) यांनीसुद्धा भारतात घुसखोरी केली. त्यांनी भंगाराचा व्यवसाय सुरू केला. मोहम्मद आझीम व हबीब हे दोघे आठ महिन्यांपूर्वी भारतात घुसले. नवी मुंबई परिसरातील वडिलांच्या भंगार व्यवसायाला हातभार लावणे सुरू केले. दोन महिने हा व्यवसाय सुरळीत चालला. मात्र विनापरवाना भारतात घुसखोरी केल्याच्या आरोपावरून मुंबई पोलिसांनी आझीम व हबीब या दोघांना अटक केली. ठाणे न्यायालयाने त्यांना सहा महिन्यांची शिक्षा ठोठावली. हे दोघे कारागृहात असताना सलीम नावाच्या दलालाच्या माध्यमातून हबीबच्या वडिलांकडे मुंबईतील एक वकील आला. कारागृहात असलेल्या दोघांचेही भारतीयत्व सिद्ध करण्यासाठी बनावट कागदपत्रे बनवून देण्याची तयारी त्याने दर्शविली. मात्र त्यासाठी एक लाख रुपयांची मागणी केली. भारतीयत्वही मिळते आणि कारागृहातून सुटकाही होते, म्हणून रूबल शेख यांनी एक लाख रुपये दिले. त्या वकिलानेच पुसद तालुक्याच्या (यवतमाळ) वेणी (खुर्द) येथील महा ई-सेवा केंद्रातून बनावट कागदपत्रे तयार केली. हा प्रकार उघडकीस आल्याने पुसद पोलिसांनी याच गुन्ह्यात मो. आझीम व हबीब या यांना अटक केली आहे. केवळ अडीचशे किलोमीटरचे अंतरबांगलादेशातील बेनातल व भारतातील अंबासा (त्रिपुरा राज्य) ही बांगला-भारत सीमा आहे. रघुनाथपूरपासून या सीमेचे अंतर २५० किलोमीटर आहे. अशाच पद्धतीने दीड वर्षांपूर्वी हबीबचे वडील रूबल शेख (५०) यांनीसुद्धा भारतात घुसखोरी केली. त्यांनी आपली बनावट कागदपत्रे मुंबईतच तयार केली असून ते आता ‘भारतीय नागरिक’ बनले आहेत. त्यांनी मुंबईतच भंगाराचा व्यवसाय सुरू केला, अशी माहिती त्यांनी दिल्याचे पोलिसांनी सांगितले.दोन महिने हा व्यवसाय सुरळीत चालला. मात्र विनापरवाना भारतात घुसखोरी केल्याच्या आरोपावरून मुंबई पोलिसांनी आझीम व हबीब या दोघांना अटक केली. ठाणे न्यायालयाने त्यांना सहा महिन्यांची शिक्षा ठोठावली. याप्रकरणी वकील आणि रूबल शेख हे पोलिसांना हुलकावण्या देत आहेत.