राज्यात तीन खासगी विद्यापीठे

By Admin | Updated: June 29, 2014 01:33 IST2014-06-29T01:33:42+5:302014-06-29T01:33:42+5:30

पुण्यातील एमआयटीसह अजिंक्य विद्यापीठ आणि पनवेल येथील एका विद्यापीठाला खासगी विद्यापीठ म्हणून मान्यता दिली जाईल.

Three private universities in the state | राज्यात तीन खासगी विद्यापीठे

राज्यात तीन खासगी विद्यापीठे

>पुणो : राज्यात यावर्षी आणखी तीन खासगी विद्यापीठे अस्तित्वात येणार असून, त्यामध्ये पुण्यातील एमआयटीसह अजिंक्य विद्यापीठ आणि पनवेल येथील एका विद्यापीठाला खासगी विद्यापीठ म्हणून मान्यता दिली जाईल. काही दिवसांपूर्वीच राज्य शासनाने अमिटी आणि स्पायसर या दोन संस्थांना खासगी विद्यापीठांचा दर्जा दिला होता. त्यापाठोपाठ आगामी मंत्रिमंडळ बैठकीत आणखी तीन विद्यापीठांना मान्यता दिली जाणार असल्याची माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री राजेश टोपे यांनी शनिवारी दिली. 
राज्यातील विविध 22 शैक्षणिक संस्थांनी खासगी विद्यापीठासाठी उच्च व तंत्र शिक्षण विभागाकडे प्रस्ताव दिले आहेत. त्यापैकी 11 संस्थांच्या प्रस्तावांनुसार पाहणी करण्यात आली असून, त्यांचे अहवालही मिळाले आहेत. प्रत्येक विद्यापीठाचा स्वतंत्र कायदा असल्याने या विद्यापीठांचा कायदा विधिमंडळात मान्य करावा लागतो. ही विद्यापीठे चालू शैक्षणिक वर्षातच सुरू व्हावीत यासाठी तीनही विद्यापीठांची अधिसूचना काढली जाईल. त्यानुसार राज्यात यावर्षी पाच खासगी विद्यापीठे सुरू होतील, असे टोपे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)

Web Title: Three private universities in the state