शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
2
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
3
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
4
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
5
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
6
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
7
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
8
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
9
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
10
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
11
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
12
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
13
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
14
तिजोरी रिकामी, कर्ज भारी! पाकिस्तानवर अमेरिकेचे नेमके किती कर्ज आहे?
15
आवडली नाही तर पैसे परत! 75% 'बायबॅक गॅरंटी'सह जबरदस्त SUV लॉन्च, जाणून घ्या किंमत...
16
Travel : चमत्कार! 'या' कुंडात फळे तरंगतात, पण बेलपत्र मात्र बुडतात; पाण्याखाली आहे महादेवाचे मंदिर! तुम्ही पाहिलेय का?
17
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
18
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
19
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
20
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
Daily Top 2Weekly Top 5

अपहरणाचा आरोप असलेले 3 पोलीस निलंबित, 14 लाखाच्या लुटमारीचे प्रकरण

By admin | Updated: March 15, 2017 21:35 IST

चलनातून बाद झालेल्या 14 लाखांच्या नोटां हड़प करणारे नागपूर ग्रामीण मधील 3 पोलीस निलंबित करण्यात आले.

ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. 15 - चलनातून बाद झालेल्या १४ लाखांच्या नोटां हड़प करणारे नागपूर ग्रामीण मधील 3 पोलीस  निलंबित करण्यात आले. शशी शेंडे, मंगेश डांगे, अमोल नागरे अशी या पोलीस कर्मचा-यांची नावे असून, ते नागपूर ग्रामीण पोलीस दलातील स्थानिक गुन्हे शाखेत कार्यरत होते.  त्यांच्यावर शनिवारी अपहरण आणि लुटमारीचा गुन्हा दाखल झाला होता.  
 
८ मार्चला या तिघांनी खापा पोलीस ठाण्याच्या हद्दीत शारिक शेख (नागपूर) आणि राजू तिरपुडे (खापरखेडा) तसेच विशाल नामक तरुण बसून असलेली कार रोखली होती. कारची झडती घेतल्या तेव्हा त्यात जुन्या (चलनातून बाद झालेल्या) ५०० आणि १००० च्या  २८ लाखांच्या आढळल्या होत्या. त्या नोटा जप्त करून कायदेशिर कारवाई करण्याऐवजी या पोलिसांनी शारिक, राजू तसेच विशालला धाक दपट करून भेंडाळा गावाजवळ नेले. त्यानंतर त्यातील १४ लाख रुपये या तिघांनी काढून घेतले अन् कोणतीही कारवाई न करता तिघांना सोडून दिले. या प्रकरणाची तक्रार शारिकने गुन्हेशाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय  पुरंदरे यांच्याकडे शनिवारी दुपारी केली. पुरंदरे यांनी लगेच पोलीस अधीक्षक शैलेष बलकवडे यांना माहिती दिली.  प्रकरणाचा तपास सुरू होताच शेंडे, डांगे आणि नागरेने हे प्रकरण दडपण्यासाठी  विशाल बानोडे आणि अन्ना नामक दलालांच्या माध्यमातून वरिष्ठ ;पोलीस अधिका-यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणाची  कसून चौकशी सुरू होती. लोकमतने हे प्रकरण रविवारी प्रकाशित करताच प्रशासनात खळबळ उडाली. त्यानंतर रविवार रात्री उशिरा  शशी शेंडे, मंगेश डांगे, अमोल नागरे या तिघांवर कलम ३६३ (अपहरण) आणि ३९२ (लुटमार) अन्वये सावनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यांच्यासह विशाल बानोडे आणि अण्णा नामक दलालाही पोलिसांनी सहआरोपी केले आहे.  बानोडे यानेच या घटनेची पोलिसांना टीप दिली होती आणि त्यानेच नंतर दोन लाखांचे आमिष दाखवून प्रकरणात खोटी माहिती देऊन या तिघांच्या बचावाचा प्रयत्न केला होता, असे तपासात उघड झाले, त्यामुळे या दोघांना अटक करण्यात आली.
दरम्यान लोकमतने हे प्रकरण लावून धरले. त्यानंतर आज बुधवारी या तिघांच्या निलंबनाचे आदेश काढण्यात आले.
8 दिवसात 10 निलंबित
कर्तव्यात निष्काळजीपणा करून अवैध धंदेवाल्यांना खुली सुट देणा-या तीन पोलीस उपनिरीक्षक तसेच चार कर्मचा-यांना पोलीस अधीक्षक बलकवडे यांनी 7 मार्चला निलंबीत केले होते. या घटनेला आज 8 दिवस झाले. त्यानंतर आता या तिघांना निलंबित करण्यात आले. 
लोकमतचे वृत्त खरे ठरले
दोषी पोलिसांना बुधवारी निलंबीत केले जाईल, असे वृत्त आज लोकमतने प्रकाशित केले, ते खरे ठरले.