शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
2
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
3
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
4
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
5
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
6
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
7
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
8
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
9
महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
10
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
11
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
12
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
13
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
14
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
15
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
16
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
17
Ruturaj Gaikwad चा संघर्ष संपला! CSK संकटात असताना पुणेकराचा ‘वन मॅन आर्मी’ शो
18
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
19
बँकेतून काढलेले १५ लाख घरी ठेवले आणि नंतर जमा केले; आयकर विभागाने कर लावला, महिलेने दाद मागितली...
20
Vaibhav Suryavanshi Injury : विक्रमी सेंच्युरीनंतर वैभव सूर्यवंशी दुखापतग्रस्त; तो पुढील सामन्यात खेळणार का?
Daily Top 2Weekly Top 5

बेलापूरच्या पोलीस निरीक्षकासह तिघे गजाआड

By admin | Updated: September 23, 2014 05:17 IST

सीबीडी बेलापूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक संजय कार्यकर यांच्यासह तिघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) ९० हजारांची लाच स्वीकारल्यानंतर गजाआड केले.

मुुंबई : सीबीडी बेलापूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक संजय कार्यकर यांच्यासह तिघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) ९० हजारांची लाच स्वीकारल्यानंतर गजाआड केले. एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, कार्यकर यांच्यासह बेलापूर पोलीस ठाण्याचा पोलीस हवालदार भास्कर बोबले आणि त्याचा साथीदार (खाजगी) आरीफ अबीब मोहंमद शेख अशी आरोपींची नावे आहेत.निवृत्त सरकारी वैद्यकीय अधिकाऱ्याच्या तक्रारीवरून मुंबई एसीबी विभागाने ही कारवाई केली. फिर्यादीविरोधात बेलापूर पोलीस ठाण्यात मालमत्तेसंदर्भात तक्रार आली होती. वरिष्ठ निरीक्षक कार्यकर यांनी फिर्यादीला अटक न करण्यासाठी व चॅप्टर प्रक्रिया सुरू न करण्यासाठी एक लाख रुपयांची मागणी केली. तडजोडीअंती ९० हजार स्वीकारण्याचे कबूल केले. तसेच ही रक्कम हवालदार बोबलेला देण्यास फिर्यादीला बजावले. मात्र लाच देण्याची इच्छा नसल्याने फिर्यादीने एसीबीच्या मुंबई विभागाकडे तक्रार दिली. तक्रारीतील तत्थ्यता पडताळून एसीबीने गुन्हा नोंदवला. आरोपींनी बेलापूरच्या सेक्टर ११ येथील एका हॉटेलच्या आसपास फिर्यादीला लाचेची रक्कम घेऊन बोलावले होते. एसीबीने तेथेच सापळा रचला. ठरल्याप्रकरणी फिर्यादी व आरोपींची भेट घडली. हवालदार बोबलेने फिर्यादीला ९० हजारांची रोकड खासगी साथीदार आरीफकडे देण्यास सांगितले. आरीफने ही रक्कम स्वीकारताच दबा धरून बसलेल्या एसीबी अधिकाऱ्याने त्याच्यासह बोबलेला ताब्यात घेऊन अटक केली. त्यानंतर कार्यकर यांनाही गजाआड करण्यात आले, अशी माहिती एसीबीने दिली. (प्रतिनिधी)