शहरं
Join us  
Trending Stories
1
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
2
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
3
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
4
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
5
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
6
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर; ३१ जानेवारी २०२६ पर्यंत मुदतवाढ, सुप्रीम कोर्टात काय घडलं?
7
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
8
भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेवरच उलटू शकते, जाणून घ्या का?
9
गायीने कहरच केला... धावता-धावता उडी मारून थेट कौलावरच चढली, Video पाहून व्हाल थक्क
10
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? काय करावे उपाय? वाचा
11
सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!
12
झोमॅटोने रचला नवा विक्रम! टाटा-अदानी समुहातील मोठ्या कंपन्यांनाही 'या' बाबतीत टाकलं मागे
13
"जे झालं ते अचानक अन् चुकून झालं"; BMW कार अपघातातील आरोपी मागतेय जामीन
14
अपोलो टायर्स प्रत्येक मॅचमागे ४.५ कोटी रुपये मोजणार; टीम इंडियाला नवा स्पॉन्सर मिळाला
15
इस्राइल-गाझाचं उदाहरण देत शाहिद आफ्रिदीने भारताविरोधात ओकली गरळ, मोदींबाबत म्हणाला... 
16
धोक्याची घंटा! कच्ची केळी बादलीत टाकली अन् १ मिनिटात पिकली; लोकांच्या जीवाशी खेळ?
17
दबंग सून... मध्यरात्री गुंडांना घेऊन सासरी आली आणि केला धडाधड गोळीबार, त्यानंतर...  
18
IND vs PAK: पाकिस्तान जय शाहला घाबरला; आधी 'बड्या बाता' केल्या, आता गपचूप बसला, काय घडलं?
19
स्विगीने खास पुणेकरांसाठी लाँच केले 'Toing' ॲप; केवळ ५० रुपयांत मिळणार भरपेट जेवण, काय आहे वैशिष्ट्ये?

कोरोना गेल्यानंतर काँग्रेसवर संकट, तीन मोठे नेते पक्ष सोडणार; पाटील यांचा खळबळजनक दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2020 14:23 IST

बाळासाहेब थोरात यांनी काँग्रेस सांभाळावी; चंद्रकांत पाटील यांचा सल्ला

मुंबई: विधान परिषदेची उमेदवारी नाकारण्यात आल्यानं भाजपावर नाराज असलेल्या एकनाथ खडसेंनी पक्षावर जोरदार निशाणा साधला. यानंतर आता खडसेंच्या आरोपांना भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रत्तुतर दिलं आहे. खडसेंना गळाला लावायचा प्रयत्न करणाऱ्या काँग्रेसचा पाटील यांनी समाचार घेतला. काँग्रेसला राज्यासह देशात कोणतंही भवितव्य नाही. कोरोनाचं संकट दूर झाल्यानंतर काँग्रेसचे तीन बडे नेते पक्ष सोडणार असल्याचा खळबळजनक दावा पाटील यांनी केला आहे. विधान परिषदेची उमेदवारी न मिळाल्यानं भाजपावर नाराज असलेल्या एकनाथ खडसेंना स्वत:कडे खेचण्यासाठी काँग्रेसचे प्रयत्न सुरू आहेत. खडसे काँग्रेसमध्ये आले, तर त्यांचं स्वागतच आहे, असं पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले होते. त्यावर थोरात यांनी आधी स्वत:चा पक्ष सांभाळावा, असा खोचक सल्ला चंद्रकांत पाटील यांनी दिला. तुम्ही राजघराणातल्या ज्योतिरादित्य सिंधियांना सांभाळू शकला नाहीत, याची आठवण त्यांनी करून दिली. चंद्रकांत पाटील एबीपी माझासोबत बोलत होते.कोरोनाचं संकट दूर झाल्यानंतर काँग्रेसचे तीन मोठे नेते पक्ष सोडणार असल्याचा खळबळजनक दावा पाटील यांनी केला. दोन तरुण आणि एक वरिष्ठ नेता काँग्रेसला रामराम करणार असल्याचं पाटील म्हणाले. मात्र अज्ञानात सुख असतं असं म्हणत त्यांनी यावर अधिक बोलणं टाळलं. काँग्रेस राज्यातल्या सरकारमध्ये आहे. मात्र कोरोनाविरुद्धच्या लढ्यात पक्ष कुठेच दिसत नाही. केवळ आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जनतेशी संवाद साधतात. त्यातही टोपे सध्या बोलतच नाहीत, तर मुख्यमंत्री फक्त घरूनच बोलतात. या सगळ्यात काँग्रेस कुठे आहे, असा सवाल पाटील यांनी विचारला.विधानपरिषदेच्या दोन जागांसाठी काँग्रेस आग्रही होती. मात्र उद्धव ठाकरेंनी दम देताच काँग्रेसनं लगेच एक जागा सोडली. विधान परिषद निवडणुकीत दुसरी जागा मिळवू न शकणारा पक्ष खडसेंना काय देणार, असा प्रश्न पाटील यांनी उपस्थित केला. कोरोनाचं संकट गेल्यानंतर काँग्रेसमध्ये मोठे भूकंप होणार आहेत. देशात तीन, तर राज्यात असंख्य भूकंप होणार आहेत. थोरात यांनी यावर काम करावं, असं पाटील म्हणाले. खडसेंना सांभाळणं सोपं नसल्याचंदेखील पाटील यांनी म्हटलं.आर्थिक पॅकेजमधून कोणाला काय मिळणार; अर्थमंत्री संध्याकाळी महत्त्वाच्या घोषणा करणारमोदींकडून लॉकडाऊन सुरु ठेवण्याचे संकेत; १७ मेनंतर 'असा' असेल देश? …म्हणजे २० लाख कोटी नव्हे तर १४ लाख कोटी पॅकेजची होणार नवीन घोषणा!...तर आपण विश्वासार्ह जागतिक शक्ती बनू; मोदींच्या महापॅकेजचं उद्योगजगताकडून कौतुक२० लाख कोटींमध्ये शून्य किती?; अनुपम खेर यांनी सांगितलं गणित तर अर्थमंत्र्यांचीही झाली चूक

टॅग्स :chandrakant patilचंद्रकांत पाटीलcongressकाँग्रेसBJPभाजपाBalasaheb Thoratबाळासाहेब थोरातUddhav Thackerayउद्धव ठाकरेcorona virusकोरोना वायरस बातम्या