CoronaVirus News: आर्थिक पॅकेजमधून कोणाला काय मिळणार; अर्थमंत्री संध्याकाळी महत्त्वाच्या घोषणा करणार

By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2020 10:46 AM2020-05-13T10:46:31+5:302020-05-13T11:01:37+5:30

CoronaVirus News: पंतप्रधान मोदींनी जाहीर केलेल्या २० लाख कोटी रुपयांच्या पॅकेजचा तपशील अर्थमंत्री जाहीर करणार

CoronaVirus finance minister Nirmala Sitharaman to address media today over economic package announced by pm modi kkg | CoronaVirus News: आर्थिक पॅकेजमधून कोणाला काय मिळणार; अर्थमंत्री संध्याकाळी महत्त्वाच्या घोषणा करणार

CoronaVirus News: आर्थिक पॅकेजमधून कोणाला काय मिळणार; अर्थमंत्री संध्याकाळी महत्त्वाच्या घोषणा करणार

Next

नवी दिल्ली: कोरोना संकटाचा सामना करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काल २० लाख कोटी रुपयांच्या पॅकेजची घोषणा केली. सर्व घटकांचा विचार करून तयार करण्यात आलेल्या पॅकेजमुळे देश स्वावलंबी होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या पॅकेजमधल्या तरतुदींची माहिती आज अर्थमंत्री निर्मला सीतारामन देणार आहेत. संध्याकाळी ४ वाजता त्या पत्रकार परिषद घेतील. स्वावलंबी भारत पॅकेजमधून कोणत्या क्षेत्राला काय मिळणार, याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलं आहे. 




अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी, देशाला स्वावलंबी करण्यासाठी काल मोदींनी स्वावलंबी भारत पॅकेजची घोषणा केली. अर्थव्यवस्थेतल्या प्रत्येक घटकाला पॅकेजमधून दिलासा मिळेल, असा विश्वास मोदींनी बोलून दाखवला. या पॅकेजची माहिती अर्थमंत्री उद्या देतील, असं मोदींनी म्हटलं होतं. आज संध्याकाळी ४ वाजता पत्रकार परिषद घेऊन अर्थमंत्री निर्मला सीतारामन पॅकेजमधल्या तरतुदींची माहिती देणार आहेत. मोदींनी जाहीर केलेल्या पॅकेजची माहिती दोन-तीन टप्प्यांमध्ये दिली जाणार असल्याचं अर्थ मंत्रालयाचे प्रमुख सल्लागार संजीव सन्याल यांनी सांगितलं.

कोरोना संकटाचा सामना करण्यासाठी मोदी सरकार मोठ्या आर्थिक पॅकेजची घोषणा करेल, अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. देशातल्या सर्वच मुख्यमंत्र्यांकडून तशी मागणी केली जात होती. काल देशाला संबोधित करताना मोदींनी आर्थिक पॅकेजची घोषणा केली. 'कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी सरकार २० लाख कोटी रुपयांचं पॅकेज जाहीर करत आहे. हे पॅकेज देशाच्या सकल उत्पन्नाच्या १० टक्के इतकं आहे,' असं मोदींनी काल सांगितलं. 

आर्थिक पॅकेजमध्ये सगळ्या घटकांचा विचार करण्यात आला असून त्यामधून कुटीर, लघु, मध्यम उद्योगांना दिलासा मिळेल. प्रामाणिकपणे कर भरणाऱ्या मध्यमवर्गाला आर्थिक पॅकेजचा फायदा होईल. भारतीय उद्योग जगताला यामुळे नवं सामर्थ्य मिळेल, असा विश्वास मोदींनी व्यक्त केला. आर्थिक पॅकेजमुळे देशाच्या विकासाला गती मिळेल, देश स्वावलंबी होईल, असंदेखील पंतप्रधान पुढे म्हणाले.


मोदींकडून लॉकडाऊन सुरु ठेवण्याचे संकेत; १७ मेनंतर 'असा' असेल देश? 

…म्हणजे २० लाख कोटी नव्हे तर १४ लाख कोटी पॅकेजची होणार नवीन घोषणा!

...तर आपण विश्वासार्ह जागतिक शक्ती बनू; मोदींच्या महापॅकेजचं उद्योगजगताकडून कौतुक

२० लाख कोटींमध्ये शून्य किती?; अनुपम खेर यांनी सांगितलं गणित तर अर्थमंत्र्यांचीही झाली चूक

Read in English

Web Title: CoronaVirus finance minister Nirmala Sitharaman to address media today over economic package announced by pm modi kkg

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.