शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ मे रोजी मतदान, महायुती वरचढ ठरणार
2
Latest Marathi News LIVE Updates: लोकसभेत सीमांकन विधेयकावर चर्चा सुरू, उद्या दुपारी ४ वाजता मतदान
3
परतवाडा व्हिडीओकांड ते बंगालमधील फसवणूक! अयान तनवीर आणि आनंदचे अनेक महिलांशी संबंध; धक्कादायक खुलासा
4
हाफिज सईदच्या खास माणसावर बेछुट गोळीबार; लष्करचा संस्थापक अमीर हमजा मृत्यूच्या दारात
5
“भारताच्या अर्ध्या लोकसंख्येत मुस्लिम महिलांचा समावेश होत नाही का?”; अखिलेश यादवांचा सवाल
6
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा पिण्यापूर्वी की नंतर... कधी पाणी पिणं ठरेल आरोग्यासाठी घातक?
7
जगातील फक्त १६ देशांमध्ये महिला राष्ट्राध्यक्षा; जागतिक राजकारणात किती आहे भागीदारी?
8
PPF मध्ये ₹१२,००० ची बचत तुम्हाला बनवू शकते कोट्यधीश, मिळणार हमखास परतावा; आणखी कोणते आहेत फायदे?
9
चैत्र अमावस्या २०२६: चैत्र अमावास्येला दुपारी १२ नंतर 'या' ७ राशींना सतर्कतेचा इशारा; पण का? वाचा!
10
"मी वैतागलो होतो, म्हणून आईला मारून टाकलं" मुलाचं ऐकून पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली!
11
तुमची एक चूक आणि FASTag होईल ब्लॅकलिस्ट; पटापट करा 'हे' काम; NHAI चे बँकांना महत्त्वाचे निर्देश
12
महागाई ३८ महिन्यांच्या उच्चांकावर! पश्चिम आशियातील युद्धाचा थेट परिणाम भारतीय नागरिकांवर
13
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
14
“भारताशी आमचे संबंध ५ हजार वर्ष जुने, युद्धानंतर आणखी मजबूत होणार”; इराणचे नेते थेट बोलले
15
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
16
Ashok Kharat : 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक
17
"त्यांनी भोंदूबाबाचा सगळा प्रकार संवेदनशीलतेने हाताळला..."; प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं केलं कौतुक
18
Rasikh Salam Dar: वय लपवलं, BCCI कडून २ वर्षांची बंदी; शिक्षकाचा मुलगा RCB साठी कसा बनला ‘कमबॅक किंग’?
19
इराणमध्ये पहिल्यांदाच महिलेला फाशीची शिक्षा; कोण आहे Bita Hemmati? तिच्यावर नेमका आरोप काय?
20
३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ शेतकऱ्यांच्या कुटुंबांना दत्तक घेणार

By admin | Updated: December 11, 2015 01:52 IST

दुष्काळ, नापिकी आणि कर्जाच्या दडपणाखाली आत्महत्या केलेल्या राज्यातील २५० शेतकरी कुटुंबांना दत्तक घेण्याची घोषणा आदिशक्ती फाउंडेशनने गुरुवारी पत्रकार परिषदेत केली.

मुंबई : दुष्काळ, नापिकी आणि कर्जाच्या दडपणाखाली आत्महत्या केलेल्या राज्यातील २५० शेतकरी कुटुंबांना दत्तक घेण्याची घोषणा आदिशक्ती फाउंडेशनने गुरुवारी पत्रकार परिषदेत केली. फाउंडेशनचे पाच सदस्य या कुटुंबासाठी खर्च करणार असून, बिहारचे माजी राज्यपाल डी.वाय पाटील हे त्यांचे मुख्य पालक असतील.फाउंडेशनचे अध्यक्ष दत्ता पवार म्हणाले की, ‘आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबाना आर्थिक मदत न देता, त्यांना स्वावलंबी करण्याचा उपक्रम फाउंडेशनने हाती घेतला आहे. त्यात कोणत्याही कुटुंबाचे कर्ज फेडणार नसून, कुटुंबाला स्वत:च्या पायावर उभे करण्यास फाउंडेशन मदत करेल, जेणेकरून पुन्हा आत्महत्येच्या वाटेला शेतकऱ्याला जाण्याची गरज भासणार नाही. सुरुवातीला मराठवाड्यातील बीड, जालना, उस्मानाबाद, परभणी आणि लातूर जिल्ह्यातील १२५ कुटुंबांना दत्तक घेतले जाईल. त्यानंतर आणखी १२५ कुटुंबाची जबाबदारी फाउंडेशन घेणार आहे. एकूण १८ महिन्यांत तीन टप्प्यांत हा उपक्रम राबवला जाईल. पहिल्या टप्प्यात कुटुंबातील विद्यार्थ्यांचे शिक्षण पूर्ण करणे, आजारी व्यक्तींना वैद्यकीय मदत, बियाणे आणि खतांचा पुरवठा करणे, अशा मूलभूत गरजांकडे लक्ष दिले जाईल.’ दुसऱ्या टप्प्यात शेतीशी संबंधित गाय पालन, कुक्कुटपालन असा एखादा जोडधंदा कुटुंबाला सुरू करून दिला जाईल, जेणेकरून पाऊस झाला नाही, तरी कुटुंबाला उदरनिर्वाहाचे साधन उपलब्ध असेल, तर तिसऱ्या टप्प्यात शेतीला विकसित करण्यासाठी नियोजित आणि शास्त्रीय पद्धतीसह तंत्रज्ञानाची मदत घेऊन दिली जाईल. त्यात कमी पाण्यात कोणती चांगली पिके घेता येईल, याची माहिती दिली जाईल. काही खासगी कंपन्या त्यात मदत करतील.पाच जिल्ह्यांचे पाच पालकया उपक्रमात पाच जिल्ह्यांचे पालकत्व पाच फाउंडेशनच्या पाच सदस्यांनी घेतले आहे. त्यात लातूरचे पालकत्व अभिनेता रितेश देशमुख, परभणीचे पालकत्व कांताराव देशमुख, उस्मानाबादचे पालकत्व शंकरराव बोरकर, बीडचे पालकत्व शिवराम घोडके आणि जालन्याचे पालकत्व कृष्णा अष्टेकर यांनी घेतले आहे. (प्रतिनिधी)