"हा भोंदू कधीही सैन्यदलात, नौदलात नव्हता, तर...", संभाजीराजे छत्रपतींचा अशोक खरातबद्दल धक्कादायक गौप्यस्फोट

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2026 13:07 IST2026-03-21T13:04:22+5:302026-03-21T13:07:10+5:30

Ashok Kharat Sambhajiraje Chhatrapati: नाशिक जिल्ह्यातील सिन्नरमध्ये स्वतःला ज्योतिषाचार्य भासवून महिलांवर अत्याचार करणाऱ्या अशोक खरातकडून सेवानिवृत्त कॅप्टन असल्याचा दावा केला जात होता. याबद्दल संभाजीराजे छत्रपतीी यांनी दावा केला आहे. 

"This impostor was never in the army or navy, so...", Sambhajiraje Chhatrapati's shocking revelation about Ashok Kharat | "हा भोंदू कधीही सैन्यदलात, नौदलात नव्हता, तर...", संभाजीराजे छत्रपतींचा अशोक खरातबद्दल धक्कादायक गौप्यस्फोट

"हा भोंदू कधीही सैन्यदलात, नौदलात नव्हता, तर...", संभाजीराजे छत्रपतींचा अशोक खरातबद्दल धक्कादायक गौप्यस्फोट

अनेक महिलांवर लैंगिक अत्याचार केल्याच्या प्रकरणात अटकेत असलेला अशोक खरात स्वतःला कॅप्टन म्हणून सांगायचा. नौदलातून सेवानिवृत्त झाल्याचे दावे त्याने केले आहेत. पण, माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी अशोक खरात हा देशाच्या सैन्य दलात किंवा नौदलात नव्हता असे सांगत त्याच्या कॅप्टन पदावर गौप्यस्फोट केला आहे. त्याचबरोबर त्याच्या नावासमोर कॅप्टन पद लावून नका असे आवाहनही संभाजीराजे छत्रपती यांनी केले आहे. 

अशोक खरातने १०० पेक्षा अधिक महिलांना भीती दाखवून, धमक्या देऊन अत्याचार केल्याची माहिती समोर आली आहे. हे कृत्ये करतानाचे सीसीटीव्हीमध्ये कैद झालेले व्हिडीओही पोलिसांच्या हाती लागले आहेत. या प्रकरणाने महाराष्ट्रात खळबळ माजलेली असतानाच संभाजीराजे छत्रपती यांनी अशोक खरात नौदलात नव्हता, असा दावा केला आहे. 

अशोक खरात स्वयंघोषित कॅप्टन

संभाजीराजे छत्रपती यांनी एका पोस्टमध्ये म्हटले आहे की, "कॅप्टन हे भारतीय लष्करातील अत्यंत सन्मानाचे पद आहे. या पदापर्यंत पोहोचणारा व्यक्ती अतिशय मेहनतीने, जिद्दीने व प्रखर राष्ट्रभक्तीने इथेपर्यंत पोहोचत असतो. भारतीय सेनादलांत या पदावर सेवा बजावणाऱ्या किंवा या पदावरून निवृत्त झालेल्या व्यक्तींनाचा नावासोबत “कॅप्टन” हे पद जोडण्याचा अधिकार असतो."

"सर्व जनतेला आणि विशेषत: माध्यमांना माझी विनंती आहे की, घृणास्पद कृत्ये करणाऱ्या भोंदूच्या नावापुढे कुठेही हे पद लावू नये. हा भोंदूबाबा कधीही आपल्या सैन्यदलात अथवा नौदलात नव्हता. कधीकाळी व्यावसायिक व्यापारी जहाजांवर कर्मचारी असलेला हा व्यक्ती स्वयंघोषित कॅप्टन आहे. त्याने स्वतःला लावून घेतलेली खोटी पदवी आपण संमत करून नकळत आपल्या सैन्यदलांचा अपमान करू नये", असे आवाहन संभाजीराजे छत्रपती यांनी केले आहे. 

अशोक खरातचे सरकारी अधिकाऱ्यांशी लागेबांधे

नराधम अशोक खरातचे अनेक शासकीय अधिकाऱ्यांशी लागेबांधे असल्याचे उघड होत असून, त्यात खास करून महसूल विभागासह अन्य खात्यातील अधिकाऱ्यांशीही संबंध असल्याचे बोलले जाते. 

यातील अनेक अधिकाऱ्यांचे कुटुंब खरातच्या भक्तमंडळात सहभागी असून, त्यांचे व्यावसायिक संबंध असल्याचीही चर्चा आहे. बड्या नेत्यांकडून सोयीची कामे मार्गी लावण्यासाठी तसेच बढती, बदलीसाठी काही अधिकारी खरातशी संपर्कात असल्याची चर्चा आहे.
   
खरातची ५०० कोटींची संपत्ती 

अशोक खरातच्या प्रॉपर्टीची यादीही समोर आली आहे. नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्यांत ३० हून अधिक ठिकाणी प्लॉट्स खरेदी केल्याचे समोर आले आहे. खरातच्या सर्व जमिनींची किंमत जवळपास ५०० कोर्टीच्या घरात असण्याची शक्यता आहे.

Web Title : अशोक खरात कभी सेना में नहीं थे: संभाजीराजे छत्रपति का खुलासा

Web Summary : संभाजीराजे छत्रपति ने खुलासा किया कि यौन उत्पीड़न के आरोप में गिरफ्तार अशोक खरात ने नौसेना में सेवा और 'कैप्टन' रैंक का झूठा दावा किया। उन्होंने मीडिया से इस उपाधि का प्रयोग बंद करने का आग्रह किया, और खरात के सरकारी अधिकारियों और संपत्तियों के साथ कथित संबंधों को उजागर किया।

Web Title : Ashok Kharat Never Served in Military: Sambhajiraje Chhatrapati Exposes Fraud

Web Summary : Sambhajiraje Chhatrapati revealed Ashok Kharat, arrested for sexual assault, falsely claimed naval service and 'Captain' rank. He urged media to stop using the title, exposing Kharat's alleged connections with government officials and vast properties.