शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
2
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
3
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
4
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
5
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
6
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
7
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
8
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
9
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
10
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
11
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
12
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
13
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
14
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
15
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
16
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
17
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
18
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
19
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
20
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
Daily Top 2Weekly Top 5

तिसरी विशेष फेरी आजपासून

By admin | Updated: August 24, 2016 01:02 IST

केंद्रीय प्रवेश नियंत्रण समितीने इयत्ता अकरावी प्रवेशाच्या तिसऱ्या विशेष फेरीचे वेळापत्रक जाहीर केले आहे.

पुणे : केंद्रीय प्रवेश नियंत्रण समितीने इयत्ता अकरावी प्रवेशाच्या तिसऱ्या विशेष फेरीचे वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यानुसार बुधवारपासून (दि. २४) विद्यार्थ्यांना आॅनलाइन पसंती क्रम अर्ज भरता येणार आहे. दरम्यान, दुसऱ्या विशेष फेरीत १ हजार ८२९ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केले आहेत. पुणे व पिंपरी-चिंचवडमधील कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये अकरावी प्रवेशासाठी केंद्रीय समितीमार्फत प्रवेशप्रक्रिया राबविली जात आहे. सध्या विशेष फेरीतून विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जात आहे. या फेरीतील दुसरा टप्पा मंगळवारी पूर्ण झाला. दुसऱ्या फेरीसाठी एकूण ४ हजार ३५२ विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. त्यापैकी २ हजार ८८८ विद्यार्थ्यांची प्रवेशासाठी निवड करण्यात आली. यातील १ हजार ८२९ विद्यार्थ्यांनी संंबंधित महाविद्यालयात प्रवेश घेतले आहेत. अद्याप प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांसाठी तिसरी विशेष फेरी घेतली जाणार आहे. या फेरीसाठी बुधवारी दुपारी दोन वाजता रिक्त जागांची माहिती जाहीर केली जाणार आहे. या फेरीसाठी दि. २४ व २५ आॅगस्ट रोजी विद्यार्थ्यांना पुन्हा आॅनलाइन पसंतीक्रम अर्ज भरावा लागेल. त्यानुसार दि. २६ आॅगस्ट रोजी गुणवत्ता यादी जाहीर केली जाईल. या यादीनुसार दि. २७ आणि दि. २९ व ३० आॅगस्टपर्यंत विद्यार्थ्यांना संंबंधित महाविद्यालयात प्रवेश घ्यावा लागेल. दुसऱ्या विशेष फेरीप्रमाणे महाविद्यालयनिहाय रिक्त जागा व कटआॅफ पाहून किमान ५ व कमाल १५ पसंतीक्रम भरावे लागतील. >विद्यार्थ्यांनी यापूर्वी प्रवेश फेऱ्यांमध्ये मिळालेल्या महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेतला असेल, तर त्या महाविद्यालयाचा पसंतीक्रम टाकू नये, असे आवाहन समितीचे अध्यक्ष व विभागीय शिक्षण संचालक दिनकर टेमकर यांनी केले आहे. पुढील प्रवेशफेरी दहावी फेरपरीक्षेच्या निकालानंतर घेतली जाणार असून, त्याबाबतचे वेळापत्रक नंतर जाहीर केले जाणार असल्याचे टेमकर यांनी सांगितले.