शहरं
Join us  
Trending Stories
1
येत्या ४ जूनला मनेरचा लाडू तयार ठेवा, या लाडूत मोठे सामर्थ्य- पंतप्रधान मोदी
2
अजित पवार यांच्या रडारवर येणार तरी कोण? चर्चेला उधाण; निकालाची उत्सुकता शिगेला
3
दिल्लीतही मोठी आग, बेबी केअर सेंटरमध्ये ७ नवजात बालकांचा मृत्यू, ५ गंभीर जखमी
4
आजचे राशीभविष्य: उत्पन्नात वाढ, विदेश व्यापारात लाभ; नशिबाची साथ, येणी वसूल होतील
5
लोकसभेनंतर विधानपरिषदेतही उद्धवसेनेची उमेदवारीची घाई; मुंबई पदवीधर मतदारसंघातून अनिल परब!
6
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींवर बाप्पाची कृपा, शासकीय कामात लाभ; पदोन्नती योग; व्यापारवृद्धी!
7
वेळ बदलली, त्यामुळे चेहरा बदलला आहे...; भुजबळ समर्थकांच्या रील्समुळे पुन्हा चर्चेला उधाण
8
पुणे पोर्शे कार अपघात प्रकरण विशेष लेख: 'बाळा'ने खरंच दोघांचा जीव घेतला का..?
9
विशेष लेख: सीईटी द्यायच्या तरी किती? भारंभार परीक्षांच्या माऱ्यांमुळे कॉलेज जीवन संपुष्टात
10
विषमुक्त अन्नधान्यासाठी रासायनिक, सेंद्रिय नव्हे, नैसर्गिक शेतीच सर्वोत्तम- गुजरातचे राज्यपाल
11
पंतप्रधान मोदी म्हणाले, ‘मी तर अविनाशी...’; अनेक वर्षे पंतप्रधानपदी राहण्याचे भाषणातून संकेत
12
IPL 2024: कोलकाता-हैदराबाद आज विजेतेपदासाठी आमनेसामने... कोण बनणार चॅम्पियन?
13
प.बंगालची आघाडी कायम; सर्वाधिक ७९.३५% मतदान; सहाव्या टप्प्यात एकूण ६१.०४ टक्के मतदान
14
भाव वधारताच वाढली सोने तस्करी! गतवर्षी पकडले ५०० किलो सोने, काही कारखाने उद्ध्वस्त
15
१० जूनला मान्सून मुंबईत पोहोचणार? शहरात शनिवारी संपूर्ण दिवसभर होतं ढगाळ वातावरण
16
दहावीचा निकाल उद्या दुपारी १ वाजता 'ऑनलाइन'! गुण पडताळणीसाठी २८ मे पासून अर्ज
17
सायन रुग्णालयात डॉक्टरने वृद्ध महिलेला उडविले; उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू, डॉक्टरला अटक
18
कारच्या बोनेटवर बसून केलेली स्टंटबाजी भोवली; अल्पवयीन चालकासह तरुण पोलिसांच्या ताब्यात
19
आशिष शेलारांचे ‘कहीं पे निगाहें कहीं पे निशाणा’? मुख्यमंत्र्यांच्या आढावा बैठकीनंतरही नालेसफाईची पाहणी
20
दिवाळीत नव्या घरात जाणार रणबीर-आलिया? बांधकामाची सुरू असलेल्या घराची पाहणी

BJP Candidate's 3rd List 2019 : भाजपाची तिसरी यादी जाहीर, एकनाथ खडसे अन् तावडेंना संधी नाहीच

By ऑनलाइन लोकमत | Published: October 03, 2019 6:27 PM

Maharashtra Election 2019 BJP Candidate's 3rd List : भाजपानं पहिल्या यादीतूनच मुक्ता टिळक यांना कसबा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं आहे.

भाजपानं 125 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. पहिल्या यादीत देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांच्या नावांचा समावेश करण्यात आला होता. देवेंद्र फडणवीस दक्षिण-पश्चिम नागपूरमधून निवडणूक लढणार असून, चंद्रकांत पाटील पुण्यातील कोथरूडमधून निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. तर परळीतून पंकजा मुंडे विरुद्ध धनंजय मुंडे असा सामना पाहायला मिळणार आहे. पहिल्या यादीनंतर भाजपाने 14 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. त्यानंतर, आता 4 उमेदवारांची तिसरी यादी भाजपाने जाहीर केली आहे. 

भाजपानं पहिल्या यादीतूनच मुक्ता टिळक यांना कसबा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं आहे. तर अतुल भोसले दक्षिण कराडमधून निवडणूक लढणार आहेत. भाजपाने विद्यमान 11 उमेदवारांच्या आमदारकीचे तिकीट कापले, तसेच 52 विद्यमान आमदारांना पुन्हा तिकीट देण्यात आलं आहे. मात्र, ज्येष्ठ भाजपा नेते एकनाथ खडसेंचा नाव दुसऱ्या यादीतही नसल्याचं उघड झालं. त्यानंतर, भाजपाने 4 उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली. त्यामध्येही भाजपा नेते एकनाथ खडसे आणि विनोद तावडेंना तिकीट देण्यात आलं नाही.  भाजपाने विधानसभा निवडणुकांसाठी तिसरी उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. तिसऱ्या यादीत भाजपाने 4 उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. 

मालाड पश्चिममधून रमेश ठाकूर रामटेकमधून मल्लिकार्जुन रेड्डी साकोली येथून परिणय फुकेंना शिरपूर येथून काशीराम पावरा 

या 4 उमेदवारांना तिकीट देण्यात आलं आहे. पण, तिसऱ्या यादीतही एकनाथ खडसे आणि विनोद तावडेंचं नाव नाही. त्यामुळे खडसे आणि तावडे अद्यापही वेटिंगवरच असल्याचं दिसून येतंय. 

 

टॅग्स :Eknath Khadaseएकनाथ खडसेVinod Tawdeविनोद तावडेBJPभाजपाElectionनिवडणूकAssembly Election 2019विधानसभा निवडणूक 2019Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019