शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड! होर्मुज सामुद्रधुनी खुली करण्यासाठी तब्बल ३० देश एकवटले, ब्रिटन-फ्रान्सच्या नेतृत्वात मोहीम! भारताची भूमिका काय?
2
लाज आणली रे लाज आणली! हॉटेल कर्मचाऱ्यांनी सुटकेस उघडायला लावली, बालीमध्ये भारतीयांच्या चोरीचा Video व्हायरल
3
इराणला दररोज ४१०० कोटींचा फटका, तरीही चर्चेला आला नाहीय! डोनाल्ड ट्रम्प यांचे 'अखेरचे शस्त्र' ठरणार निर्णायक?
4
विजय केडियांनी खरेदी केले 'या' कंपनीचे ४४ लाख शेअर्स, स्टॉकला लागलं अपर सर्किट; ५ वर्षांत २१००% चा रिटर्न
5
अमरावती लैंगिक शोषण प्रकरण: मुख्य आरोपी अयान अहमदची अचलपूर शहरातून धिंड; गुन्ह्यातील पुराव्यांचा शोध सुरू
6
"रस्ता ब्लॉक होणारच, थोडा त्रासही होतोच, पण..."; 'त्या' मुद्द्यावर गिरीश महाजनांची प्रतिक्रिया
7
गुरुवारी गुरुपुष्यामृत योग: आवर्जून स्वामी सेवा करा; मनातील इच्छापूर्ती, अशुभता दूर होईल!
8
डोळ्यांवर पट्टी, हात-पाय बांधले... वेस्टर्न स्टाईल प्रपोजच्या बहाण्याने बॉयफ्रेंडला जिवंत जाळलं
9
कर्नाटकात होमस्टेमध्ये अमेरिकन महिलेवर अत्याचार; मालकाने तीन दिवस वायफाय बंद ठेवले, कर्मचाऱ्यालाही अटक
10
भाजप महिला आरक्षणाची सिरियल किलर, सामान्य महिलेने दाखवला खरा आक्रोश, वडेट्टीवार यांचा टोला
11
Top Marathi News LIVE Updates:राजस्थानमध्ये भीषण अपघात; स्कूल बसला ट्रकची जोरदार धडक
12
इराणला मिळाले नवे 'अण्वस्त्र'; अमेरिकेचीही पंचाईत, डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून ताबा घेण्याचा प्रयत्न
13
न्यूड व्हिडीओ कॉलसाठी २० हजार दे; अभिनेत्रीचे विद्यार्थ्यासोबतचे अश्लील चॅट व्हायरल, सोशल मीडियावर खळबळ
14
राजस्थानमध्ये भीषण अपघात; स्कूल बसला ट्रकची जोरदार धडक, १० विद्यार्थी जखमी
15
ट्रम्प यांच्या युद्धविरामाच्या घोषणेनंतर काही वेळातच युद्धाची ठिणगी! होर्मुझमध्ये अंदाधुंद फायरिंग
16
तुरुंगात 'प्रशिक्षण', साखळी बॉम्बस्फोटांचे नियोजन, लश्कर-ए-तोयबाशी संबंधित ७ दहशतवाद्यांना एनआयए न्यायालयाने सुनावली शिक्षा
17
’७० ते ८० टक्के नेते पो** पाहतात, सर्वांची चौकशी करा’, पप्पू यादव यांचं आव्हान
18
‘आपले सर्व शेजारी चांगले, फक्त एक...', राजनाथ सिंह यांचा जर्मनीतून पाकिस्तानवर निशाणा
19
“धडा शिकवायची हीच योग्य वेळ”; रिक्षावाल्यांना मराठी अनिवार्य निर्णय, मनसेचा नवा उपक्रम
20
Raja Shivaji: सलमान खान ते विद्या बालन! रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'मध्ये बॉलिवूड कलाकारांची तगडी फौज
Daily Top 2Weekly Top 5

तृतीयपंथियांच्या मंदिराची दुरवस्था!

By admin | Updated: August 24, 2014 21:06 IST

या मंदिराच्या विटा पाण्यावर तरंगतात.

अकोला: मूर्तिजापूर तालुक्यातील हातगाव येथे तृतीयपंथियांचे एक मंदिर असून, या मंदिराची सध्या दुरवस्था होत आहे. या मंदिराच्या विटा पाण्यावर तरंगतात. त्यामुळे परिसरातील रहिवासी मंदिराच्या विटा काढून नेत असल्याने, भिंती खचत असून, मंदिर परिसरात सर्वत्र गवत व घाण साचली आहे. मूर्तिजापूरपासून पाच किलोमीटर अंतरावर हातगाव नावाचे एक छोटेसे खेडे आहे. या गावाबाहेर मुस्लिम धर्मस्थळाच्या धाटणीतले एक घुमट आहे. यालाच तृतीयपंथियांचे मंदिर म्हणतात. या मंदिरात दर्शनासाठी देशभरातून तृतीयपंथी येत असतात. गत काही वर्षांपासून या मंदिराकडे दुर्लक्ष होत असल्याने दर्शनार्थींची संख्या रोडावली आहे. मंदिराच्या विटा पडत आहेत. भिंतीच्या विटा पाण्यावर तरंगतात, ही माहिती परिसरात पसरल्याने नागरिक भिंतीच्या विटा काढून नेतात. मंदिरात फारसे कुणाचे जाणे येणे नसल्याने, परिसरात गवत वाढले आहे. या परिसराचा वापर गावातील नागरिक शौचासाठी करीत असल्याने, दुर्गंधी पसरली आहे. मंदिरात अधूनमधून तृतीयपंथी येऊन, पूजा करतात, असे गावकर्‍यांनी सांगितले. मंदिर परिसरात एक दर्गा असून, समाधीसाठी बांधलेले काही घुमट आहेत. या दग्र्यांच्या विटाही पाण्यावर तरंगतात. हे मंदिर शेकडो वर्षांपूर्वी बांधण्यात आले असल्याचे गावातील नागरिक सांगतात. मंदिराचे बांधकाम कुणी व का केले, याची नेमकी माहिती गावकर्‍यांना नाही. मंदिरात कोणत्याही देवाची मूर्ती नाही. अनेक वर्षांपासून येथे तृतीयपंथी येतात. पूर्वी येथे त्यांची यात्राही भरायची. गावातील नागरिकांनी ही जागा त्यांच्यासाठीच सोडली आहे.** तृतीयपंथीच करणार मंदिराचा विकास मंदिराचा विकास स्वत:च करण्याचा निर्णय तृतीयपंथीयांनी घेतला आहे. त्यांनी हातगाव ग्रामपंचायतशी संपर्क साधून, या मंदिराचा आणि स्थळाचा विकास करण्याचे म्हटले आहे. पैसे तृतीयपंथीच देणार असून, विकास ग्रामपंचायतकडून करून घेणार आहेत. मंदिरापर्यंत रस्ता तसेच आवारभिंत बांधून, परिसराची साफसफाई करण्यात येणार असल्याची माहिती गावकर्‍यांनी दिली.** विटा तरंगतात पाण्यावरमंदिराच्या विटा खास पद्धतीने बनविण्यात आल्या आहेत. या विटा साधारण विटांच्या तुलनेत वजनाने अतिशय कमी आहेत. विटा बनविताना आतमध्ये हवेची पोकळी ठेवण्यात आली असल्याने, त्या पाण्यावर तरंगतात, असे मंदिर परिसरातील गावकरी सांगतात.