शहरं
Join us  
Trending Stories
1
US-Iran Ceasefire: इराण-अमेरिका संघर्षात मोठी घडामोड, ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाच्या मुदतीत वाढ, नाकेबंदी मात्र कायम
2
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
3
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
4
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
5
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
6
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
7
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
8
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
9
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
10
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
11
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
12
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
13
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
14
लेख: तुमचा पिझ्झा पोहोचविणारा उन्हात होरपळतो आहे, सावधान!
15
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
16
आजचा अग्रलेख: हे नुकसान कसे मोजणार?
17
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
18
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
19
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
20
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
Daily Top 2Weekly Top 5

चोर्‍या दोन, गुन्हा मात्र एकच

By admin | Updated: July 26, 2014 20:54 IST

गुन्हय़ांची संख्या कमी करण्यासाठी पोलिसांचा केविलवाणा प्रकार

अकोला: शहरातील गुंडगिरी, चोर्‍या, घरफोडीसारखे प्रकार रोखण्यासाठी पोलिस ठोस उपाययोजना करीत नाहीत. मात्र गुन्हय़ांची संख्या कमी करण्यासाठी पोलिस वेगवेगळय़ा प्रकारचे प्रयत्न करतात. असा एक प्रयत्न शुक्रवारी खदान पोलिसांनी केला. मलकापूर भागात दोन घरी घरफोड्या झाल्या. या दोन्ही घरमालकांनी पोलिस ठाण्यात वेगवेगळी तक्रार दिली. त्यानुसार दोन गुन्हे दाखल व्हायला हवे होते. परंतु खदान पोलिसांनी गुन्हय़ांची वाढू नये यासाठी दोन्ही घरांमधील घरफोडीप्रकरणी एकच गुन्हा दाखल करून विषय एकाच कागदात निपटून टाकण्याचा केविलवाणा प्रयत्न केला. शहरातील वाढती गुन्हेगारी, प्राणघातक हल्ले, चोर्‍या, घरफोड्यासारखे प्रकार रोखण्यासाठी पोलिस कोणतीच उपाययोजना करीत नाही. रात्रीला गस्त घालण्याच्या नावाने नुसती बोंब असते. गस्तीच्या नावावर पोलिस ठाण्यात येऊन झोपा काढण्याचे काम पोलिसांकडून होत आहे. शहरातील कायदा व सुव्यवस्थेत सुधारणा करून गुन्हेगारीला आळा घातला पाहिजे. परंतु हा प्रयत्न करायचा सोडून भलताच प्रयत्न करताना दिसतात. शहरात अनेक घटना घडतात. परंतु आपल्या ठाण्यात दाखल होणार्‍या गुन्हय़ांची संख्या वाढू नये यासाठी पोलिस दोन घटनांचा एकच गुन्हा दाखल करतात. मलकापूर भागातील सुरेका नगरात राहणार्‍या इंदूबाई बंडू खपाडे (४७) यांच्याकडे २३ ते २४ जुलैदरम्यान रात्री अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या दाराचे कडीकोंडा व कुलूप तोडून आत प्रवेश केला व स्टीलच्या डब्यातील रोख २५ हजार रुपये काढून घेतले आणि त्यानंतर चोरट्यांनी खपाडे यांच्या शेजारी राहणार्‍या शिल्पा पांडे यांच्या घराकडे मोर्चा वळवून त्यांच्या घरातील दाराचे कडीकोंडा व कुलूप तोडून आत प्रवेश केला व घरातील सोने, चांदीचे दागिने व रोख १0 हजार रुपये असा ३१ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. या दोघी तक्रारदारांनी शुक्रवारी खदान पोलिस ठाण्यात धाव घेऊन वेगवेगळी तक्रार दिली. परंतु खदान पोलिसांनी दोन घरफोड्याप्रकरणी दोन गुन्हे दाखल करण्याऐवजी एकच गुन्हा दाखल केला. दोन गुन्हे दाखल केले असते तर गुन्हय़ांची संख्या वाढली असती. संख्या वाढल्यामुळे गुन्हेगारी नियंत्रणात दिसत नाही. त्यामुळे सर्वच पोलिस ठाण्यांमध्ये अनेक गुन्हय़ांमध्ये बर्‍याचदा एकच गुन्हा दाखल करण्याचा पोलिसांचा प्रयत्न असतो. खदान पोलिसांनीही केविलवाणा प्रयत्न शुक्रवारी केला.