वरवर गोड बोलतात आणि पक्ष सोडून गेलं पाहिजे असं वागतात!; एकनाथ खडसेंचं 'टार्गेट फडणवीस'

By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2019 02:41 PM2019-12-12T14:41:46+5:302019-12-12T14:42:52+5:30

माझ्यावर आरोप झाले तसे मुंडे साहेंबावर झाले होते. ज्या पद्धतीने मुंडे साहेबांवर आरोप झाले तसे माझे झाले.

They talk sweet and act like We should leave the party !; Khadse 'target Fadnavis' | वरवर गोड बोलतात आणि पक्ष सोडून गेलं पाहिजे असं वागतात!; एकनाथ खडसेंचं 'टार्गेट फडणवीस'

वरवर गोड बोलतात आणि पक्ष सोडून गेलं पाहिजे असं वागतात!; एकनाथ खडसेंचं 'टार्गेट फडणवीस'

googlenewsNext

परळी - जनसंघापासून आजच्या भाजपापर्यंत वाटचाल आम्ही पाहिली आहे, देशात २ खासदार आणि महाराष्ट्रात १० च्या पुढे आमदार जात नव्हते. शेठजी, भटजी पक्ष म्हणून भाजपाची ओळख होती. त्याला बहुजनाचा चेहरा देण्याचं काम गोपीनाथ मुंडे यांनी केलं. महादेव जानकर सांगतात कितीही छळ केला तरी सोडणार नाही, का सोडणार नाही कारण गोपीनाथ मुंडे यांच्यावरचं ते प्रेम आहे. ज्यांनी ४० वर्ष पक्षासाठी झटलो त्यांना अशी वागणूक का? आम्ही बाहेर पडत नाही तर आम्हाला तसं करण्यासाठी प्रवृत्त केलं जात आहे. वरवर गोड बोलतात आणि पक्ष सोडून गेलं पाहिजे असं वागतात असा आरोप एकनाथ खडसेंनी नाव न घेता देवेंद्र फडणवीस यांच्यावर केला. 

यावेळी बोलताना एकनाथ खडसे म्हणाले की, माझ्यावर आरोप झाले तसे मुंडे साहेंबावर झाले होते. ज्या पद्धतीने मुंडे साहेबांवर आरोप झाले तसे माझे झाले. ज्यांच्यामुळे तुम्ही मुख्यमंत्री झालात, मंत्री झाला मग त्यांना काढण्याचं काम का केलं? जे गोपीनाथ मुंडे यांनी सहन केलं ते आम्ही सहन करत आहोत. मग किती दिवस हे सहन करायचं? पुढे काय करायचं? हे तुम्ही सांगा असं उपस्थित जनतेलं त्यांनी विचारलं. 

त्याचसोबत देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानतो. २३ नोव्हेंबरला मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. २६ नोव्हेंबरला राजीनामा दिला. ५ वर्षापूर्वी मी मंत्री असताना गोपीनाथ मुंडे स्मारक उभारण्यासाठी औरंगबाद येथील दुग्धविकास विभागाची जागा मी दिली. गेली ५ वर्ष भाजपा सरकार असून निधी दिला नाही. २४ नोव्हेंबरला स्व. गोपीनाथ मुंडे स्मारकासाठी निधी दिला. २५ नोव्हेंबरला औरंगाबाद येथे कंत्राट निघालं. आणि २६ नोव्हेंबरला राजीनामा दिला. ८० तासांच्या सरकारमध्ये हे सगळं घडलं. मग कुणासाठी सीएम झाले होते? त्यासाठी त्यांचे आभार मानतो असा चिमटाही एकनाथ खडसेंनी फडणवीसांना काढला. 

तसेच जास्त उघड करणार नाही कारण शिस्तभंगाची कारवाई करतील. माझा गुन्हा काय हे सभागृहात, लोकांसमोर, टीव्हीसमोर सगळीकडे विचारलं तरी उत्तर मिळालं नाही. मग पक्षात जीव गुदमरणार नाही का? पक्षात राहून न्याय मिळत नाही मग काय करणार? माझ्या जीवनात जसा प्रसंग आला, गोपीनाथ मुंडे यांच्या जीवनात जसा प्रसंग आला तसा पंकजा मुंडे यांच्या जीवनात येऊ नये, पंकजा मुंडे यांच्या पाठिशी आम्ही सगळे खंबीर आहोत. माझ्याजवळ खूप काही आहे, भरपूर आहे पण बोलायला वेळ नाही असं सांगत इशाराही एकनाथ खडसेंनी दिला.     
 

Web Title: They talk sweet and act like We should leave the party !; Khadse 'target Fadnavis'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.