शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

कुंभमेळ्यासाठी निधीची कमतरता भासणार नाही

By admin | Updated: December 16, 2014 02:27 IST

२०१५-१६ मध्ये नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ््याच्या आयोजनासाठी आर्थिक निधीची अजिबात कमतरता भासणार नाही

नागपूर : २०१५-१६ मध्ये नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ््याच्या आयोजनासाठी आर्थिक निधीची अजिबात कमतरता भासणार नाही असे आश्वासन राज्य शासनामार्फत विधानपरिषदेत देण्यात आले. कुंभमेळ्याशी निगडित कामे वेळेअगोदर पूर्ण करण्यात येतील असा दावादेखील करण्यात आला. डॉ.अपूर्व हिरे व जयवंतराव जाधव यांनी या मुद्यावरील लक्षवेधीच्या माध्यमातून सभागृहाचे लक्ष वेधले.कुंभमेळ््याच्या आयोजनासाठी नेमलेल्या शिखर समितीच्या बैठकीत २ हजार ३७८ कोटी रुपयांच्या रकमेच्या कामांना तत्वत: मंजूरी देण्यात आली. यानुसार महाराष्ट्र शासनातर्फे आतापर्यंत ८८३ कोटी २१ लाख, केंद्र शासनाकडून ३४ कोटी ७६ लाख व नाशिक महानगरपालिकेकडून ७१ कोटी ७ लाख असा एकूण ९८९ कोटी ४ लाख रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे अशी माहिती शासनातर्फे सामान्य प्रशासन राज्यमंत्री डॉ.रणजित पाटील यांनी दिली. या आराखड्यात एकूण २२ यंत्रणांचा समावेश असून ३१५ कामे करण्यात येणार आहेत. यातील १६५ कामे प्रगतिपथावर असून ४८ कामे निविदा प्रक्रियेत आहेत. १०२ कामांना अजून सुरुवातच झालेली नाही असेदेखील त्यांनी स्पष्ट केले. नाशिक महानगरपालिकेने वाढीव निधीची मागणी केली असून मु्ख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या उच्चस्तरीय समितीसमोर हा प्रस्ताव मांडण्यात येईल. शिवाय केंद्र शासनाकडून निधी मिळावा यासाठी पाठपुरावा सुरू आहे असेदेखील ते म्हणाले. (प्रतिनिधी)