शहरं
Join us  
Trending Stories
1
“ते इथे येतात, मुले जन्माला घालतात अन्...”; ट्रम्प यांच्याकडून भारताची थेट नरकाशी तुलना?
2
Top Marathi News LIVE Updates: "चर्चेचे स्वागतच, पण धमक्या..." इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर फोडलं खापर
3
NATOबाबत अमेरिकेची मोठी चाल! इराण युद्धात मदत केली नाही; गंभीर परिणाम भोगावे लागणार, यादी तयार
4
PM Internship Scheme 2026: आता १८ ते २५ वर्षांच्या तरुणांना मिळणार ₹९००० चं स्टायपेंड; नियमांमध्ये झाला मोठा बदल
5
IPL 2026: 'ती' गोष्ट केल्याशिवाय वैभव सूर्यवंशी मैदानात उतरत नाही; खुद्द त्यानेच केला खुलासा
6
"TCS मध्ये नेटचा पासवर्ड अश्लील भाषेत, धार्मिक भावना दुखावल्या"; पीडितेने सांगितली आपबिती
7
Vastu Tips: झोपताना उशीखाली ठेवा 'या' घरगुती वस्तू; नशीब पालटायला वेळ लागणार नाही!
8
US Israel Iran War : जगावर महागाईचं संकट! होर्मुझमधील सुरुंग काढायला लागणार सहा महिने; पेंटागॉनने वर्तवली भीती
9
रिपोर्ट! कामाचा दबाव, नोकरी जाण्याची भीती; 'टॉक्सिक वर्क कल्चर'मुळे दरवर्षी ८ लाखाहून अधिक मृत्यू
10
दुसऱ्या प्रेग्नंसीमुळे ॲटलीच्या 'राका'मध्ये दीपिका पादुकोणची सीन्स कट? मेकर्सने दिलं स्पष्टीकरण
11
जगातील ११ रिफायनरीमध्ये गुप्त हल्ले, भारतासह US मध्ये हाहाकार; मोदींचा दौरा टळला, योगायोग की कट?
12
इराणची कोंडी! अमेरिकेने समुद्रात उतरवला अवाढव्य ताफा; ३१ जहाजे ताब्यात घेतल्याने तणाव वाढला
13
ऊर्जा क्षेत्रात आत्मनिर्भरता गरजेची; भारताने होर्मुझ संकटातून धडा घ्यावा, अनिल अग्रवाल यांचे सुचक विधान
14
Divyanka Sirohi : भावाने दरवाजा लावायला सांगितला, परत येऊन पाहिलं तर...; अभिनेत्री दिव्यांका सिरोहीच्या मृत्यूची Inside Story
15
IRCTC: रेल्वे पॅन्ट्रीत कीटक-उंदरांचा वाढता उपद्रव; प्रवाशांच्या तक्रारींनंतर प्रशासनाकडून दखल
16
"तो माझ्या छातीकडे टक लावून पाहायचा..."; नाशिक TCS प्रकरणात महिला टीम लीडरला आला विचित्र अनुभव
17
BMC: स्वच्छतेकडे दुर्लक्ष करणाऱ्या कंत्राटदारांवर कारवाई करा; महापालिका आयुक्तांचे अधिकाऱ्यांना निर्देश  
18
"२०२९ विधानसभा निवडणुकीत पुन्हा पवार विरुद्ध पवार लढाई होऊ शकते", रोहित पवारांचे मत
19
Gold Silver Price Today : बाजार उघडताच चांदीत ₹६,००० ची घसरण, सोनंही झालं स्वस्त; चेक करा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K चा भाव
20
करणीबाधेची भीती दाखवून महिलेवर अत्याचार; भोंदू बाबा महेशगिरीवर लासलगाव पोलिसांत अखेर गुन्हा दाखल!
Daily Top 2Weekly Top 5

खाद्यान्नाबाबत तक्रारी नाहीच

By admin | Updated: April 7, 2015 04:45 IST

घर घेताना फसवणूक झाली, विम्याचे पैसे मिळाले नाहीत, घेतलेल्या वस्तूंमध्ये काही दोष आढळला तर ग्राहक तत्काळ याविषयीची तक्रार ग्राहक पंचायतीत

पूजा दामले, मुंबई घर घेताना फसवणूक झाली, विम्याचे पैसे मिळाले नाहीत, घेतलेल्या वस्तूंमध्ये काही दोष आढळला तर ग्राहक तत्काळ याविषयीची तक्रार ग्राहक पंचायतीत नोंदवण्यास जातो. मात्र खाद्यपदार्थ, पेय यामध्ये भेसळ असेल अथवा दोष असल्यास त्याचा थेट परिणाम आरोग्यावर होतो. पण, तरीही ग्राहक याबाबत उदासिनच असल्याचे चित्र दिसून येते. मुंबई ग्राहक पंचायतीत गेल्या एका वर्षात एकही खाद्यान्नाविषयीची तक्रार आलेली नाही, यावरून हेच स्पष्ट झाले आहे. ७ एप्रिल हा ‘जागतिक आरोग्य दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो. यंदाच्या आरोग्य दिनाची संकल्पना ‘अन्न सुरक्षा’ अशी आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या आकडेवारीनुसार, वर्षाला २.२ दशलक्ष व्यक्तींचा मृत्यू हा अतिसारामुळे होतो. ज्यात जवळपास १.९ दशलक्ष लहान मुलांचा समावेश असतो. अन्नातील भेसळ, अन्नपदार्थांतील दोषांमुळे अनेक आजार जडतात. खाद्यान्नाच्या दर्जाकडे दुर्लक्ष केल्यावर त्याचा थेट परिणाम हा आरोग्यावर होतो. हे अनेक सुशिक्षितांना माहीत असले तरीही याविषयी अनास्थाच दिसून येते.मुंबई ग्राहक पंचायतीकडे वर्षाला एक ते दीड हजार तक्रारी येतात. यापेक्षा दुप्पट जण ही फक्त एकदाच येतात आणि केवळ सल्ला घेऊन जातात. पण गेल्या वर्षभरात पंचायतीकडे एकही खाद्यपदार्थ, पेय संदर्भातील तक्रार दाखल न झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. अनेकदा नामांकित कंपनीच्या पॅकड् फूडमध्ये दोष असतात, चॉकलेट्समध्ये अळ्या आढळतात. हे अतिशय गंभीर विषय आहेत. असे असूनही ग्राहक याबाबत तक्रारी करण्यास उदासीनच असल्याचे दिसून येते, असे पंचायतीचे कार्याध्यक्ष शिरीष देशपांडे यांनी ‘लोकमत’ला सांगितले. पंचायतीतर्फे केलेल्या सर्वेक्षणातून अतिशय धक्कादायक माहिती समोर आली. ४६ टक्के नमुन्यांमध्ये किमान निकषांचे उल्लंघन करण्यात आले होते. २५ टक्के नमुन्यांमध्ये पाणी मिसळलेले होते. तर, ५ टक्के नमुन्यांत स्टार्च, युरिया, साखर या घटकांची भेसळ केल्याचे आढळले आहे. यासंबंधीचा संपूर्ण अहवाल अन्न व औषध प्रशासनाला शनिवार, ४ एप्रिल रोजी सादर करण्यात आला आहे. शुद्ध दूध हा सर्वांचा हक्क आहे. यासाठी सर्वांना हा हक्क मिळवून देण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांंची एकत्र बैठक घेणे अपेक्षित आहे, असे दूध मोहिमेच्या कार्यकारिणी सदस्य ज्योती मोडक यांनी सांगितले.