शहरं
Join us  
Trending Stories
1
"चारित्र्यशील लोक निवडून द्या, तरच हे थांबेल"; आपमधील फुटीवर अण्णा हजारे संतापले, नव्या कायद्याची मागणी
2
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
3
Bike Loan साठी किमान CIBIL स्कोअर किती असला पाहिजे? जाणून घ्या महत्त्वाची माहिती
4
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
5
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
6
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
7
Manohar Bhosale: काळी जादू करणाऱ्या भोंदूबाबा मनोहर भोसलेसह दोघांना अटक
8
नायक नहीं, खलनायक हूं मैं! संजय दत्तने पुन्हा पेटवली आग, 'खलनायक रिटर्न्स'ची घोषणा
9
"भाऊ म्हणाले तुझ्या सिनेमात तर मी असणारच...", 'राजा शिवाजी'मध्ये सलमानची एन्ट्री कशी झाली? रितेशने सगळं सांगितलं
10
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
11
कसोटीसाठी चांगल्या खेळपट्ट्या पाहिजेत, जर हे असेच सुरू राहिले तर...; भज्जीने व्यक्त केली भीती
12
मुंबई घामाघूम, तर विदर्भात सूर्याचा प्रकोप; अकोल्याचा पारा ४५ अंशांवर, आज पावसाची शक्यता!
13
गाळ काढताना विहिरीत हाती लागली ‘गधेगळ’, चौदाव्या शतकातील ऐतिहासिक ठेवा जोपासणार
14
मृत्युनंतर महिलेच्या मालमत्तेवर कुणाचा हक्क? माहेर की सासर? हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय!
15
'आप'ला राज्यसभेत खिंडार; दहापैकी ७ खासदारांना घेऊन राघव चड्ढा भाजपमध्ये, पक्ष सोडताना म्हणाले...
16
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
17
एका मच्छराने घेतला राज्यात २७ रुग्णांचा जीव, सार्वजनिक आरोग्य विभागाकडून आकडेवारी जारी
18
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
19
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
20
Bhandup: ‘हाय’ अन् ‘टाटा बाय-बाय’वरून वाद; वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात
Daily Top 2Weekly Top 5

पीक विमा योजनेतून भरपाईपोटी सरसकट १७,५०० रुपये मिळतीलच याची नाही खात्री

By नितीन चौधरी | Updated: November 6, 2025 12:58 IST

महसूल मंडळानुसार हे उत्पादन बदलणारे आहे

नितीन चौधरी, लोकमत न्यूज नेटवर्क, पुणे: अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना राज्य सरकारने ३१ हजार कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले. त्यात पीक विमा योजनेतून  हेक्टरी साडेसतरा हजार रुपये देऊ, असे आश्वासन दिले होते. प्रत्यक्षात ही मदत महसूल मंडळातील पीक कापणी प्रयोगातून आलेल्या सरासरी उत्पादनावर अवलंबून असणार आहे. मात्र, महसूल मंडळानुसार हे उत्पादन बदलणारे आहे. त्यानुसार विमा कंपनी भरपाई देईल. त्यामुळे राज्य सरकारने जाहीर केलेली मदत शेतकऱ्यांना मिळेलच याची खात्री नाही.

पीकविमा योजनेत ९० टक्के शेतकरी सोयाबीन उत्पादक आहेत. आतापर्यंत ८२ टक्के पीक कापणीतील उत्पादनाचे आकडे आले आहेत. पूर्ण अहवाल येण्यासाठी १५ डिसेंबर उजाडेल. त्यानंतर मदत दिली जाईल.

कुणाला मिळेल मदतीचा लाभ?

ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा उतरवला आहे, अशांनाच मदत मिळेल. ती महसूल मंडळनिहाय बारा ठिकाणी घेतलेल्या पीक कापणी उत्पादनाच्या सरासरीवर अवलंबून असेल.  

कशी ठरणार भरपाई?

या सरासरीची गेल्या पाच वर्षांमधील सरासरी उत्पादनाशी (उंबरठा उत्पादन) तुलना केली जाणार आहे. उंबरठा उत्पादनापेक्षा सरासरी उत्पादन कमी असल्यास संबंधित महसूल मंडळातील शेतकरी पात्र असतील. सरासरी उत्पादन उंबरठा उत्पादनाच्या दहा टक्के कमी असल्यास विमा संरक्षित रकमेच्या दहा टक्केच भरपाई मिळेल. सोयाबीनसाठी विमा संरक्षण रक्कम ५६ हजार रुपयांपर्यंत आहे. संपूर्ण नुकसानभरपाई मिळण्यासाठी सरासरी उत्पादन शून्य असणे अपेक्षित आहे.  

English
हिंदी सारांश
Web Title : Crop Insurance: ₹17,500 Compensation Not Guaranteed, Depends on Yield

Web Summary : ₹17,500 crop insurance compensation depends on average yield, varying by revenue circle. Actual payout hinges on comparing current yield to a five-year average. Lower yield means potential compensation, but full amount requires near-zero production. Many farmers may not receive the initially promised amount.
टॅग्स :Crop Insuranceपीक विमाFarmerशेतकरी