शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
2
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
3
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
4
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
5
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
6
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
7
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
8
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
9
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
10
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
11
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
12
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
13
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
14
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
15
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
16
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
17
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
18
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
19
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
20
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
Daily Top 2Weekly Top 5

उद्धव ठाकरे पुन्हा परिषदेवर? मविआची कोंडी वाढली; भाजपला अ‍ॅडव्हान्टेज, नवे चेहरे येणार

By यदू जोशी | Updated: February 8, 2026 09:56 IST

राज्यसभा समीकरणाचाही संबंध, मविआतील पक्षांना राज्यसभा व विधान परिषदेसाठी तडजोड करावी लागणार आहे.

यदु जोशी

मुंबई - उद्धवसेनेचे पक्षप्रमुख, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह विधान परिषदेच्या नऊ आमदारांचा कार्यकाळ लवकरच संपणार असून, ठाकरे पुन्हा विधान परिषदेवर जातील का, याबाबत उत्सुकता असेल. विधान परिषदेच्या निवडणुकीत भाजप-महायुतीला बहुतांश जागा मिळतील असे चित्र आहे. महाविकास आघाडीला फटका बसेल.

विधानसभेच्या सदस्यांमधून हे नऊजण विधान परिषदेवर मे २०२० मध्ये बिनविरोध निवडून गेले होते. त्यावेळी महाविकास आघाडीला पाच, तर भाजपला चार जागा मिळाल्या होत्या. मात्र यावेळी महायुतीचे संख्याबळ तब्बल २३५ इतके आहे. मविआकडे माकप, शेकाप मिळून ४८ विधानसभा सदस्य आहेत. अन्य दोन पक्षांचे तीन आमदार आहेत. दोन जागा रिक्त आहेत. मेमधील विधान परिषद निवडणुकीपूर्वी विधानसभेच्या दोन जागांसाठी पोटनिवडणूक झाली तर विधानसभेचे सर्व २८८ आमदार विधान परिषदेसाठी मतदान करतील.

राज्यसभेचे मैदान अगोदर

विधान परिषदेच्या आधी सात जागांसाठी राज्यसभा निवडणूक होणार आहे. त्यात मविआला एक जागा मिळेल, असे संख्याबळ सांगते. ती जागा मविआतील एका पक्षाला दिली गेली, तर दुसऱ्या पक्षाला विधान परिषदेची एक जागा दिली जाईल. भाजपाचे चारपैकी तीन जण गोपीचंद पडळकर, प्रवीण दटके, रमेश कराड हे विधानसभेवर निवडून गेलेले आहेत. त्यामुळे नवीन चेहरे पक्षाकडून दिले जातील. सोलापूरच्या राजकारणात गेल्या काळात झालेल्या घडामोडींनंतर दुरावलेले रणजितसिंह मोहिते पाटील यांच्याबाबत भाजपा काय निर्णय घेणार ते महत्त्वाचे असेल.

तडजोड करावीच लागणार

उद्धव ठाकरे यांनी विधान परिषदेच्या सदस्यत्वाचा राजीनामा देणार असल्याची घोषणा मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देताना केली होती; पण नंतर त्यांनी राजीनामा दिला नाही. यावेळी ते स्वतः विधान परिषदेवर जाण्यासाठी इच्छुक असतील का आणि मविआ एकमताने त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब करेल का, हे महत्त्वाचे असेल.

२० विधानसभा सदस्य असलेल्या उद्धवसेनेने राज्यसभेच्या एका जागेसाठी काँग्रेस वा शरद पवार गटाच्या उमेदवाराला पाठिंबा दिला, तर ठाकरे विधान परिषदेवर जाणार असा त्याचा अर्थ असू शकेल. मविआतील पक्षांना राज्यसभा व विधान परिषदेसाठी तडजोड करावी लागणार आहे. त्याचवेळी इच्छुकांची गर्दी असल्याने कोणाला संधी द्यायची हे आव्हान भाजपसमोर असेल.

हे नऊ आमदार जिंकले होतेउद्धव ठाकरे (उद्धवसेना), डॉ. नीलम गोन्हे (तेव्हा उद्धवसेना आता शिंदेसेना), शशिकांत शिंदे (शरद पवार गट), अमोल मिटकरी (अजित पवार गट), राजेश राठोड (काँग्रेस), गोपीचंद पडळकर, प्रवीण दटके, रणजितसिंह मोहिते, आणि रमेश कराड (भाजप).

English
हिंदी सारांश
Web Title : Uddhav Thackeray eyes council return? MVA strained, BJP gains.

Web Summary : With council seats opening, Uddhav Thackeray's potential return strains MVA. BJP, with strong numbers, is favored. Alliances face compromises in upcoming Rajya Sabha and Vidhan Parishad elections. New faces likely from BJP.
टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेVidhan Parishadविधान परिषदBJPभाजपाRajya Sabhaराज्यसभाMahavikas Aghadiमहाविकास आघाडी