विकणाऱ्याला अटक, मग विकत घेणाऱ्याला का नाही?, अंबादास दानवेंचा पार्थ पवारांना अडचणीत आणणारा सवाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2025 12:38 IST2025-12-04T12:36:00+5:302025-12-04T12:38:25+5:30
पुण्यातील मुंढव्यातील ४० एकर जमीन गैरव्यवहारप्रकरणी आरोपी शीतल तेजवानीला पुणे पोलिसांनी बुधवारी अटक केली. या प्रकरणात शीतल तेजवानी मुख्य आरोपी असून, तिची पुणे पोलिसांनी दोनदा चौकशीदेखील केली होती.

विकणाऱ्याला अटक, मग विकत घेणाऱ्याला का नाही?, अंबादास दानवेंचा पार्थ पवारांना अडचणीत आणणारा सवाल
पुण्यातील मुंढव्यातील ४० एकर जमीन गैरव्यवहारप्रकरणी आरोपी शीतल तेजवानीला पुणे पोलिसांनी बुधवारी अटक केली. या प्रकरणात शीतल तेजवानी मुख्य आरोपी असून, तिची पुणे पोलिसांनी दोनदा चौकशीदेखील केली होती. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीसाठी ही जमीन खरेदी करण्यात आली होती. पोलिस चौकशीत उघड झालेल्या बाबींवरून तिचा थेट सहभाग असल्याचे स्पष्ट झाल्याने तिला अटक केली. दरम्यान, शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सवाल उपस्थित केले आहेत.
पुणे पोलिसांनी अटक केलेली शीतल तेजवानी कोण? पार्थ पवारांच्या कंपनीसोबत केला होता जमिनीचा व्यवहार
"पुण्याच्या जमीन प्रकरणात शीतल तेजवानीला 'अखेर' अटक झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि बावनकुळे जी, या प्रश्नांची उत्तरे जनता मागते आहे, अशी पोस्ट अंबादास दानवे यांनी केली आहे.
अंबादास दानवे यांनी हे प्रश्न उपस्थित केले
१. जमीन देणारी व्यक्ती अटकेत असेल तर मग घेणाऱ्या व्यक्तीला, त्याच्या पार्टनरला अटक का नाही?
२. पार्थ पवार प्रकरणात कंपनीने उत्तर देण्यासाठी अजून किती दिवस 'मुदतवाढ-मुदतवाढ' खेळणार आहात?
३. अमेडिया कंपनीत केवळ १ टक्का भागधारक दिग्विजय हा ९९ टक्के भागधारक असलेल्या पार्थ पवारांच्या मर्जीशिवाय सायनिंग अथॉरिटी झाला का?
४. मुद्रांक शुल्क माफ करणाऱ्या अधिकाऱ्यांची नावे सरकार कधी जाहीर करणार?
ही शुल्क माफी राजकीय दबावाशिवाय होणे शक्य नाही महोदय. उपमुख्यमंत्री अजित पवार यांना याची कल्पना नाही असे सांगणे, हे जनतेला शुद्ध वेडे बनवणे आहे. ते ही बहुमताच्या जोरावर!, असा टोलाही अंबादास दानवे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लगावला आहे.
पुण्याच्या जमीन प्रकरणात शीतल तेजवानीला 'अखेर' अटक झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि बावनकुळे जी, या प्रश्नांची उत्तरे जनता मागते आहे..
१. जमीन देणारी व्यक्ती अटकेत असेल तर मग घेणाऱ्या व्यक्तीला, त्याच्या पार्टनरला अटक का नाही?
२. पार्थ पवार प्रकरणात कंपनीने उत्तर…— Ambadas Danve (@iambadasdanve) December 4, 2025
आज कोर्टात त्यांना हजर करण्यात येणार
तेजवाणी यांची पोलिसांनी दोनवेळा चौकशी केली. या चौकशीत उघड झालेल्या बाबींवरून शीतल तेजवानीचा जमिनीच्या गैरव्यवहारात थेट सहभाग असल्याचे स्पष्ट झाले. आज कोर्टात त्यांना हजर करण्यात येणार आहे.
शासनाचे कोणतेही आदेश नसताना जमिनीचे मूळ वतनदार आणि वारसदार त्यांच्याकडून कागदपत्र तयार करून जमीन विक्री केल्याप्रकरणी फसवणूक केल्यामुळे अटक केली आहे. तेजवानीने स्वतःच्या फायद्यासाठी जमीन विक्री, पोलीस तपासातून समोर आले आहे. तेजवानीने मुंढवा येथील जमिनीचा ७/१२ बंद असताना सुद्धा व्यवहाराच्या वेळी जोडला होता. शीतल तेजवानी विरोधात खडक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून सुरू आहे.