महात्मा फुले योजनेसाठी ११६२ कोटी मंजूर; राज्यभरातील रुग्णालयांचा कोंडलेला श्वास झाला मोकळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2025 19:18 IST2025-03-11T19:18:03+5:302025-03-11T19:18:45+5:30

सांगली : महात्मा फुले जनआरोग्य योजनेच्या थकीत बिलांपोटी अखेर शासनाने १,१६२ कोटी ०८ लाख ६३ हजार ३२१ रुपयांच्या निधीला ...

The government finally approved a fund of Rs 1162 crore for the outstanding bills of the Mahatma Phule Jan Arogya Yojana. | महात्मा फुले योजनेसाठी ११६२ कोटी मंजूर; राज्यभरातील रुग्णालयांचा कोंडलेला श्वास झाला मोकळा

महात्मा फुले योजनेसाठी ११६२ कोटी मंजूर; राज्यभरातील रुग्णालयांचा कोंडलेला श्वास झाला मोकळा

सांगली : महात्मा फुले जनआरोग्य योजनेच्या थकीत बिलांपोटी अखेर शासनाने १,१६२ कोटी ०८ लाख ६३ हजार ३२१ रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे. यामुळे राज्यभरातील रुग्णालयांचा कोंडलेला श्वास मोकळा झाला आहे. बुधवारअखेर (दि. ५) या योजनेची थकबाकी १,५७७ कोटी ७२ लाख २३ हजार ६८० हजार रुपयांवर पोहोचली.

यासंदर्भात मंगळवारी (दि. ४) आरोग्य विभागाने परिपत्रक जारी केले. या निधीतून रुग्णालयांची थकबाकी अदा करावी, असे आदेशात म्हटले आहे.

सर्वसामान्य रुग्णांसाठी वरदायी ठरलेली महात्मा फुले जनआरोग्य योजना निधीटंचाईच्या गर्तेत सापडली होती. या योजनेतून उपचार करणाऱ्या राज्यभरातील रुग्णालयांना जुलै २०२४ पासून छदामही देण्यात आलेला नाही. रुग्णाला डिस्चार्ज दिल्यानंतर सामान्यत: दीड ते दोन महिन्यांत पैसे अदा होतात; पण सध्या मात्र आठ महिन्यांपासून पैशांची प्रतीक्षा आहे. परताव्यासाठी रुग्णालये शासनाकडे पाठपुरावा करत आहेत.

  • योजनेतील राज्यभरातील रुग्णालये - १,६६१
  • जुलै २०२४ पासून थकबाकी - १,५७७ कोटी ७२ लाख,
  • सांगली जिल्ह्यातील रुग्णालये - ६० जुलै
  • २०२४ पासून थकबाकी - ५९ कोटी रुपये


जिल्हानिहाय थकबाकी अशी

जिल्हा  थकबाकी (कोटींमध्ये)
अहिल्यानगर९८ कोटी १४ लाख
अकोला३५ कोटी ६० लाख
अमरावती४६ कोटी
बीड२० कोटी
भंडारा ४ कोटी
बुलडाणा२० कोटी
चंद्रपूर५ कोटी
छत्रपती संभाजीनगर ११३ कोटी
धाराशिव ७ कोटी
धुळे ४५ कोटी
गडचिरोली१ कोटी
गोंदिया७ कोटी
हिंगोली३ कोटी
जळगाव४२ कोटी
जालना २८ कोटी
कोल्हापूर९० कोटी
लातूर २४ कोटी
मुंबई आणि उपनगरे १२७ कोटी
नागपूर  १०६ कोटी,
नांदेड४३ कोटी
नंदुरबार६ कोटी
नाशिक१८७ कोटी
पालघर७ कोटी
परभणी ५ कोटी
पुणे ११५ कोटी
रायगड२९ कोटी
रत्नागिरी१८ कोटी
सातारा४६ कोटी
सिंधुदुर्ग७ कोटी
सोलापूर ७१ कोटी
ठाणे९८ कोटी
वर्धा३९ कोटी
वाशिम  १४ कोटी
यवतमाळ १२ कोटी


 

Web Title: The government finally approved a fund of Rs 1162 crore for the outstanding bills of the Mahatma Phule Jan Arogya Yojana.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.