ठाकरे सरकारला दणका! अनिल परबांच्या अडचणीत वाढ; ईडीने पाठवले समन्स

By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2021 06:42 PM2021-08-29T18:42:36+5:302021-08-29T18:43:10+5:30

ED summons Maharashtra Minister Anil Parab : मनी लाउंडरिंग प्रकरणी हे समन्स चौकशीसाठी बजावण्यात आले आहे.

Thackeray slaps government! Anil Parab increase in difficulty; Summons sent by ED | ठाकरे सरकारला दणका! अनिल परबांच्या अडचणीत वाढ; ईडीने पाठवले समन्स

ठाकरे सरकारला दणका! अनिल परबांच्या अडचणीत वाढ; ईडीने पाठवले समन्स

Next
ठळक मुद्देअनिल परब यांना बॅलार्ड इस्टेट येथील ईडी कार्यालयात मंगळवारी उपस्थित राहण्याचे आदेश समन्सद्वारे देण्यात आले आहे. 

मुंबई - राज्याचे परिवहन मंत्री आणि रत्नागिरीचे पालकमंत्री अनिल परब यांना ईडीने समन्स पाठवले आहे. मनी लाउंडरिंग प्रकरणी हे समन्स चौकशीसाठी बजावण्यात आले आहे. अनिल परब यांना बॅलार्ड इस्टेट येथील ईडी कार्यालयात मंगळवारी उपस्थित राहण्याचे आदेश समन्सद्वारे देण्यात आले आहे. 

राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांना ईडीने १०० कोटीच्या कथित वसुलीसंदर्भात हे समन्स बजावले आहे. ईडीने अनिल परब यांना मंगळवारी म्हणजेच ३१ ऑगस्टला सकाळी ११ वाजता ईडीकडून मुंबईच्या कार्यालयात हजार राहण्याचे आदेश  देण्यात आलेले आहे.

 

शिवसेनेचे नेते, खासदार संजय राऊत यांनी ट्विटद्वारे ही माहिती देत सूचक विधान केले आहे. मंत्री अनिल परब यांना ईडीने नोटीस धाडल्यानंतर राऊत यांनी 'शाब्बास' अशी प्रतिक्रिया देत केंद्र सरकारवर निशाणा साधला  आहे. जन आशीर्वाद जत्रेची सांगता होताच अपेक्षेप्रमाणे अनिल परब यांना ईडीची नोटीस बजावण्यात आली. वरचे सरकार कामाला लागले. भुकंपाचा केंद्रबिंदू रत्नागिरीत होता. परिवहन मंत्री अनिल परब हे रत्नागिरीचे पालक मंत्री आहेत, असे सांगत कृपया chronology समजून घ्या असे सांगत रत्नागिरीत नारायण राणे यांना अटक केल्यामुळेच ही कारवाई करण्यात आल्याचे सूचक विधान राऊत यांनी केले आहे. मात्र, कायदेशीर लढाई कायदयानेच लढू, असेही राऊत यांनी म्हटले आहे. 

 

Web Title: Thackeray slaps government! Anil Parab increase in difficulty; Summons sent by ED

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.