शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

जागा न सोडणाऱ्या भाडेकरूंना अटक

By admin | Updated: November 4, 2014 03:25 IST

धोकादायक इमारतीच्या पुनर्बांधणीची योजना गेली पाच वर्षे रखडवून ठेवणाऱ्या दोन भाडेकरूंना अटक करण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी दिला.

मुंबई : हेकेखोरपणाने घर खाली न करून अंधेरी (पू.) येथील एका मोडकळीस आलेल्या धोकादायक इमारतीच्या पुनर्बांधणीची योजना गेली पाच वर्षे रखडवून ठेवणाऱ्या दोन भाडेकरूंना अटक करण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी दिला.न्यायालयात हजर असलेल्या अनिरुद्ध कैलाश शर्मा आणि हेमंत कैलाश शर्मा या दोन भावांना मध्य दिल्लीच्या पोलीस उपायुक्तांनी स्थानबद्ध करून पुन्हा ५ नोव्हेंबरला न्यायालयात हजर करावे, असा आदेश न्या. जगदीश सिंग केहार व न्या. अरुण मिश्रा यांच्या खंडपीठाने दिला. दरम्यानच्या काळात घर खाली करण्याच्या आदेशाचे पालन करता यावे यासाठी अनिरुद्ध व हेमंतची वयोवृृद्ध आई लता शर्मा हिला या स्थानबद्धतेतून वगळले जात आहे, असे न्यायालयाने नमूद केले. अंधेरी (पू.) येथील न्यू नागरदास क्रॉस रोडवरील ‘विमला भवन’ ही जुनी इमारत मोडकळीस आली असून, ती खाली करण्याचे आदेश महापालिकेने पूर्वीच दिले आहेत. इमारतीतील १० पैकी ९ भाडेकरूंनी घरे खाली करून पुनर्बांधणीसाठी मे. आदिती बिल्डर्स यांच्याशी करार केले आहेत. लता, अनिरुद्ध व हेमंत शर्मा यांनी त्यांची खोेली खाली न केल्याने पुनर्बांधणी गेली पाच वर्षे रखडली आहे. शर्मा वगळता इतर भाडेकरूंनी केलेल्या रिट याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाने पालिकेने इमारत खाली करण्याच्या आदेशाची सक्तीने अंमलबजावणी करावी, असा आदेश देताना शर्मा यांना घर खाली करण्यासाठी ८ आॅक्टोबरपर्यंतची मुदत दिली होती.मात्र या मुदतीत घर खाली न करता शर्मा यांनी सर्वोच्च न्यायालयात अपील केले. त्यावर सोमवारी सुनावणी झाली तेव्हा, शर्मा यांनी अद्यापही घर खाली केले नसल्याचे निदर्शनास आल्यावर अनिरुद्ध व हेमंत यांना ताब्यात घेण्याचे आदेश पोलिसांना दिले गेले. या पक्षकारांनी पाच वर्षे न्यायालयीन प्रक्रियेचा दुरुपयोग करून इमारतीच्या पुनर्बांधणीचे काम रखडवून ठेवले आहे, याविषयी आमची खात्री झाली असल्याचे खंडपीठाने नमूद केले. (विशेष प्रतिनिधी)