जळगावमध्ये बँकेत दहा लाखांची चोरी

By Admin | Updated: February 25, 2016 03:09 IST2016-02-25T03:09:26+5:302016-02-25T03:09:26+5:30

नांद्रा येथील बँक आॅफ बडोदा शाखा कार्यालयाचे गज कापून चोरट्यांनी मंगळवारी रात्री १० लाख ४५ हजार ९६९ रुपयांच्या रोख रक्कमेसह २० हजार रुपयांचा सीसीटीव्हीचा डीव्हीआर लांबवला.

Ten lakhs of theft in a bank in Jalgaon | जळगावमध्ये बँकेत दहा लाखांची चोरी

जळगावमध्ये बँकेत दहा लाखांची चोरी

पाचोरा (जि. जळगाव) : नांद्रा येथील बँक आॅफ बडोदा शाखा कार्यालयाचे गज कापून चोरट्यांनी मंगळवारी रात्री १० लाख ४५ हजार ९६९ रुपयांच्या रोख रक्कमेसह २० हजार रुपयांचा सीसीटीव्हीचा डीव्हीआर लांबवला.
नांद्रा येथे वस्तीपासून थोड्या अंतरावर बडोदा बँक शाखेची इमारत आहे. सकाळी चोरीचा प्रकार लक्षात आला. चोरट्यांनी गॅस कटरने स्ट्राँगरुम व लॉक कापून तिजोरीचा दरवाजा उघडला होता. बँकेतील सायरन पेटीचेही नुकसान केले. यापूर्वी दोन वेळा चोरी होऊनही बँकेत वॉचमनची नियुक्ती केलेली नाही. (प्रतिनिधी)

Web Title: Ten lakhs of theft in a bank in Jalgaon