मंदिरात गुलाम अली यांचे भजन

By Admin | Updated: May 13, 2015 01:36 IST2015-05-13T01:36:58+5:302015-05-13T01:36:58+5:30

सांस्कृतिक देवाण-घेवाणीच्या उद्देशाने मोदी यांच्या वाराणसी या मतदारसंघात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाने तर वेगळेच वातावरण

Temples Ali's hymns in the temple | मंदिरात गुलाम अली यांचे भजन

मंदिरात गुलाम अली यांचे भजन

सांस्कृतिक देवाण-घेवाणीच्या उद्देशाने मोदी यांच्या वाराणसी या मतदारसंघात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाने तर वेगळेच वातावरण अनुभवास आले. पाकिस्तानचे ख्यातनाम गझल सम्राट गुलाम अली यांनी वाराणसीतील संकट मोचन मंदिरात भजन गाऊन सर्वांना भक्तिरसात चिंब भिजवले. मोदी पंतप्रधान झाल्यापासून भारतात बदल होत असल्याचे दिसत आहे. वाराणसीत पहिल्यापेक्षा अधिक विकास होत असून, मोदी प्रेमाचा संदेश सोबत घेऊन वाटचाल करीत आहेत, अशा गौरवपूर्ण शब्दांत गुलाम अली यांनी मोदी यांची प्रशंसाही केली. या कार्यक्रमाला मोदी यांना उपस्थित राहता आले नाही; परंतु, टिष्ट्वटरवरून त्यांनी याबाबत खेद जरूर व्यक्त केला.

Web Title: Temples Ali's hymns in the temple