शहरं
Join us  
Trending Stories
1
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
2
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
3
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
4
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
5
२७ वर्षांपूर्वी दया नायक यांनी केलेल्या एन्काउंटरचा बदला घेतला; पुतण्याने 'त्या' खबऱ्याला शोधून संपवलं
6
रेकॉर्ड ब्रेकर KL राहुल! हिटमॅन रोहित, विराटला जमलं नाही ते या पठ्ठ्यानं करुन दाखवलं
7
क्रूरतेचा कळस! दात तोडले, डोकं फोडलं अन् शेवटी... ब्लॉक केल्याच्या रागातून २ मुलांच्या आईला संपवलं
8
बघून धक्का बसेल! कारमधून चक्क सहा जनावरांची तस्करी, अपघातामुळे फुटले बिंग; एका गायीचा मृत्यू
9
KL Rahul Fastest Century : १२ धावांवर कॅच सुटला! मग KL राहुलनं ठोकली विक्रमी सेंच्युरी
10
नीचभंग विपरीत धनयोग: ६ राशींना चांगले दिवस, नोकरीत यश-प्रगती; अडकलेले पैसे मिळतील, लाभ काळ!
11
“इतिहास, अध्यात्म, विकास अन् नारीशक्तीचा महासंगम!”; DCM एकनाथ शिंदे यांचे नवे विकास मॉडेल
12
बापरे! बेन स्टोक्सचा चेहरा सर्जरीनंतर पूर्णच बदलून गेला, पहिली झलक पाहताच फॅन्सना बसेल धक्का
13
भाजपा नेत्यांची धाकधूक वाढली! जोशी, केचेंना पुन्हा संधी की पोतदार, सोले, कोठेकर, भेंडे, तिवारी; विधान परिषदेवर कुणाला संधी?
14
सकाळी फ्रेश अन् दुपारी चेहरा निस्तेज, केसही खराब? ऑफिसमधील AC ठरतोय तुमच्या सौंदर्याचा शत्रू
15
खरेच मध्यरात्री उद्धव ठाकरेंशी भेट झाली का? CM देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
16
जेवणाचा डबा द्यायला गेली अन् आगीत जळून खाक झाली... भंगाराच्या गोदामात मृत्यूचं तांडव! ४ जणांचा मृत्यू
17
इस्लामाबादमध्ये युद्धाचा फैसला! ट्रम्प यांचे दूत अन् इराणचे मंत्री आमनेसामने; जगात शांतता प्रस्थापित होणार?
18
"माझ्या कानाखाली मारण्याच्या मुद्द्यावरून हरभजनने १ कोटी कमावले"; श्रीसंतचा गंभीर आरोप
19
भोंदू मनोहर भोसलेचा मुक्काम वाढला; माढा न्यायालयाने सुनावली तीन दिवसाची पोलीस कोठडी
20
Rohit Pawar : "शिवछत्रपतींचा अवमान करणाऱ्या बागेश्वरवर महाराष्ट्रात बंदी घाला,अन्यथा..."; रोहित पवार आक्रमक
Daily Top 2Weekly Top 5

‘शरद’च्या विद्यार्थ्यांनी विकसित केले तंत्र

By admin | Updated: June 8, 2015 00:53 IST

नादुरुस्त कपॅसिटरकडून मिळणार संदेश : विद्युत अपव्यव, आर्थिक नुकसान टळणार

यड्राव : मोठमोठ्या उद्योगांमध्ये तसेच महावितरण कंपनीमध्ये कार्यरत असणारे कपॅसिटर नादुरुस्त झाल्यास त्याचा संदेश संबंधितांना मिळणार आहे. यामुळे नादुरुस्त कपॅसिटर शोधणे व त्यासाठी उद्योगांना विद्युत पुरवठा खंडित ठेवावा लागणार नाही, असे तंत्र येथील शरद इंजिनिअरिंगच्या इलेक्ट्रिकल विभागातील विद्यार्थ्यांनी विकसित केले आहे. या तंत्रामुळे विद्युत पुरवठा अखंडित राहून मनुष्यबळाचा उद्योगास उपयोग होणार आहे, तर उद्योगांना विद्युत पुरवठा खंडित होणार नसल्याने आर्थिक नुकसान टळणार आहे.महावितरणकडून ग्राहकास विद्युत पुरवठा करताना तसेच मोठमोठ्या उद्योगांमध्ये विद्युत पुरवठा वितरण क्षमता वाढविण्याकरिता कपॅसिटर बॅक बसविण्यात येतात. विद्युत पुरवठा होताना तो योग्य प्रमाणात होण्यासाठी एकापेक्षा जादा कपॅसिटर बसविण्यात येतात. त्यामधील कोणत्याही कपॅसिटरमध्ये दोष निर्माण झाला, तर वितरण व्यवस्थेत विस्कळीतपणा येतो. त्यातील नेमका कोणता कपॅसिटर बिघडला हे समजणे अवघड होते. याकरिता संपूर्ण वितरण व्यवस्था बंद करावी लागते. कपॅसिटर काढून तपासणीकरिता न्यावे लागतात. त्याकरिता बराच वेळ लागतो. शरद इंजिनिअरिंगच्या इलेक्ट्रिकल विभागातील रणजित पाटील, स्वप्निल भाट, चेतन कदम, सोनल माळी या विद्यार्थ्यांनी या विद्युत वितरण व्यवस्थेचा व त्यातील गुण-दोषांचा अभ्यास केला. प्रा. मंगेश कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली ‘रिअल टाईम मॉनिटरिंग स्कीम फॉर हाय व्होल्टेज कपॅसिटर बॅक’ हे युनिट तयार करून नवे तंत्र विकसित केले आहे.उद्योगाना नवे तंत्र उपयुक्तसध्याच्या स्पर्धेच्या युगात उद्योगाला अखंड विद्युत पुरवठा सुरू राहणे उद्यमशीलतेसाठी फायद्याचे आहे. शरदच्या विद्यार्थ्यांनी विकसित केलेल्या तंत्रज्ञानाचा वापर झाल्यास उद्योगातील आर्थिक नुकसान कमी करता येईल, असे सांगलीच्या शारदा इलेक्ट्रॉनिक्स रिसर्च अ‍ॅण्ड डेव्हलपमेंट विभागाचे संचालक अभिजित शेटे यांनी सांगितले.