शहरं
Join us  
Trending Stories
1
वर्ल्ड कप संघाचा उप कर्णधार हार्दिक पांड्या ठरला 'गोल्डन डक'! MI चे ४ फलंदाज २२ धावांत तंबूत 
2
'नरेंद्र मोदी मोठ्या मनाचा नेता, एक मेसेज पाठवला अन् काम झालं', काँग्रेसच्या माजी नेत्यानं सांगितला किस्सा
3
“भटकती आत्मा तर नरेंद्र मोदीच, प्रधानमंत्री कमी अन् प्रचारमंत्रीच जास्त”; नाना पटोलेंची टीका
4
आनंदाची बातमी...! ₹75000 पार जाणाऱ्या Gold Price मध्ये पुन्हा मोठी घसरण, पटा-पट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट 
5
देशात फक्त मोदी पॅटर्न चालतो, बाकी सगळे भंगारात; एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर प्रहार
6
BANW vs INDW: भारताचा झंझावात कायम; पावसाची 'बॅटिंग' अन् बांगलादेशचा सलग दुसरा पराभव
7
दुर्दैवी! प्रसूती दरम्यान 'बत्ती गूल'; टॉर्चच्या प्रकाशात सिझर पण बाळासह आईचा मृत्यू
8
भारतीय संघ दोन तुकड्यांमध्ये अमेरिकेला रवाना होणार, पहिली बॅच २१ मे रोजी तर... 
9
अरविंद केजरीवालांना ठीक निवडणुकीपूर्वी का अटक केले? सुप्रीम कोर्टाचा ED ला थेट सवाल...
10
अरविंद सावंतांविरोधात तिकीट मिळालेल्या यामिनी जाधव यांची अशी आहे राजकीय कारकीर्द
11
Yuzvendra Chahal wife Dhanashree Verma: युजवेंद्र चहलला टी२० वर्ल्डकपसाठी टीम इंडियात संधी; आनंदाच्या भरात पत्नी धनश्रीने काय केलं पाहा...
12
कल्याणमध्ये तिरंगी लढत होणार; लोकसभेसाठी वंचितकडून आणखी ३ उमेदवारांची घोषणा
13
Team India for T20WC 2024 : वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारताचा संघ जाहीर, हार्दिक पांड्या उप कर्णधार, KL Rahul चा पत्ता कट
14
मोठी अपडेट्स : Rinku Singh ची होणार १५ मध्ये एन्ट्री? भारतीय संघात केला जाऊ शकतो बदल
15
सोढी बेपत्ता, अय्यर टेन्शनमध्ये; 'तारक मेहता...' अभिनेते तनुज महाशब्देंनी दिली प्रतिक्रिया
16
Rajnath Singh : "डायनासोरप्रमाणे काँग्रेस पृथ्वीवरुन नाहीशी होईल, हे बुडणारं जहाज"; राजनाथ सिंह यांचं टीकास्त्र
17
सांगलीत मोठा ट्विस्ट; विशाल पाटील यांची ताकद वाढली! वंचित बहुजन आघाडीने दिला पाठिंबा
18
किंग खानच्या KKR मधील प्रमुख खेळाडूवर एका सामन्याची बंदी; DC विरुद्धची चूक भोवली
19
याला म्हणतात ढासू शेअर...! 10 दिवसांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल; एका वर्षात 3 पट वाढला भाव
20
Rohit Sharma throwback picture: रोहित शर्माच्या आईने वाढदिवशी शेअर केला 'हिटमॅन'चा जुना फोटो, चाहत्यांनी केल्या भन्नाट कमेंट्स

शिक्षकांची यंदाची दिवाळी आनंददायी व प्रकाशमान, परंतु काहींना स्वार्थापोटी शिक्षकांची दिवाळी अंधारात दिसते- विनोद तावडे

By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2017 6:52 PM

रात्र शाळेतील शिक्षकांना काढलेले नाही. त्या शिक्षकांपैकी जे शिक्षक दोन नोक-या करीत होते. त्यांना एक नोकरी देण्यात आली. जे शिक्षक अर्धनोकरीत होते, त्यांना पूर्णवेळ नोकरी देण्यात आली.

मुंबई - रात्र शाळेतील शिक्षकांना काढलेले नाही. त्या शिक्षकांपैकी जे शिक्षक दोन नोक-या करीत होते. त्यांना एक नोकरी देण्यात आली. जे शिक्षक अर्धनोकरीत होते, त्यांना पूर्णवेळ नोकरी देण्यात आली. आमदार कपिल पाटील मात्र दोन नोकरी करणा-या शिक्षकांना कायम ठेवा आणि अर्धनोकरी करणा-या शिक्षकांना घरी पाठवा, असा आग्रह धरीत आहेत.आतापर्यंत रात्रशाळा शिक्षकांसाठी यांनी काही केले नाही. मात्र रात्र शाळांच्या शिक्षकांच्या नोक-या टिकाव्यात आणि त्यांना न्याय मिळावा यासाठी शासनाने चांगली पध्दत आणली. त्यामुळे या शिक्षकांची दिवाळी अंधारात नाही. आ. कपिल पाटील यांना त्यांच्या स्वार्थापोटी शिक्षकांची दिवाळी अंधारात दिसत आहे. त्यात त्यांचे हित आणि स्वार्थ आहे. सामान्य गरिबांचे हित त्यांना दिसत नाही. शिक्षकांची यंदाची दिवाळी आनंदात आणि प्रकाशमान झालेली आहे, असे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी स्पष्ट केले.युनियन बँकेऐवजी शिक्षकांचे पगार मुंबई बँकेतून देण्यात येतात. मात्र आ.कपिल पाटील यांचे कोणाचेतरी लागेबांधे असल्यामुळे ते दुखावले गेले आहेत. शिक्षकांना गणपती आणि दिवाळी सणांच्या वेळी त्यांचा पगार मुंबई बँकेत वेळेत जमा झाला. ज्या शिक्षकांनी मुंबई बँकेत आपले खाते उघडले त्या शिक्षकांचा पगार सणाच्या आधी झाला. शिक्षकांचा पगार सणाच्या आधी खात्यावर जमा झाला असतानाही केवळ त्यांचे लागेबांधे असल्यामुळे एका विशिष्ट बँकेत शिक्षकांचा पगार जमा करण्याचा अट्टाहास ते कोणत्या स्वार्थापोटी करत आहेत हे कळत नाही, असा टोला ही तावडे यांनी मारला.शिक्षक मतदार संघाच्या निवडणुका जवळ आल्यामुळे त्यांना आता प्रचारासाठी काहीच नाही. त्यामुळे काळे कंदील लावणे, स्वत:ला अटक करून घेणे ही शोबाजी करून ते शिक्षकांना भुलवू शकत नाहीत, असेही तावडे यांनी स्पष्ट केले. अनेक शिक्षकांच्या घरात व विद्यार्थ्यांच्या जीवनात आधीच्या सरकारच्या तुलनेत यंदाची दिवाळी आनंददायी व प्रकाशमान अशी आहे.काळ्या कंदिलामुळे राज्यातील कोणत्याही शिक्षकांच्या दिवाळीला अपशकुन होणार नाही असे सांगतांना तावडे म्हणाले की, १४ इंग्रजी शाळांमधील मुले मराठी जिल्हा परिषद शाळेत येतात, शिक्षणामध्ये महाराष्ट्र १४व्या क्रमांकावरून तिस-या क्रमांकावर येतो, महाराष्ट्रात प्रगत शैक्षणिक कार्यक्रमाची अंमलबजावणी यशस्वीपणे सुरू असून त्याला अभूतपूर्व प्रतिसाद मिळत आहे. महाराष्ट्रातील अनेक शाळा डिजिटल होत आहेत. त्यामुळे हे शिक्षण अंधारात जाण्याचे लक्षण नाही. केवळ राजकीय स्वार्थापोटी जाणीवपूर्वक स्वत:चे हित साध्य करण्यासाठी शिक्षकांना खाईत लोटणा-यांना ही प्रगती दिसणार नाही, असेही तावडे यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Vinod Tawdeविनोद तावडेTeacherशिक्षकdiwaliदिवाळी