फडणवीसांपेक्षा तावडे यांना अधिक ‘लाइक्स’

By Admin | Updated: August 24, 2014 02:52 IST2014-08-24T02:52:48+5:302014-08-24T02:52:48+5:30

विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते विनोद तावडे सर्वात आघाडीवर आहेत. त्यांनी फेसबुकवर आपल्या पक्षाच्या इतर युवा नेत्यांना मागे टाकले आहे.

Tawade has more 'Lyrics' than Fadnavis | फडणवीसांपेक्षा तावडे यांना अधिक ‘लाइक्स’

फडणवीसांपेक्षा तावडे यांना अधिक ‘लाइक्स’

मुंबई : महाराष्ट्रात अच्छे दिन आणण्याचे भाजपा नेते कितीही स्वप्ने पाहत असले तरी या साठमारीत पक्षाचा प्रत्येकच नेता आपापल्या पद्धतीने पुढे राहण्याचा प्रय} करीत आहे व यात विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते विनोद तावडे सर्वात आघाडीवर आहेत. त्यांनी फेसबुकवर आपल्या पक्षाच्या इतर युवा नेत्यांना मागे टाकले आहे.
निवडणुकीत सोशल मीडियाच्या वाढत्या उपयोगामुळे प्रत्येक राजकीय व्यक्ती फेसबुक, व्हॉट्स अॅप, टि¦टर आदींवर जास्तीतजास्त सक्रिय राहण्याचा प्रय} करीत आहे. परंतु आता केवळ सक्रिय राहून चालत नाही, तर सर्वात पुढे राहणोही प्रतिष्ठेचे लक्षण मानले जात आहे. लोकसभेप्रमाणोच विधानसभा निवडणुकीतही भाजपा सोशल मीडियाला आपला महत्त्वाचा आधार बनविण्यात गुंतली आहे. परंतु खरी स्थिती अशी आहे की याबाबत पक्षांतर्गत स्पर्धाही लागली आहे. फेसबुकवर नजर टाकली असता विनोद तावडे हे आपल्याच पक्षाचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांच्यापेक्षा एक लाखाहून अधिक चाहत्यांनी पुढे आहेत. पक्षात नव्या नेत्यांबरोबरच कौटुंबिक राजकीय पाश्र्वभूमी असणा:या पंकजा पालवे मुंडे आणि पूनम महाजन यांची स्थितीही येथे फारशी चांगली 
नाही.  आगामी निवडणुकीत लोकप्रियतेवरून होणा:या स्पर्धेचे महत्त्वाचे कारण ठरेल.
 
फेसबुकवर भाजपा नेते
विनोद तावडे 4,77,549
देवेंद्र फडणवीस 3,61,111
पंकजा मुंडे-पालवे 1,37,351
पूनम महाजन 1,13,956
एकनाथ खडसे 52,क्5क्

 

Web Title: Tawade has more 'Lyrics' than Fadnavis