पिंपरी : लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळे यांचा निसटता विजय झाला. बारामती, भोर व इंदापूर मतदारसंघांत आम्ही कमी पडलो. आगामी विधानसभा निवडणुकीत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा पराभव करण्याचे टार्गेट असून, त्यानंतर २०२४ च्या निवडणुकीत सुळे यांच्या पराभवाचे उद्दिष्ट आहे, अशी माहिती पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. पुण्याच्या पालकमंत्रिपदी नियुक्ती झाल्यानंतर पाटील यांनी मंगळवारी पहिल्यांदाच पिंपरी-चिंचवड शहर भाजपाच्या कार्यालयाला भेट दिली. विधानसभा निवडणुकीसंदर्भात कार्यकर्त्यांशी संवाद साधला.
आता अजित पवारांना पाडण्याचं लक्ष्य; चंद्रकांत पाटलांचा 'इरादा पक्का'
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2019 16:52 IST
बारामती मतदारसंघातून खासदार सुप्रिया सुळे यांचा पराभव करण्याच्या व्युहरचनेत आम्ही थोडे कमी पडलो.
आता अजित पवारांना पाडण्याचं लक्ष्य; चंद्रकांत पाटलांचा 'इरादा पक्का'
ठळक मुद्दे दर १५ दिवसाला बारामती मतदारसंघात जाणार लोकसभेतील सहाही विधानसभा मतदारसंघांत जोर लावणार