शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

तमाशापंढरी गजबजली

By admin | Updated: March 21, 2015 23:07 IST

गुढी पाडव्याचे औचित्य साधून तमाशाची सुपारी देण्यासाठी राज्यातून आलेले गावकारभारी, पंच, यात्रा कमिटी सदस्य व ग्रामस्थ यांच्यामुळे तमाशापंढरीला यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते.

नारायणगाव : लोकनाट्य तमाशाचे माहेरघर समजल्या जाणाऱ्या नारायणगाव येथील तमाशा कलापंढरीत गुढी पाडव्याचे औचित्य साधून तमाशाची सुपारी देण्यासाठी राज्यातून आलेले गावकारभारी, पंच, यात्रा कमिटी सदस्य व ग्रामस्थ यांच्यामुळे तमाशापंढरीला यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते.या वर्षी झालेल्या अवकाळी पावसामुळे तमाशा बुकिंगवर परिणाम होईल, असे वाटत होते. मात्र, दिवसभरात २०० हून अधिक सुपाऱ्या तमाशा खेळाच्या गेल्या आहेत. जवळपास अडीच कोटी रुपयांची उलाढाल आज तमाशापंढरीत झाली़, अशी माहिती लोकनाट्य मराठी तमाशा परिषदेचे अध्यक्ष संभाजीराजे जाधव यांनी दिली़. लोकनाट्य तमाशा फडमालकांच्या दृष्टीने गुढी पाडवा हा दिवस अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. गुढी पाडव्याचे औचित्य साधून नारायणगाव येथील तमाशापंढरीत संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रातील तसेच नगर, नाशिक, ठाणे या भागातील ग्रामस्थ आल्याने या ठिकाणी जणू जत्राच भरते. आपल्या गावातील यात्रेनिमित्त तमाशाची सुपारी देण्यासाठी गावकारभारी, पंच, यात्रा कमिटी सदस्य व ग्रामस्थ येथील २९ राहुट्यांमध्ये आले होते. तमाशा ठरविताना तमाशात कलाकार किती, महिला कलावंत किती, वग कोणता, गाणी किती होणार यांची प्रामुख्याने विचारणा गावपुढाऱ्यांकडून होत होती. कालाष्टमी व पौर्णिमा या दिवसांसाठी तमाशा खेळाला जास्त मागणी होती़ यंदा बैलगाडा शर्यतींवर बंदी असल्याने यात्रातील रंगत कमी झाली असली तरी त्यामुळे तमाशाच्या खेळाला महत्व वाढले आहे. नारायणगावातील गर्दी आणखी वाढण्याची चिन्हे आहेत.(वार्ताहर)४गुढी पाडव्यानंतर ग्रामीण भागात यात्रांच्या हंगामाला सुरूवात होते. यात्रा म्हटली की तमाशा आलाच. तमाशा ठरविण्यासाठी गावोगावचे पुढारी गाववर्णनी काढतात. त्यानंतर नारायणगावातून येऊन तमाशाची सुपारी दिली जाते. ज्याची सुपारी मोठी त्या गावची यात्रा मोठी असे समजले जाते.४गावच्या लोकवर्गणीतून कुस्त्यांचा आखाडाही भरवला जातो. त्यामध्ये जिल्हाभरातून नामवंत पैलवान हजेरी लावतात. यंदा बैलगाडा शर्यतीवर बंदी असल्याने केवळ हेच मनोरंजनाचे साधन आहे.४प्रत्येक फडमालकाला दिवसभरात ७ ते १० सुपाऱ्या मिळाल्या. या वर्षी झालेल्या अवकाळी मुसळधार पावसामुळे तमाशा बुकिंगला फटका बसेल, असे वाटत असताना प्रत्यक्षात सर्वच फडमालकांना हे वर्ष चांगले गेले़ तमाशा फडमालकांच्या दृष्टीने पौर्णिमा, कालाष्टमी या दिवसांना विशेष महत्त्व असून, या तारखांना लोकनाट्य तमाशा खेळाची सुपारी सर्वाधिक किमतीची मिळते़ ४या वर्षी सर्वाधिक सुपारी मिळाली ती भिका- भीमा यांना. त्यांची कालाष्टमी ३ लाख २५ हजार, तर पौर्णिमा १ लाख ९१ हजारांना गेली. रघुवीर खेडकर यांची कालाष्टमी ३ लाखांना आणि पौर्णिमा २ लाख २५ हजार रुपयांना गेली. तर, त्याखालोखाल कुंदा पाटील, मालती इनामदार, अंजली नाशिककर, पांडुरंग मुळे मांजरवाडीकर, जगनकुमार वेळवंडकर, विनायक महाडिक, आनंद लोकनाट्य जळगावकर, हरिभाऊ बढे नगरकर, काळू-बाळू, दत्ता महाडिक पुणेकर, विठाबाई भाऊ मांग नारायणगावकर, संध्या माने सोलापूरकर, रवींद्र खोमणे औरंगाबादकर, जगनकुमार वेळवंडकर, लता पुणेकर यांच्या सुपाऱ्या गेल्या अशी माहिती नारायणगाव लोकनाट्य तमाशा कलापंढरीचे अध्यक्ष गणपतदादा कोकणे व उपाध्यक्ष अन्वरभाई पटेल यांनी दिली़. सव्वातीन लाखांची सुपारी४या वर्षी सर्वाधिक सुपारी मिळाली ती भिका-भीमा यांना. त्यांची कालाष्टमी ३ लाख २५ हजार, तर पौर्णिमा १ लाख ९१ हजारांना गेली. ४तमाशापंढरीत संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रातील तसेच नगर, नाशिक, ठाणे या भागातील ग्रामस्थ आल्याने या ठिकाणी जणू जत्राच भरते. नारायणगाव येथे तमाशा फडाच्या २९ राहुट्या आहेत़ एका राहुटीत साधारणपणे १० ते १५ सुपाऱ्या बुक झालेल्या आहेत़ मोठ्या फडाच्या सुपाऱ्या जवळजवळ बुक झालेल्या आहेत़ सरासरी सर्व फडांचे ६० ते ७० टक्के बुकिंग झालेले आहे़ मध्यम व छोट्या फडांनादेखील या वर्षी चांगली मागणी आहे.- संभाजीराजे जाधव, अध्यक्षलोकनाट्य मराठी तमाशा परिषद