...तर उद्धव ठाकरेंचा जाहीर सत्कार करू; भाजपाचं चॅलेंज, फक्त १ तासाची दिली वेळ

By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2023 06:49 PM2023-08-28T18:49:42+5:302023-08-28T18:50:40+5:30

तुमच्याकडे विषारी सापांचा वावर वाढलाय तो आधी ठेचून काढा. राज्यातील जनता नशीबवान आहे. आणखी अडीच वर्ष उद्धव ठाकरेंना मिळाली असती तर महाराष्ट्राचे वाटोळे झाले असते असं भाजपा आमदार प्रविण दरेकरांनी म्हटलं.

Talk on the development of Maharashtra for only 1 hour, BJP's challenge to Uddhav Thackeray | ...तर उद्धव ठाकरेंचा जाहीर सत्कार करू; भाजपाचं चॅलेंज, फक्त १ तासाची दिली वेळ

...तर उद्धव ठाकरेंचा जाहीर सत्कार करू; भाजपाचं चॅलेंज, फक्त १ तासाची दिली वेळ

googlenewsNext

मुंबई – उद्धव ठाकरे कपाळकरंटे असून कोविड काळातील भ्रष्टाचाराने कलंकित झाले आहेत. अलीकडच्या काळात ते वैफल्यग्रस्त झालेत. तुमच्या हाडाची काडे झालीत ते महाराष्ट्रातील जनतेला दिसून आले. बाळासाहेबांनानंतर उद्धव ठाकरे, उद्धव ठाकरेंनंतर आदित्य ठाकरे ही लोकशाहीची श्रृंखळा आहे की घराणेशाही. केवळ कुटुंबाचा विचार करून तुम्ही सत्ता उपभोगली. शिवसैनिकांचा विचार केला नाही अशा शब्दात भाजपा नेते आमदार प्रविण दरेकर यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला.

प्रविण दरेकर म्हणाले की, तुमची सत्ता असताना घरकोंबडे म्हणून तुम्ही घरात बसला. १५ दिवस आराम करायला विदेशात गेले होते. पण देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रात गुंतवणूक आणण्यासाठी परदेश दौऱ्यावर गेले होते. शिवसैनिकांची काळजी करण्याऐवजी भाजपा कार्यकर्त्यांची काळजी करता, ज्या शिवसैनिकांनी आयुष्यभर सतरंज्या उचलल्या त्यांना तुम्ही काय दिले. स्वत: मुख्यमंत्री झालात, मुलगा मंत्री झाला, शिवसैनिक वाऱ्यावर सोडले. ज्यांची घरे बर्बाद केली त्यांच्याकडे पाहण्यासाठी उद्धव ठाकरेंकडे वेळ नाही. उद्धव ठाकरेंच्या बाजूला सुषमा अंधारे, प्रियंका चर्तुवेदी होत्या. शिवसेना नेते कुठे आहेत. उद्धव ठाकरेंनी केंद्र, राज्य सरकारच्या योजना समजून घ्या, लाभार्थ्यांची संख्या तुम्हाला कळाली तर डोळे पांढरे होतील असा टोला उद्धव ठाकरेंना लगावला.

तसेच चंद्रयान ३ ने चंद्रावर भारताचा ठसा उमटवला. मोदी सरकारच्या द्रष्टेपणावर जनतेचा विश्वास आहे, तुम्ही लोकांचा विश्वास गमावला. लोकांचा विश्वास मातीत घातला. उद्धव ठाकरेंच्या नावातच उद्धटपणा, अहंकार आहे. भ्रमिष्ट झाल्यासारखे उद्धव ठाकरे बोलतात, गद्दार बोलल्याशिवाय उद्धव ठाकरेंचा दिवस पुढे ढकलला जात नाही. तुमच्याकडे विषारी सापांचा वावर वाढलाय तो आधी ठेचून काढा. राज्यातील जनता नशीबवान आहे. आणखी अडीच वर्ष उद्धव ठाकरेंना मिळाली असती तर महाराष्ट्राचे वाटोळे झाले असते असा घणाघातही प्रविण दरेकर यांनी उद्धव ठाकरेंवर केला.

दरम्यान, शेतकरी, वीज, पाणी या सर्व विषयांवर एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार काम करतंय. अडीच वर्ष मुख्यमंत्री राहून तुम्ही काय दिवे लावलेत हे जनतेने पाहिले आहे. आमच्या नेत्यांना वेडेवाकडे बोलाल तर तुमचेही कपडे काढायला मागेपुढे बघणार नाही. संयमांचा उद्रेक झाला तर भाजपा कार्यकर्ते कृतीतून ते दाखवून देतील. उद्धव ठाकरेंनी टोमणे न मारता, कोट्या न करता, यमक न जुळवता सलग १ तास महाराष्ट्राच्या विकासावर बोलावे. जर उद्धव ठाकरेंनी तसे केले तर त्यांचा जाहीर सत्कार भाजपाकडून केला जाईल असं आव्हानही प्रविण दरेकर यांनी उद्धव ठाकरेंना दिले.

Web Title: Talk on the development of Maharashtra for only 1 hour, BJP's challenge to Uddhav Thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.