शहरं
Join us  
Trending Stories
1
आमनेसामने Video: ठाकरे गटाकडून 50 खोकेची घोषणाबाजी; एकनाथ शिंदेंकडून धनुष्यबाणाचा इशारा
2
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान
3
"लाचारीच्या सर्व मर्यादा सोडल्या"; जिरेटोप प्रकरणावरून शरद पवारांनी प्रफुल्ल पटेलांना फटकारलं!
4
‘पृथ्वीराज चव्हाण यांनी पोपट घेऊन भविष्यवाणी सांगण्यास बसावे’, अजित पवार गटाचा टोला 
5
महिन्याभरात २६७ शेतकऱ्यांच्या आत्महत्या; जयंत पाटलांनी सरकारला धारेवर धरलं
6
‘मोदींनी एकदा मला फोन केला आणि म्हणाले, माझा अमेरिकेचा व्हिसा फेटाळलाय, तेव्हा मीच…’ शरद पवार यांनी सांगितली आठवण
7
"महिलांच्या कमावण्याच्या नादात वाढतंय घटस्फोटाचं प्रमाण"; सईद अन्वरचं वादग्रस्त विधान! VIDEO व्हायरल
8
Blog: इरफान पठाणला बोलायला काय जातंय! परदेशी खेळाडू नसतील तर IPL मध्ये मजा राहील का?
9
Adani Group : अदानींच्या 'या' कंपनीला मोठा झटका, नॉर्वेच्या सर्वात मोठ्या वेल्थ फंडानं केलं ब्लॅकलिस्ट
10
मनोज जरांगे पाटील यांची ८ जून रोजी होणारी सभा रद्द, या दोन कारणांमुळे घेतला निर्णय
11
बाळासाहेबांवर टीका करणाऱ्या अंधारेंना पक्षात का घेतलं?, CM विरोधात लढणार का?; आदित्य ठाकरेंची रोखठोक उत्तरं
12
Fact Check: Video - मुंबईत भाजपाच्या किटमध्ये सोन्याची बिस्किटं सापडली?; जाणून घ्या, 'सत्य'
13
...तर ईडी आरोपीला पीएमएलए कायद्यानुसार अटक करू शकत नाही; सर्वोच्च न्यायालयाची महत्वाची टिप्पणी
14
गाडी चालविताना मोबाईल काय साधा कागद जरी हातात जरी पकडला तरी दंड; जाणून घ्या वाहतुकीचा नियम...
15
अजित पवार गेले कुणीकडे?, गैरहजेरीनं विविध चर्चा; शरद पवारांनी दिली महत्त्वाची माहिती
16
Post Officeच्या 'या' स्कीममध्ये PM Modiनी देखील केलीये ९ लाखांची गुंतवणूक, तुम्हालाही मिळेल उत्तम रिटर्न
17
'ड्रग्स पासून दूर राहा', शुभांगी गोखलेंनी लेकीला हात जोडून सांगितलं; ती लंडनला गेल्यावर...
18
कांद्यावरून पंतप्रधान मोदींना प्रश्न विचारणाऱ्या तरुणाचा मला अभिमान, शरद पवारांचं मोठं विधान
19
ना पाकिस्तान, ना ऑस्ट्रेलिया! ब्रायन लाराने जाहीर केले T20 World Cup चे ४ सेमीफायनलिस्ट
20
दोन्ही पायांनी दिव्यांग, जिद्द नाही सोडली; स्वत:चा जीव धोक्यात घालून वाचवला हजारो लोकांचा जीव

शिबिरे घ्या, मुलांना ‘आधार’ द्या, डॉ. नीलम गोऱ्हे यांचे शिक्षण सचिवांना निर्देश

By ऑनलाइन लोकमत | Published: April 02, 2024 1:00 PM

Student News:

 यवतमाळ : राज्यातील १२ लाखांपेक्षा अधिक विद्यार्थ्यांचे आधार व्हॅलिडेशन मुदतीत पूर्ण होऊ शकले नाही. त्यामुळे ते गणवेश व अन्य योजनांपासून वंचित राहण्याची शक्यता आहे, याबाबतचे वृत्त ‘लोकमत’ने सोमवारी प्रकाशित केले. त्याची दखल घेत विधान परिषदेच्या उपसभापती डाॅ. नीलम गोऱ्हे यांनी शिक्षण सचिव यांच्याशी संपर्क करत शाळानिहाय शिबिरे घेऊन आधार कार्ड काढून द्यावे, असे निर्देश दिले.

राज्यातील २ कोटी १२ लाख ५५ हजार विद्यार्थ्यांचे आधार क्रमांक युडायस प्रणालीवर व्हॅलिड करून नोंदविण्याचे निर्देश सर्व शाळांना देण्यात आले होते. त्यासाठी ३० मार्चपर्यंत किमान ९५ टक्के काम पूर्ण करण्याचे बंधन होते. 

शाळेत बोगस पटसंख्या आढळल्यास कारवाईचे निर्देशही मुदत उलटल्यावरही राज्यातील १२ लाखांवर विद्यार्थ्यांचे आधार इनव्हॅलिड असल्याचे निदर्शनास आले, तर ५ लाख १७ हजार विद्यार्थ्यांचे आधारकार्डच उपलब्ध नसल्याची बाब पुढे आली. त्यामुळे तेवढी विद्यार्थीसंख्या कमी गृहित धरून पुढील सत्रात योजनांच्या निधीत कपात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ही बाब ‘लोकमत’ने सोमवारी १ एप्रिलच्या अंकात प्रकाशित केली. या वृत्ताची गंभीर दखल उपसभापती गोऱ्हे यांच्याकडून घेण्यात आली. त्यांनी तत्काळ शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजितसिंह देओल यांच्याशी संपर्क केला. विद्यार्थ्यांना गणवेश योजनेपासून वंचित ठेवू नका, त्यांच्या आधार कार्डसाठी शिक्षणाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या संपर्कात राहून शाळानिहाय शिबिर सुरू करावे, असे निर्देश दिले. विद्यार्थी आधारपासून वंचित का राहिले याची तपासणी करण्याचेही त्यांनी सांगितले. त्याबाबतचा अहवालही मागितला. तसेच शाळेत बोगस पटसंख्या आढळल्यास कारवाईचे निर्देशही देण्यात आले.

एखादा प्रश्न नजरेस येत असेल, तर त्याची दखल घ्यावी लागते. गणवेश नसताना काही मुलांना शाळेत यावे लागले तर त्यांच्या मनावर निश्चितच विपरीत परिणाम होत असतो. त्यामुळे ‘लोकमत’ने हा प्रश्न पुढे आणताच मी त्याबाबत निर्देश दिले आहेत. या योजनेतील तांत्रिक अडचणी असतील तर त्या दूर होऊ शकतात.   - डाॅ. नीलम गोऱ्हे, विधान परिषद उपसभापती.

टॅग्स :Neelam gorheनीलम गो-हेStudentविद्यार्थी