शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
2
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
3
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीड जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
4
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
5
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
6
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
7
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
8
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
9
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
10
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
11
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
12
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
13
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
14
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
15
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
16
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
17
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
18
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
19
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
20
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
Daily Top 2Weekly Top 5

स्वाइन वादळ!

By admin | Updated: March 14, 2015 04:31 IST

स्वाइन फ्लूचा विळखा अधिक घट्ट झाला असून, गेल्या २४ तासांत या आजाराने राज्यात तब्बल १७ जणांचा बळी घेतला. गेल्या तीन वर्षांत एका दिवसात एवढ्या मोठ्या प्रमाणात बळी जाण्याची ही पहिलीच वेळ

पुणे : स्वाइन फ्लूचा विळखा अधिक घट्ट झाला असून, गेल्या २४ तासांत या आजाराने राज्यात तब्बल १७ जणांचा बळी घेतला. गेल्या तीन वर्षांत एका दिवसात एवढ्या मोठ्या प्रमाणात बळी जाण्याची ही पहिलीच वेळ आहे. यावर्षी राज्यातील स्वाइन फ्लूच्या बळींची संख्या २६४ वर पोहोचली आहे. यावरून राज्यात स्वाइन फ्लू रोखण्यासाठी राज्य आरोग्य विभागातर्फे राबविण्यात येणाऱ्या उपाययोजना अपुऱ्या पडत असल्याचे स्पष्ट होते.गतवर्षी डिसेंबरमध्ये राज्यात स्वाइन फ्लूचा पुन्हा फैलाव झाल्यानंतर लागण झालेल्या रुग्णांच्या संख्येत आणि बळींमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. गुरूवारी दिवसभरात राज्यभरात सुमारे ११ हजार रुग्णांची स्वाइन फ्लूची तपासणी करण्यात आली. त्यापैकी १ हजार संशयितांना आॅसेलटॅमीवीर औषधी देण्यात आली. १३१ जणांना स्वाइन फ्लूची लागण झाल्याचे चाचणीतून स्पष्ट झाले. परिणामी लागण झालेल्यांची संख्या ३ हजार १३५ वर पोहोचली आहे. ४१० रुग्णांवर विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. त्यापैकी ३६ रुग्णांची प्रकृती चिंताजनक असून, त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आल्याची माहिती राज्य आरोग्य विभागाने दिली़ पूर्णपणे बरे झालेल्या १३० जणांना शुक्रवारी रुग्णालयांमधून घरी सोडण्यात आल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले़ (प्रतिनिधी)